वेलवर्गीय पिकांची काळजी
वेलवर्गीय पिकांची काळजी ♥प्रगतशील शेतकरी♥
♥उपलब्ध पाण्यावर ज्या शेतकर्यांनी वेलवर्गीय भाजीपाला पिके लागवड केली जाते,
त्यात प्रामुख्याने काकडी, दुधी भोपळा, टरबूज, खरबूज, कारली, दोडका इत्यादि करिता
♥कीड व रोग नियंत्रण पीक सल्ला खालील प्रमाणे:
♥ रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी
४ मिलि इमिडाक्लोप्रीड
किंवा
४ ग्रॅम थायामेथोक्झानम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
♥* केवडा व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी
मॅन्कोझेब ०.२५ टक्के
किंवा
मेटॅलॅक्झि्ल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) पाच टक्के
किंवा
कॉपर ऑक्झिनक्लोलराईड ०.२५ टक्के
अधिक चिकट द्रव्य ०.१ टक्के
यांची १० दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर एक महिन्याने फवारणी करावी.
♥भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी
डिनोकॅप ०.१ टक्के
किंवा
ट्रायडेमार्फ ०.०५ टक्के यांची फवारणी करावी.
♥काळा करपा आणि पानांवरील ठिपक्यां च्या नियंत्रणासाठी
मॅन्कोझेब
अथवा
क्लोरोथॅलोनील
किंवा
कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून- पालटून फवारणी करावी.
♥फुलकिडे, मावा व पांढरी माशीची पिल्ले आणि प्रौढ पानांतील रस शोषून घेतात,
त्यामुळे पाने वाकडी होतात;
तसेच हे कीटक विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात.
नियंत्रणासाठी
थायामेथोक्झाशम चार ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
♥नागअळी पानाच्या आत राहून आतील भाग खाते,
त्यामुळे पानांवर नागमोडी रेषा तयार होतात.
याच्या नियंत्रणासाठी
निंबोळी अर्क चार टक्के
किंवा
२० मि.लि. ट्रायझोफॉस प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
♥फळमाशीच्या अळ्या फळांतून राहून आतील गर खातात, त्यामुळे फळे सडतात, अकाली पक्व होतात.
नियंत्रणासाठी
एकरी “क्यू ल्यूरचे” पाच सापळे लावावेत.
♥सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी
ट्रायकोडर्मा प्लस २० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
♥रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी
इमिडॅक्लोप्रीड चार मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संकलन
Comments
Post a Comment