ऊन्हाळी तिळ लागवड

ऊन्हाळी तिळ लागवड
तंत्रज्ञान....

तिळाचे पीक पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.
-बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत तयार करावी.
-जमीन तयार करताना प्रति हेक्‍टरी दहा टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे.
-उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने "एकेटी-101' ही तिळाची जात प्रसारित केली आहे. या जातीचे गुणधर्म म्हणजे ही जात 90 ते 95 दिवसांत पक्व होते.
- दाण्याचा रंग पांढरा आहे. तेलाचे प्रमाण 48 ते 49 टक्के असून, उत्पादन प्रति हेक्‍टरी सात ते आठ क्विंटल मिळते. याचबरोबरीने पीकेव्ही एनटी-11 ही जात उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत आहे. ही जात 95 ते 105 दिवसांत पक्व होतो. दाण्याचा रंग पांढरा आहे. तेलाचे प्रमाण 48 टक्के असून, उत्पादन प्रति हेक्‍टरी सात ते आठ क्विंटल मिळते.

-उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्‍टरी चार किलो बियाणे वापरावे.
-पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी.
- लागवड फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी.
-पेरणीला उशीर झाल्यास पीक कापणीच्या वेळेला मॉन्सूनपूर्व पावसात सापडण्याची भीती असते.
-बियाणे फार बारीक असल्यामुळे समप्रमाणात वाळू/ गाळलेले शेणखत/ राख/ माती मिसळावी.
- तिफणीने 30 सें.मी.वर पेरणी करावी.
- माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी अर्धे नत्र (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) आणि पूर्ण स्फुरद (25 किलो प्रति हेक्‍टरी) देऊन दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) द्यावा.
- तसेच पेरणीच्या वेळी झिंक व सल्फर या खतांच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात दिली असता उत्पादनात वाढ होते.
Income -
150 /- per kg, 150 x300 kg yield per acre = 45000/- income from summer cultivation

कृषि विभाग

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!