दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा | Digambara Digambara Shripad Vallab Digambara prayer 1

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा |



दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा |
दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा ||

हे नामामृत भवभयहारक अघसंहारक त्रिभुवनतारक |
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया अमोल ठेवा हाति धरा ||

दत्तचरण माहेर सुखाचे दत्तभजन भोजन मोक्षाचे |
कवच लाभता दत्तकृपेचे कळिकाळाचे भय न जरा ||

हा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता योगज्ञान-उद्गाता, त्राता |
दत्तचरित मधु गाता गाता भवसागर हा पार करा ||

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा |
दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा ||

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!