साधक लक्षण Symptom of good Devotee

साधक लक्षण

1) सन्मानाची ईच्छा न करणे :- जो सदगुरू वचनावर एकनिष्ठ असतो ज्याची लाज भय शंका
मान दुरावलेला असतो तोच साधक सन्मानाची अपेक्षा करणार नाही
2) निर्मत्सरपणा :- भक्तीप्रेमाचे खरे नित्यनिरामय आनंदाची अनुभुतीमुळे ज्ञानाचा अहंकार टाकुन देऊन तो निर्मत्सर होतो जर कोणी आपली निंदा केली तरी त्याला आपली हितकर्ती माऊली समजतो
3) दक्षता :- तो साधक गुरूवचनावर तत्पर असतो प्रत्येक क्षण स्वहीताच्या कल्याणासाठी दक्षता ठेवतो आळस व विलंबाला मनाला शिवू देत नाही
4) निर्ममता :- गुरूवचनाने देहाचे मिथ्यात्व कळाल्याने तो देहावर उदास असतो गुरूवचनाच्या बोधाने त्याची अहंभावना व ममत्वभावना सोडलेली असते
5) सदगुरूच्या ठिकाणी आप्तपणा मानने:- साधकाचा मायबाप , गणगोत, हीतकर्ती माऊली गुरूच असते गुरुसेवा नित्यकर्म, धर्म गुरूच, ,गुरू तोच आत्माराम सर्व गौरव गुरूच्या ठिकाणीच असतो
6) निश्चळता :- विक्षेपाचे कितीही प्रसंग आले तरी तसूभरही त्याचे चित्त गुरूवचनावरुन ढळत नाही. शरीर जरी चंचल असले तरी तो मन गुरूवचनाच्या ठिकाणी निश्चल ठेवतो
7) चढती वाढती आस्था :- जिज्ञासा वृतीमुळे विषयाचा स्वार्थ सोडुन परिपुर्ण तत्व जाणण्यासाठी जिज्ञासता ठेवुन परमार्थाविषयी आपले प्रेम वाढवत ठेवतो
8) अनसुया :- सर्वाच्याठायी भगवदभावना जागृत ठेवुन सर्वामध्ये एकच ईश्वर जाणल्यामुळे तो कोणाचाही द्वेश करीत माही सर्व अनुग्रहीतांना म्हणजे जे गुरूचे अंकीत आहेत त्यांना गुरूसमानच मानतो कोणाच्याही उत्तम गुणांची अवहेलना करीत नाही कारण गुरूकृपेने अनसुया हा गुण त्याच्या अंगी असतो ..
.....ही आठ कमळाची माळ ज्याच्या -हदयकमळी निरंतर वास करते तोच सदगुरूच्या सानिध्याला पोहचतो .....
एक लक्षण असेही
9) व्यर्थ बडबड टाळतो :- सदगुरू समोर व्यर्थ बडबड फाजील बोलणे टाळतो दुस-याच्या मताचे खंडण करून आपल्याच ज्ञानाचा ठेंभा मिरवणे मनात ही आणत नाही त्याची खोडसाळ वादाची आंबट चिंबट कच्ची फळे गुरूवचनाने देटा सहीत पुर्वीच जळुन गेलेली असतात ....असो असे काही गुण भागवतात आलेली आहेत ज्यांना परमार्थाच्या अंतिम ध्येयापर्यत जाण्यासाठी या गुणांचा अंगीकार करावा झाला असेल तर खुपच आनंद .अशी ही शिष्याची साधकाची भुषणे होत ती नारायणानी कृपा करून भक्तांना दिली आहेत ..ती भागवतात पहावी ...जय हऱी

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!