चारा टंचाई मध्ये मुरघासाचे नियोजन असे करा
चारा टंचाई मध्ये मुरघासाचे नियोजन असे करा 🇮🇳 प्रगतिशील शेतकरी 🏆
👉मका हे पीक मुरघास बनविण्यासाठी चांगले आहे.
👉 त्याचबरोबर ज्वारी (कडवळ), ओट, गिन्नी गवत, उसाचे वाढे यांपासूनही मुरघास बनविता येतो.
👉मुरघासामध्ये द्विदल पिकांचाही समावेश करावा.
👉 टंचाईच्या काळात मुरघासाचा वापर करावा.
👇दुधाच्या उत्पादनात वर्षभर सातत्य ठेवण्यासाठी संतुलित प्रमाणात हिरवा आणि कोरडा चारा दुधाळ जनावरांच्या आहारात असणे आवश्यक आहे.
👉योग्य अवस्थेमध्ये हिरवा चारा जनावरांना खाऊ घातला जात नाही. बहुतांशवेळी निकृष्ट प्रतीचा चारा जनावरांना दिला जातो.
👉त्याचा परिणाम दुग्ध उत्पादन तसेच जनावरांच्या आरोग्यावर होतो. तसेच जमीन एक ते दोन महिने चारा पिकाखाली अडकून पडते.
👉यावर उपाय म्हणजे हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनविणे.
👉 हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करून साठवून त्याचा वापर हिरव्या चाऱ्याच्या टंचाईच्या काळात करावा.
👉हिरवा चारा वाळवून साठविण्यापेक्षा मुरघास करावा.
👇मुरघासाचे नियोजन
👉1) सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी महिन्यापर्यंत हिरवा चारा आपल्याकडे उपलब्ध असतो. अशा वेळी मुरघास बनविण्याचे नियोजन करावे.
👉2) मुरघास बनविण्यासाठी एकदल पिकांची निवड करावी, कारण त्यामध्ये कार्बोदके आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांची आंबविण्याची प्रक्रिया चांगली होते.
मका हे पीक मुरघास बनविण्यासाठी चांगले आहे.
त्याचबरोबर ज्वारी (कडवळ), ओट, गिन्नी गवत, उसाचे वाढे यांपासूनही मुरघास बनविता येतो.
मुरघासामध्ये द्विदल पिकांचाही समावेश करावा.
👉3) जमिनीमध्ये खड्डे घेऊन किंवा जमिनीवर टाकी बांधून तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करूनही मुरघास बनविता येतो. सर्वसाधारणपणे एक चौरस फूट जागेमध्ये 15 ते 16 किलो मुरघास तयार होतो.
कमीत कमी जागेत चाऱ्याची चांगली गुणप्रत मुरघासमुळे राहते.
👉4) अर्धा एकर क्षेत्रावरील हिरव्या चाऱ्यापासून 10 टनांपर्यंत मुरघास तयार करण्यासाठी 20 फूट लांब, 6 फूट खोल किंवा उंच आणि 6 फूट रुंद जागेची आवश्यकता असते.
👉5) मुरघास बनविण्यासाठी पिकातील पाण्याचे प्रमाण 65 ते 70 टक्के असताना कापणी करावी.
गरज असेल तर कापलेले पीक जागेवरच एक दिवस सुकू द्यावे.
त्यानंतर चॉफ कटरच्या साह्याने चाऱ्याचे 2 ते 3 सें.मी. लांबीचे तुकडे करून टाकीत किंवा पिशवीत भरावेत.
एक टन चाऱ्यासाठी एक किलो मिठाच्या पाण्यात द्रावण तयार करून हे द्रावण मुरघास भरताना प्रत्येक थरावर शिंपडावे.
👉6) चाऱ्याचा प्रत्येक थर भरल्यानंतर चांगला दाब द्यावा जेणेकरून कुट्टी केलेल्या चाऱ्यामध्ये हवा राहणार नाही. कारण, हवा राहिली तर तेथे बुरशीची वाढ होऊन मुरघास खराब होतो.
म्हणून चारा चांगला दाबून भरावा.
टाकी किंवा बॅग भरल्यानंतर त्यावर जड वस्तू ठेवाव्यात, जेणेकरून मुरघास चांगला दाबून राहून मुरण्याची प्रक्रिया चांगली होईल.
👉7) सर्वसाधारणपणे 50 ते 60 दिवसांत मुरघास तयार होतो. तयार झालेल्या मुरघासाचा आंबट-गोड वास येतो.
त्याचा रंग फिक्कट हिरवा ते तपकिरी ते तपकिरी हिरवा रंगाचा असतो. खराब झालेल्या मुरघासचा रंग काळपट असतो. तसेच तेथे बुरशीची वाढ दिसते.
👉8) जनावरांना मुरघास खाऊ घालताना काळा झालेला किंवा बुरशी आलेला भाग काढूनच खाऊ घालावा.
गरजेनुसार मुरघास खाऊ घालण्यासाठी खड्ड्याच्या एका बाजूपासून सुरवात करावी.
बाकीचा मुरघास हवाबंद ठेवण्यासाठी काळजी घ्यावी. मुरघास वर्षभर टिकतो.
👉9) मुरघास तयार होत असताना पिकामधील असलेल्या साखरेचे रूपांतर लॅक्टिक आम्ल तसेच इतर आम्लांमध्ये होते.
त्यामुळे मुरघासचा सामू 3.5 ते 4 दरम्यान राहतो.
यामध्ये अनेक उपयुक्त जिवाणूंची वाढ होते.
या आम्लामुळे घातक बुरशींची वाढ होत नाही, त्यामुळे चारा टिकतो.
👉10) दररोज प्रत्येक गाईला 15 ते 20 किलो मुरघास द्यावा.
मुरघास कोरड्या चाऱ्याबरोबर एकत्र केला तर गाई, म्हशी मुरघासच्या वासामुळे तसेच चवीमुळे कोरडा चाराही आवडीने खातात.
👉11) मुरघास जनावरांना पचविण्यासाठीही सोपे जाते.
मुरघास खाऊ घातल्यामुळे गाईच्या पोटातील उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढून पचनक्रिया चांगली होते.
त्यामुळे गाई आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते, तसेच दुधाच्या उत्पादनामध्येही वाढ होते.
👉12) मुरघास वापरामुळे चाऱ्याच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते.
कारण मुबलक हिरवा चारा असताना मुरघास करून ठेवता येतो.
तसेच प्रत्येक गाईचे सरासरी अर्धा ते एक लिटर दूध उत्पादन वाढते. दुष्काळ असो की पावसाळा, मुरघास खाऊ घालणे सहज शक्य आहे.
👉13) मुरघास केल्यामुळे दररोज चारा कापणी करणे, बारीक तुकडे करणे यासारखे शारीरिक कष्टाचे काम करावे लागत नाही.
मजुरांवरील खर्च कमी होतो.
👉14) मुरघासासाठी प्लॅस्टिकच्या 500 ते 1000 किलोंच्या पिशव्या वापरल्या तर त्याची वाहतूक करता येऊ शकते.
गरजेनुसार आणि चाऱ्याच्या कमी-जास्त उपलब्धतेनुसार चाऱ्याचे आदानप्रदानही करता येऊ शकते.
संकलित!
Comments
Post a Comment