Popular posts from this blog
पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती
पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। हरी हर संगे ब्रम्हदेवहि, खेळे तव भाळी, पुनव हासते प्रसन्नतेने, मुख चंद्राच्या वरी। लाजवीती रवि तेजाला तव, नयनांच्या ज्योती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी । श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जेगजेठी । अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। धर्माचरण पावन व्हावे, सदा असो सन्मति । सत कर्मचा यज्ञ घडवा, झिजवुनि ही यष्टी । सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊनी मज हाती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। अहंपणाचा लोप करुनि, कृतार्थ जीवन करा । पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा । अल्पचि भिक्षा घलुनि स्वामी, न्यावे मज संगती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।
Comments
Post a Comment