पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती
पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।
हरी हर संगे ब्रम्हदेवहि, खेळे तव भाळी,
पुनव हासते प्रसन्नतेने, मुख चंद्राच्या वरी।
लाजवीती रवि तेजाला तव, नयनांच्या ज्योती।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।
पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी ।
श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जेगजेठी ।
अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।
धर्माचरण पावन व्हावे, सदा असो सन्मति ।
सत कर्मचा यज्ञ घडवा, झिजवुनि ही यष्टी ।
सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊनी मज हाती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।
अहंपणाचा लोप करुनि, कृतार्थ जीवन करा ।
पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा ।
अल्पचि भिक्षा घलुनि स्वामी, न्यावे मज संगती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।
Hi aarti koni lihli aahe
ReplyDeleteJai sri swami samrth aai
ReplyDeleteKhupch sunder
ReplyDeletekhup khup sunder ahe me he swami chi aarti roj karate
ReplyDeleteही आरती स्व. मु.म.उर्फ नाना करंदीकर, ठाणे, ज्यांनी स्वामी समर्थ परिवार स्थापन केला आणि लोणावळ्याला स्वामींचे भव्य मंदिर उभारले, त्यांनी रचली आहे.
ReplyDeleteही आरती फार सून्दर आहे.मी रोज म्हणतो. मनाला
ReplyDeleteभावते.
Beautiful aarti.... Shri Swami Samarth... ☺️🙏
ReplyDeleteKhupch sundar Arti ahe ahe hi
ReplyDeleteBeautiful khup Chan
ReplyDeleteKhup Chan , manala Prasanna watl ❤️
ReplyDeleteNice arati
ReplyDeleteHi Aarti khup heart touching aaahe ❤️ sarkh sarkh hi Aarti bolavs vatte❤️❤️
ReplyDeleteJay jay raghuvir Samarth 🙌
Jay sadguru🙏
Hi aarti amhi dar Guruwar Swamichya mandirat baki arti sobat bolayacho, mandirat vivid vadyasobat hi aarti hote, tya veli pratyaksh Swami Sagun rupat yetil ki kay asa bhas vyayacha, khup sundar anubhav arti mhanatanna yeto.
ReplyDelete