काकडी लागवड

काकडी लागवड

👉काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जूलै महि्न्यात करतात.
जाती-
1)पूना खिरा- लागवडीनंतर दीड महिन्यांनी फळे काढावयास येतात.
2)हिमांगी- पूना खिरापेक्षा उत्पादन जास्त,फळांना चांगला बाजारभाव मिळतो.
3)फुले शूभांगी- केवडा रोगास प्रतिकारक,अधिक उत्पन्न देणारा वाण.
लागवड-बियाणे-2-2.5किलो प्रती हेक्टरी

👉बिजप्रक्रिया-बिया 24-48 तास ओल्या फडक्यात किंवा पोत्यात बांधून ठेवाव्यात.बाविस्टीन 20 ग्रम प्रति लिटर बिजप्रक्रिया करावी.

👉अंतर-जातीनुसार 90ते120 से.मी.अंतरावर टोकून करतात.दोन वेलीतील अंतर 45-60 से.मी.असावे.

👉खतै- हेक्टरी 25 टन शेणखत आणि 220 किलो युरिया, 300 किलो सुपर फाँस्फेट,80 किलो म्युरेट आँफ पोटश द्यावे.अर्धा युरिया लागवड करताना द्यावा व उरलेली अर्धी मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावी.

👉खते वेलीभोवती बांगडी पद्धतीने द्यावीत आणि त्यानंतर पाणी द्यावे.
मादी फुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी जिब्रेलीक असिड 10-25 पीपीएम किंवा बोराँन 3 पीपीएम यांच्या फवारण्या पीक दोन आणि चार पानांवर असताना कराव्यात.

काकडी 🇮🇳ऋषी टेंभरे 💰प्रगतिशील शेतकरी 🏆

👌दोन महिन्यात आठ लाखांचे काकडी उत्पादन

👉भातपिकाची बिनभरवशाची शेती करताना निसर्गाच्या कोपामुळे निराशाच्या गत्रेत सापडलेल्या शेतकऱ्यांना ग्राम चुटीया येथील  ऋषी टेंभरे या तरुण अॅटोमोबाईल अभियंत्याने आशेचा किरण दाखविला आहे. शेती करण्याचा ध्यास घेऊन त्याने चार एकरात काकडीची लागवड केली.

👉ठींबक सिंचनाच्या सहायाने दोन महिन्यांत ८ लाख रुपयांचे उत्पादन घेतले.

👉ऋषी टेंभरेने चंद्रपुरातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर पुणे,मुंबई,चेन्नई च्या कंपनीतील कंपन्याच्या ऑफर आल्या परंतु, घरच्या पारंपरिक शेतीत त्याचे मन रमायचे.

👉त्याने आधुनिक तंत्रज्ञानावर शेती करण्याचा निर्धार केला.

👉तालुका कृषी विभागाशी सल्लामसलत केली.
आपल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा फायदा शेती तंत्रज्ञानासाठी करून घेतला.

👉चार एकर शेतीत काकडीचे उत्पादन घेण्याचे ठरविले.

📌सुरूवातीला चांगली नांगरणी केली.

📌 सेंद्रिय खताचा छिडकाव केला.

📌त्यावर निज्जा कंपनीची काकडीचे बियाणे डिसेंबर महिन्यात लावले.

📌 सात बाय सात अंतराचे वाफे तयार केलेत.

📌तीन बाय चार अंतरावर काकडीचे बियाणे लावण्यात आले.

📌पाण्याचा योग्य वापर करावा म्हणून ठिबक सिंचनाचा उपयोग केला.

👉नव्या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात चार एकरातील काकडीची शेती फुलली.
👉 वेलीला जागोजागी काकडयाही लागल्यात.
👉सद्यस्थितीत काकडीचे कमी काळावधीत त्याला यामधून ३० टन काकडीचे उत्पादन अपेक्षित आहे.
👉गेल्या दोन महिन्यातच त्याला आठ लाखांच्या काकडीचे उत्पादन झाले. 👉दरदिवशी सरासरी २० ते २५ क्विंटल काकडीची तोड केली जात आहे. 👉ऋषीला एकरी ५० हजारांचा खर्च आला.
👉छोटयाशा चुटिया ग्राम गावातील काकडी गोंदिया, नागपूर, बालाघाट, जबलपूरच्या बाजारपेठेत जात आहे.
👉त्याच्या काकडी उत्पादन तंत्राची माहिती करून घेण्यासाठी अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषीतज्ज्ञ, अभ्यासक आणि तरुण शेतकरी भेट देत आहेत.
👉सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीतील काकडीची चवही चाखणारे ऋषीवर अभिनंदनाचा वर्षांव करीत आहेत.
👉शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्याला लाभ मिळावा, असे ऋषी धोरण असून यानंतर तो पपईचे पीक घेणार आहे.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!