द्राक्षापासून बेदाणा कसा तयार करतात?

द्राक्षापासून बेदाणा कसा तयार करतात?

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी पुणे येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती :

* सद्या महाराष्ट्रात सगळी कडे द्राक्ष काढणीची प्रक्रिया सुरू आहे, मार्केट मध्ये एकदम द्राक्षाची आवक झाल्यामुळे द्राक्षाचा दर पडतो त्यामुळे नुसती द्राक्षे निर्यात करण्यापेक्षा त्याचे बेदाणे बनवने जास्त फायदेशीर ठरते.
* चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करावयाचा असेल, तर बेदाणे तयार करतेवेळी एकसारख्या आकाराचे, रंगाचे घड बागेतून तोडावेत.
* घड काढण्यापूर्वी मण्यामध्ये साखरेची गोडी उतरली आहे याची खात्री करून घ्यावी, कारण चांगल्या प्रतीचा बेदाणा म्हटल्यास त्यात गोडी जास्त असावी लागते.
* काढलेली द्राक्षे शक्यतो सुरवातीला स्वच्छ पाण्यातून काढून घ्यावी. त्यानंतर ही द्राक्षे 25 ग्रॅम पोटॅशिअम कार्बोनेट अधिक 15 मि.लि. ईथाइल ओलिएट (डीपिंग ऑइल) प्रति लिटरच्या द्रावणात दोन ते चार मिनिटे बुडवून ठेवावीत.
* या द्रावणाचा सामू 11 पर्यंत असावा. तद्नंतर द्रावणातून काढलेली द्राक्षे सावलीमध्ये जाळीवर सुकवावीत. वातावरणातील तापमानानुसार 15 ते 22 दिवसांत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होऊ शकतो.
* चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करायचा असेल, तर जास्त तापमान (35-40 अंश से.) व कमी आर्द्रता (30 टक्केपेक्षा कमी) असल्यास त्याचे परिणाम चांगले मिळतात.
* वाऱ्याचा वेग कसा आहे, यावरसुद्धा बेदाण्याची प्रत अवलंबून असते. हवा खेळती असल्यास कमी वेळेत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होतो.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!