आंबा बहार नियोजन
आंबा बहार नियोजन 🏆प्रगतशील शेतकरी 🇮🇳
👉खत व्यवस्थापन झाडाच्या वयानुसार शिफारस केलेली खत मात्रा द्यावी.
👉पुर्ण वाढ झालेल्या झाडास 10 घमेली शेणखत 1 किलो नत्र (2 किलो युरीया) 500 ग्रॅम स्फुरद (3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) 1 किलो पोटॅश (1.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ) पैकी नत्राचा पहिला हप्ता जुलै व स्प्टेंबरमध्ये विभागून द्यावा व प्रत्येक वर्षी शेणखतासोबत जिवाणू खते अझाटोबॅक्टर, पीएसबी, 50 ग्रॅम प्रती झाड प्रमाणे द्यावे.
👉मोहराच्या काळात प्रत्येकी झाडास पाण्याच्या ताण पडू देऊ नये.
👉मोहराचे संरक्षणासाठी –
झाडावरील रस शोषण करणा-या किडीचे व रोगाचे व्यवस्थापन करावे. त्यासाठी मोहोर येण्यापुर्वीपासून 15-20 दिवसाचे अंतराने 4-5 फवारण्या कराव्यात
1)कार्बारील 20 ग्रॅम एन्डोसल्फान 15 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे पहिली फवारणी घ्यावी.
2)दुसरी फवारणी निंबोळी आर्क 5टक्के ( 5 किलो निमपावडर 100 लिटर पाण्यात + कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी ) फवारणी घ्यावी.
3)मोनोक्रोटोफॉस 11 मिली
किंवा क्वीनॉलफॉस 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.
4)चौथी फवारणी बावीस्टीन 20 ग्रॅम + मोनोक्रोटोफॉस 14 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.
5)पाचवी फवारणी । धुरळणी 10 टक्के कार्बारील भुकटी + गंधक 300 मेश एकास एक (1.1) या प्रमाणात मिसळून प्रती झाड 250 ते 400 ग्रॅम भुकटी धुरळावी.
Comments
Post a Comment