ताटी पद्धतीने वेलवर्गीय भाजीपाला लागवड

ताटी पद्धतीने वेलवर्गीय भाजीपाला लागवड कशी करावी

1) ताटी पद्धतीमध्ये 6 फूट x 3 फुटांवर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. यासाठी रीजरच्या साह्याने सहा फूट अंतरावर सरी पाडावी. प्रत्येक 25 फूट अंतरावर आडवे पाट तयार करावेत. सऱ्यांच्या लांबीच्या दोन्ही टोकांना दहा फूट उंचीचे व चार इंच जाडीचे डांब शेताच्या बाहेरच्या बाजूला झुकतील या पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत. त्यांना दोन्ही बाजूंनी दहा गेजच्या तारेने ताण द्यावा. नंतर प्रत्येक आठ ते दहा फुटांवर आठ फूट उंचीचे, दीड इंच जाडीचे बांबू, 2।। इंच जाडीच्या लाकडी बल्ल्या जमिनीत गाडून उभ्या कराव्यात. 
2) लावलेल्या वेलींमध्ये उभे केलेले बांबू किंवा डांब आणि कडेचे लाकडी डांब एका सरळ रेषेत येतील याची काळजी घ्यावी. नंतर 16 गेज जाडीची तार जमिनीपासून दोन फूट उंचीवर, दुसरी तार जमिनीपासून सहा फूट उंचीवर ओढावी. त्यानंतर वेलींची दोन फूट उंचीवर बगलफूट व ताणवे काढून वेल सुतळीच्या साह्याने तारेवर चढवावेत. 
3) बांबू आणि तारांऐवजी शेवरी किंवा इतर लाकडांचा वापर केल्यास खर्च कमी येऊ शकेल; परंतु ते साहित्य एका हंगामासाठीच उपयोगी पडेल. बांबू आणि तार तीन हंगामांसाठीपर्यंत वापरता येतात, त्यादृष्टीने विचार केला तर बांबू आणि तारा यांची ताटी स्वस्त पडेल.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!