शेतीसम्राट
शेतीसम्राट....
असा शेतकरि परत...परत होणे नाही
टू बी और नाँट टू बी दँट इज द क्वेशन....?
शेति करावी की न करावी हा एकच सवाल
आहे..
या ताणतणावाच्या ऊकिरड्यावर खरकट्या
सन्मानाचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार
आनंदाने
की
फेकुन द्याव्यात त्या मोटरा,केबल अन स्टार्टर
...त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह
एखाद्या डोहामध्ये .....?????
आणी करावा सर्वाचां शेवट....
त्याच केबल मधिल करंट ने ..एकदाचा च ...
माझा..तुझा..याचा..आणी त्याचाही.....
तात्काळ, पॅकेज त्या महासरपाने जीवनाला
असा डंख मारावा की, कृषि विभागाला
नसावा जागृतीचा किनारा कधीही...
पण
पण जर शेतिच च सोडावी लागली तर.........तर..
....तर.....
तर....
तर ईथेच खरी मेख आहे..
ईथेच आम्ही अडखळतो...
अनेकांना शेति सोडुन अनोळखी व्यवसाच्या
प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही...
म्हणुन आम्ही
सहन करतो जुने जागेपण.....
सहन करतो रात्रिचे ओलित..
सहन करतो रात्रभरात
पडनारे मालाचे भाव .......
सहन करतो निर्जीवपणे अभिमानावर होणारे
बेछूट कत्तल.....
अस्तीत्वाच्या गाभार्यात असलेल्या
सत्वाची विटंबना.....
आणी अखेर करूणेचा (?)
कटोरा घेऊन ऊभा राहतो पॅकेज चे पैसे वाटनाऱ्या बॅंकांच्या दारात ..
कृषि विभागाच्या चौकशीचा तो महाभयंकर मानव.....
आम्ही मात्र खालच्या मानेने......
आमच्या सचोटीच्या दाराशीच...
आजशेतमालाला भाव देणार्याऐवजी पॅकेज देउन
मलमपट्टि करणाऱ्या सरकारचाच चाच मान
मोठा.......
हे विधात्या....
तु ईतका कठोर का झालास...
एका बाजुला आम्ही ज्या माति साठी शेति
केली...
ति माउलिहि आम्हावरच का रुसलिय ??
रोज आमच्याच शेतातले धान्य खाउन जगणारेहि आम्हालाच का विसरतात???
आणी दुसर्या बाजुला आमच्याच मतावर जि आमचिच पोरं आमदार खासदार झालित तेहि
आज आम्हाला लाचार म्हणौन हिणवतात .....
आम्हि विज मागतो तुम्हि मोटरा देता ...
आम्हि भाव मागतो तूम्हि धान्य देता ...
आणी आता तर तुम्हि आम्हाला
व्यसनाधिन,व्यभिचारिच म्हणून मोकळे झालेत....
मग विस्कटलेल्या शेतिचे हे गाठोडे घेऊन...
हे करूणाकरा.....
आम्ही शेति करणार्यांनी
कोणाच्या पायावर डोकं आदळायचं ........
कोणाच्या....??????
जगाला वाचवण्यासाठि ???
कुणी पॅकेज देता का.??? ....
या शेति करणार्या वेड्या तुफानाला कुणी
पॅकेज देता का.....???? पॅकेज ...
Comments
Post a Comment