लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!
लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड
बसतील ह्याचे गणित असे कराल!♥प्रगतशील शेतकरी♥
♥उदाहरण लागवड अंतर 5 X 2 !
43560 स्क्वेयर फुट म्हणजे 1 एकर
5 X 2 = 10 स्क्वेयर फुट अंतर एका झाडाला
तर पुर्ण एकरात 43560 ÷ 10 = 4356 झाड प्रती एकर बसतात.
याप्रमाणे लागवडीचे अंतराप्रमाणे आपण एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित करु शकतात!
♥अजुन काही उदाहरणे
लागवडीचे अंतर एकुण लागवडीचे अंतर एकुण झाडांची संख्या
- - -फुट X - - -फुट ( स्क्वेयर फुट) ( 43560 ÷ एकुण लागवडीचे अंतर )
2 X 2 4 10890
3 X 2 6 7260
4 X 3 12 3630
6 X 5 30 1452
♥कृपया वरील गणित फक्त झाडांची संख्या निश्चित करते.
जास्त झाडे म्हणजे जास्त उत्पन्न असे निश्चितच होत नाही!
♥उत्पन्नाचे गणित योग्य अंतर, सुर्यप्रकाश, पाणी, हवा, मुळांच्या कक्षे बाहेर अणुरेणू संचार जमिन, उत्पन्न कोणत्या घटकाचे काढतो आहे(फळ, बी, फूल, पान, चारा, खोड, मुळ ई) ह्या व अनेक आंतरबाह्य घटकांवर उत्पन्न अवलंबुन असते.
♥असेही जास्त झाडांची संख्या किंवा मुबळक पाणी म्हणजे भरपुर उत्पन्न ही समज शेतकरी अनुभवाने वा शास्त्राने कालबाह्य ठरविली आहे!
संकलित!
Comments
Post a Comment