द्राक्ष वरील बोट्रायटीस किंवा कुज Grapes crop disease

🍇द्राक्ष वरील बोट्रायटीस किंवा कुज

👉हा रोग द्राक्षवेलीवरील पाने, व घडांवर दिसुन येतो.

👉 तसेच हा रोग वेलीच्या शेंड्यांवर देखिल दिसुन येतो.

👉या रोगांस ग्रे-मोल्ड किंवा पानांवर तसेच शेंड्यावर व फुलो-यातील घडावर आल्यास त्यांस ब्लाईट म्हणुन देखिल संबोधतात.

👉रोगाची बुरशी जुन्या किंवा मेलेल्या फांद्या, पाने तसेच इतर अवषेशांवर वास करते.

👉हा रोग वेलीच्या शेंड्याकडील पानांवर दिसुन येतो, तसेच फुलो-यातील घडावर देखिल दिसुन येतो.

👉घड परिपक्व झाल्यावर दिसणारी लक्षणे सर्वश्रुत अशीच आहेत,

👉मात्र घड लहान असतांना त्यावर सतत पाणी साचुन राहील्यास या रोगाची लागण होते,

👉या रोगाच्या नियंत्रणासाठी, बॅसिलस सबटिलिस, इप्रिडीऑन, कॅपटन, मॅन्कोझेब ची शिफारस केली गेली आहे.

👉फवारणी करतांना घडावर तसेच टोकाकडील पानांवर पुर्णपणे फवारणी होईल याची काळजी घ्यावी.

👉या रोगांच्या व्यतीरिक्त अग्युलर लिफ स्कॉर्च हा रोग देखिल द्राक्ष वेलींवर दिसुन येतो.

👉बोटट्रायटीस सारखं हा रोग मण्यांवर न येता घडाच्या देठावर व काडीवर दिसुन येतो. E

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!