पशु लसीकरणाचे वेळापत्रक

पशु लसीकरणाचे वेळापत्रक 🇮🇳प्रगतिशील शेतकरी 🏆

👇रोगाचे व लसीचे नाव
लसीकरणाची वेळ
लसीची मात्रा
👉१) आंत्रविषार
पावसाळयापूर्वी (एप्रिल,मे) दुसरी मात्रा १४ दिवसांनी२.५ मि.ली.
👉२) घटसर्पमे - जून२.५ मि.ली.
👉3) लाळ्या खुरकत
एप्रिल - सप्टेंबर3 मि.ली.
👉४) फाशी
मार्च, एप्रिल
(रोग प्रादुर्भाव आढळलेस)
०.५ मि.ली.
👉५) देवी डिसेंबर५ मि.ली.
करा लसीकरण होईल जनावरांचे प्राणसंरक्षण

👉लसीकरण कशासाठी ? 🇮🇳प्रगतिशील शेतकरी 🏆
१) गाई, म्हशी,व शेळ्या, मेंढया हे पाळीव प्राणी घटसर्प, फ-या, फाशी व
आंत्रविषार या साथिच्या रोगांमुळे तडका फडकी मरतात. या रोगाचीलागण
झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ
मिळत नाही. परिणामी मौल्यवान जनावरे दगावल्याने पशुपालकाचेफार
मोठे नुकसान होते.
२) लाळ्या खुरकूत रोगामुळे सहसा मृत्यु मुखी पडत नाहीत. परंतु या
रोगामुळे विशेषतः संकरित गाई व म्हशी अनुत्पादन होतात किंवा त्याची
क्षमता घटते. पर्यायाने पशुपालकास फर
मोठा आर्थिक फटका बसतो.

👉लसीकरणापुर्वी हे करा ! : 🇮🇳प्रगतिशील शेतकरी 🏆
१) कोणत्याही जनावरास लसीकरण करण्याच्या १ आठवड्या
अगोदर अंतररजिविंच्या नायनाटासाठी जंतनाशक औषध देवूनघ्यावीत.
२) जनावरांचे शरिरावरिल बाह्य परोपजिविंचा ( उदा. गोचिड, गोमाशा,उवा, पिसवा)
नायनाट करण्याकरिता जनावरांसाठी वापरल्या जाणा-या किटकनाशक
औषधांची फवारणी करुन घ्यावी.

👉लसीकरण करतांना ही काळजी घ्यावी : 🇮🇳प्रगतिशील शेतकरी 🏆
०१) जनावराना दिली जणारी लस ही चांगल्या नामांकित कंपणीचीअसावी.
०२) लस खरेदी करतांना त्यावरिल औषध काल बाह्य होण्याची तारीख
पाहुन घ्यावी व त्या लसीचा बॅच नंबर नोंदवून ठेवावा.
०३) काही लसी (उदा. खुरी, श्वासदंश, धनुर्वात) औषधी दुकानातुन
आनत असतांना ‘थर्मासमध्ये’ किंवा कॅरीबॅगमध्ये बर्फावर ठेऊनआणाव्यात
व जनावरास देई पर्यंत बर्फातच ठेवाव्यात,
बाहेर काढुन ठेवु नयेत.
०४) घरी लस आणल्यानंतर फ्रिज असेल तर लस फ्रिजमध्ये (वरचाम्हणजे बर्फाचा कप्पा सोडुन)
ठेवावी किंवा लस बजारातुन आणल्या बरोबर लगेच वापरुन टाकावी.
०५) लसीकरण हे निरोगी जनावरांनाच करावे.
०६) लसीकरण शक्यतो दिवसातील थंड वेळेत म्हणजे सकाळी किंवासायंकाळी करावे.
०७) लसीकरण करतांना लसीकरणाची सुई प्रत्येक वेळी पाण्यातउकळून निर्जतूक करून घ्यावी.
०८) फोडलेल्या बाटलीतील लस तशीच साठवून पुन्हा वापरू नये.
०९) लस योग्य जागेत व योग्य मार्गाद्वारे द्यावी.
१०) शक्यतो एकाच दिवशी एका गावातील सर्व जनावरांचे लसीकरणकरून घ्यावे.

👉लसीकरणानंतर ही दक्षता घ्या ! 🇮🇳प्रगतिशील शेतकरी 🏆
१) बैलांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे जेणे करून
शरीरावर ताण पडणार नाही.
२) उत्तम रोगप्रतिकारक शक्ति निर्माण होण्यासाठी चांगला आहारद्यावा.
३) लसीकरणानंतर जनावरांचे अतिउष्ण व अतिथंड
वातावरणापासून संरक्षण करावे. तसेच त्यांची लांबवर वाहतूकटाळावी.
४) लसीकरणानंतर ताप अथवा प्रतिक्रिया काही अपाय घडूशकतात,
मात्र ते तात्कालीन व सौम्य स्वरूपाचे असतात.

👉लसीकरणा विषयीच्या शंका व त्याचे निरसन 🇮🇳प्रगतिशील शेतकरी 🏆
१)लसीकरण केल्यास गाठी येतात का ?
‘घटसर्प’ व ‘फ-या‘ रोगाची लस दिल्या नंतर काही जनावरांच्या
मानेवर गाठी येतात हे खरे, पंरतू गाठ येते म्हणून लसीकरण
टाळणे अत्यंत चुकिचे आहे. गाठीमुळे प्राण्यांचा जीव धोक्यात येतनाही.
तसेच आता अनेक पशुपालकांना लसीची गाठ येते हे माहीत झाल्याने
ते बाजारात जनावरांची खरेदी- विक्री करतांना गाठीस दोष अथवा बट्टा
मानत नाही.लस दिल्यानंतर त्या जागेवर हलके चोळल्यास गाठयेण्याचे
प्रमाण कमी होते. तसेच आलेल्या गाठीस कोमट पाण्याने शेकले तरगाठ जिरून जाते.
२)लसीकरणामुळे जनावरे गाभडतात का ?
नाही, मात्र काही अशक्त जनावरात अगदी क्वचित म्हणजे १० हजारात
एखाद्या जनावरांत असा प्रकार घडू शकतो. तोही लस दिल्यानेच
होतो असे नाही. परंतू जनावरांच्या जिविताचा विचार करता सर्व
गाभण जनावरांना लस देऊन घेणे उत्तम विशषत: आंत्रविषार व
धनूर्वाताची लस ही गाभण शेळ्या मेंढ्यास दिल्याने विण्याच्या
सुमारास त्यांना व नविन करडांना हे आजार होत नाहीत. कारण
नवजात पिल्लांना चिकाद्वारे रोग प्रतिकारक शक्ति मिळते.
( अपवादानेही गाभण मेंढ्यांना देवी रोगाची लस देऊ नये )
३)लसीकरणानंतर दूध कमी होते का ?
लसीकरणामुळे शरीरावर येणारा ताण किंवा लस दिल्यानंतर
काही वेळेस येणारा हलकासा ताप यामुळे दूध कमी होवू शकते,
परंतू ते तात्कालीन असते.
४)रोगांची साथ आल्यानंतर लसीकरण केले तर फायदा होतो का?
जनावरांना रोग होण्याची वाट न पाहता अगोदरच लसीकरण
करावे कारण लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ति येण्यास दोन
ते तीन आठवडे लागतात. त्यामुळे रोगाची साथ येण्या आधीच
जमावरे रोग प्रतिकारक बनतात. रोगाची साथ आल्यानंतर केलेल्या
लसीकरणांचा फारसा उपयोग होत नाही.
५)लसीकरण कुठल्या वयाच्या जनावरात करावे ?
घटसर्प व फ-या रोगांची लसीकरण सहा महिण्याच्या वासरात
व त्यापेक्षा मोठ्या जनावरात करावे.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!