शेळीला होणारे आजार, लक्षणे आणि उपचार

शेळीला होणारे आजार, लक्षणे आणि उपचार ♥प्रगतिशील शेतकरी♥

👉शेळ्यांमध्ये आंत्रविषार,
घटसर्प,
फुफ्फुसदाह,
काळपुळी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
👉या रोगांची लक्षणे ओळखून वेळीच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

👉आंत्रविषार -
कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होऊन कोवळे गवत जास्त प्रमाणात दिसून येते. हे गवत शेळ्या- मेंढ्यांनी भरपूर खाल्ल्यामुळे आंत्रविषार रोगाचा प्रादुर्भाव होतो. लहान कोकरांना- करडांना जास्त दूध पाजणे, अतिकर्बयुक्त पदार्थ म्हणजे मका, गहू, ज्वारी इ. जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास याची लक्षणे दिसतात. जनावरांच्या आतड्यांमध्ये जंतांचा जास्त प्रादुर्भाव असेल तर आतड्यातील वातावरण जिवाणूंच्या वाढीस पोषक ठरते. शेळी- मेंढीच्या लहान तीन ते 20 आठवड्यांच्या करडांत- कोकरांत रोगाचे प्रमाण जास्त असते. दूषित चारा किंवा पाण्यावाटे आंत्रविषाराचे जिवाणू जनावरांच्या पोटात जातात.
👉लक्षणे -
लहान करडे- कोकरांमध्ये अल्पमुदतीचा आजार असून, लागण झाल्यापासून दोन ते 12 तासांत मृत्यू येतो. करडे- कोकरे निस्तेज दिसतात, दूध पीत नाहीत, सुस्तपणे एका जागेवर बसून राहतात. पातळ हिरव्या रंगाची संडास होते. तोंडास फेस येतो. बाधित पिल्ले हवेत उडी मारून जमिनीवर पडतात. मोठ्या शेळ्या- मेंढ्या 24 तासांपर्यंत राहतात, त्यांच्यामध्ये तोंडातून फेस येणे, अडखळत चालणे, तोल जाणे, गोल फिरणे, तसेच श्‍वासोच्छ्वासास त्रास होतो. शेवटच्या टप्प्यात पोटफुगी, जुलाब ही लक्षणे आढळून येतात.
👉उपचार -
अल्प मुदतीचा आजार असल्यामुळे प्रभावी उपचारपद्धती नाही; पण पशुवैद्यकांच्या सल्ल्याप्रमाणे प्रतिजैविके द्यावीत, त्यामुळे पोटातील विष शोषण्याचे प्रमाण कमी होते व जिवाणूंची वाढ होणे थांबते. कोवळे, लुसलुशीत हिरवे गवत जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. लहान करडांना, कोकरांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नये. अतिकर्बयुक्त पदार्थ (ज्वारी, मका इ.) जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. शेळ्या- मेंढ्यांना पशुतज्ज्ञांकडून योग्य कालावधीत आंत्रविषार लसीकरण करावे.

👉सांसर्गिक फुफ्फुसदाह -
हा आजार ज्या प्रदेशात जास्त पाऊस, कोंदट दमट हवामान असते, अशा प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतो. निकृष्ट गोठा व्यवस्थापन, शेळ्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, सकस आहाराची कमतरता, अशक्तपणा, तसेच वातावरणात कडाक्‍याची थंडी आणि जास्त आर्द्रता व शेळ्यांना जंतांचा प्रादुर्भाव असेल, तर शेळ्यांना सांसर्गिक फुफ्फुसदाहाची लागण फार लवकर होते.
👉लक्षणे -
फुफ्फुसाचा दाह होतो, शेळी खात नाही, अशक्त बनते, सारखा खोकला येतो, श्‍वासोच्छ्वास घेताना त्रास होतो. रोगाच्या सुरवातीस शेळीच्या/ करडाच्या नाकातून पाणी येते, नंतर ते घट्ट होऊन नाकास शेंबूड येतो. बऱ्याच शेळ्यांना- करडांना हगवण लागते. शेळ्यांत आणि करडांत लक्षणीय मर दिसते.
👉प्रतिबंधात्मक उपाययोजना -
थंडीपासून संरक्षण करावे. शेळ्यांना- करडांना सकस आहार द्यावा. शेळ्यांचे- करडांचे उत्तम व्यवस्थापन करावे. शेळ्यांच्या वयोमानानुसार पशुवैद्याच्या सल्ल्याने शेळ्यांचे आणि करडांचे जंतनिर्मूलन करावे. योग्य वेळी पशुवैद्यकाची मदत घेऊन कळपाचे आरोग्य राखावे.

👉काळपुळी -
यामध्ये शेळी एकाएकी चक्कर येऊन गोल फिरून जमिनीवर पडते, लाथा झाडून गतप्राण होते. बहुतेक वेळा शेळी कोणतेही लक्षण न दर्शविता मरते.
👉प्रतिबंधात्मक उपाय -
ज्या प्रदेशात या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल व वारंवार दिसत असेल, अशा भागामध्ये लसीकरण करावे. लसीकरण पशुवैद्यक तज्ज्ञांच्या साह्याने करावे. या आजाराने मेलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करू नये, तसेच मेलेल्या शेळ्यांना उघड्यावर न टाकता खोल खड्डा करून जमिनीत पुरावे.

👉घटसर्प -
निकृष्ट व्यवस्थापन, हवामानातील बदल, इतर आजार, प्रवासाचा ताण, परजीवी जंत, बाह्यपरोपजीवींचा प्रादुर्भाव, ऊन, पाऊस, थंडी इ. गोष्टींचा ताण पडला की या रोगाच्या जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो, हा श्‍वसनसंस्थेचा आजार आहे.
👉लक्षणे -
शेळ्यांना खूप ताप येतो. खाण्या-पिण्यावर लक्ष नसते, रवंथ करणे थांबविते. नाकातून पाणी गळते, घशातून घरघर असा आवाज येतो, श्‍वसनास खूप त्रास होतो.
👉उपचार -
या रोगावर तातडीने उपचार केला गेला नाही तर शेळी दगावण्याची दाट शक्‍यता असते. वरील लक्षणे दिसताच पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविकाचा वापर करावा. पावसाळ्याच्या आधी मार्च- एप्रिल महिन्यात शेळ्यांना लसीकरण करून घ्यावे.

📌गोठा असावा हवेशीर -
1) शास्त्रीय दृष्टिकोनातून गोठा बांधल्यास जास्तीत जास्त शेळ्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येऊ शकते, त्यासाठी शेळ्या, बोकड व करडांसाठी योग्य क्षेत्रफळाची, निवाऱ्याची जागा ठरवून गोठा बांधणी केल्यास व्यवस्थापन चांगले होते.
2) गोठ्याला सिमेंट किंवा लोखंडी पत्रे, तसेच पालापाचोळ्यापासून अथवा उसाच्या पाचटापासून केलेले उतरते छतही चांगले असते; पण हे छत पावसाळ्यात गळता कामा नये. या छताचा एक फायदा म्हणजे उन्हाळ्यात हे छत थंड राहते.
3) शेळ्यांच्या गोठ्यातील जमिनीसाठी शहाबादी फरशी किंवा मुरूमही चालू शकतो; पण शक्‍यतोवर जमीन थंड व खडबडीत असू नये. यापेक्षा मुरूम टाकून धुमस केलेली व त्यानुसार मूग, साळ व गहू यांचा भुस्सा चुना व शेणमातीत मिसळून पातळ थर दिलेली जमीन सोईस्कर ठरते. ठराविक काळानंतर वरचा थर काढून दुसरा थर द्यावा लागतो.
4) गोठ्याच्या बाहेर मोकळे फिरण्यास काही जागा असावी. ही सर्व जागा तारेच्या कुंपणाने बंदिस्त करून घ्यावी. ही मोकळी जागा थोड्याफार प्रमाणात कमी- अधिक ठेवता येते.
5) गोठ्यामध्ये मादी व नर व वेगवेगळ्या गटांतील करडांसाठी वेगवेगळे कप्पे करावे. आजारी करडे, प्रसूत होणाऱ्या शेळ्या यांच्यासाठीसुद्धा स्वतंत्र कप्पे असणे आवश्‍यक आहे. गोठ्यात शेळीसाठी 24 तास स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. पाण्याचा हौद दर आठवड्याला स्वच्छ करून त्याला चुना लावावा, म्हणजे हौदात शेवाळ होणार नाही.

♥🐐 शेळ्यांना इंजेक्शन देणे 🐐

मित्रांनो मी तुम्हाला आज शेळ्याना इंजेक्शन देण्याची पद्धत बद्दल माहिती देत आहे.
शेळ्याना होणाऱ्या आजारावर बऱ्याच वेळा इंजेक्शन दयावे लागते. पण पशु चिकित्सक लवकर उपलब्ध होत नाही किवा उशिरा येतात त्यामुळे कधीकधी आपल्याला आर्थिक नुकसान होते. म्हणजेच शेळी दगाऊ शकते.
शेळी पालन करतांना आपल्याला शेळीला   होणाऱ्या आजारावर कोणते इंजेक्शन दयावे लागते हे माहीत असते पण इंजेक्शन न देता येत असल्यामुळे नाईलाज् असतो.
करिता जर आपण स्वतःच जर शेळीला इंजेक्शन दिले तर शेळीचे प्राण आपण वाचवु शकतो.
जर आपण वारंवार सराव केला तर आपण सुद्धा शेळीला इंजेक्शन देऊ शकतो.
जर योग्य औषधचि माहिती आणि योग्य उपकरणा ची माहिती असणे फार आवश्यक आहे.
शेळी ला इंजेक्शन देण्या आधी आपण संत्री या फळा सराव करू शकतो कारण शेळी ची मांसपेशी आणि कातळी की संत्री च्या साले सारखी असते.
इंजेक्शन देण्याचे दोन प्रकार आहे एक Subcutaneous (SQ) आणि दूसरे Intramuscular(IM)

इंजेक्शन देण्याअगोदर इंजेक्शन वर SQ किवा IM हे लिहलेले असते ते वाचावे व् मगच इंजेक्शन दयावे

♥🐐प्रथम आपण Subcutaneous (SQ) म्हणजेच त्वचेखालील इंजेक्शन देणे ही पद्धत बघू

ही एक सोपी पद्धत आहे

कारण या पद्धतित इंजेक्शन रक्त वाहिनी किवा नसे मध्ये जाण्याची भीति नसते
कारण ह्या प्रकारात इंजेक्शन त्वचेच्या खाली द्याव्याचे असते. शेळीच्या खांद्याच्या सैल त्वचेचा भाग का चिमटी मध्ये उचलून मंडप सारखा भाग तयार करावा व् सुई ही कातळी मध्ये घुसवावीं. सुई टाकत असतांना सुई ही मांस पेशीला लागणार नाही याची काळजी घ्यावी.
ह्या प्रकारात करडाना इंजेक्शन देने फार कठिन असते कारण करडांच्या कातळी ही सैल नसते करिता करडांच्या समोरच्या पायाच्या बगलेत आपण सुई देऊ शकतो.
इंजेक्शन दिल्या नंतर त्याजागेची मसाज (चोळावे) करावी अन्यथा गाठ निर्माण होऊ शकते.

♥🐐आता आपण Intramuscular(IM) म्हणजेच मांस पेशीत इंजेक्शन देणे ही पद्धत बघू
ह्या पद्धतित इंजेक्शन देतांना थोड़ी काळजी घ्यावी लागते.
कारण ह्या पद्धतित इंजेक्शन हे मांस पेशीत दयाव्याचे असते त्यामुळे जर चुकून इंजेक्शनची सुई जर शेळीच्या हाळाला लागली तर तीला आंतरिक ईजा होऊ शकते.
इंजेक्शन हे शेळीच्या मागच्या पायाच्या मांडित दयावे कारण तेथील मांसपेशी ह्या जास्त असतात. इंजेक्शन हे जास्त खोलवर देऊ नये.
इंजेक्शन आत गेल्यावर इंजेक्शन चे पलंजर हे हळुवार दाबावे इंजेक्शन हे रक्तवाहिनी मध्ये घुसनार नाही याची काळजी घ्यावी.
इंजेक्शन टोचल्यावर जर इंजेक्शन मध्ये जर रक्त येत असेल तर ते लगेच बाहेर काढावे व् परत दुसऱ्या ठिकाणी दयावे.
टोचल्या नंतर लगेच ती जागा चोळावी जेणे करुन औषध पूर्ण पणे फैलले जाईल.

♥इंजेक्शन देतांना घ्याव्याची काळजी
1) इंजेक्शन ची एक्सपायरी डेट चेक करावी.
2) इंजेक्शन हे एकदा वापरले की नष्ट करावे
3) एकाच सुई ने एकाच शेळीला इंजेक्शन दयावे
4) इंजेक्शन देण्या आधी इंजेक्शन वरील सर्व सुचना वाचवित व् त्याचे पालन करावे.
5) इंजेक्शन ची मात्र तपासूनच द्यावी
6) इंजेक्शन श्यक्यतो उन पड़ण्याच्या आधी किवा संध्याकाळी दयावे.
7) इंजेक्शन दिल्या नंतर ती जागा चोळून घ्यावी
👆🏻अति महत्वाचे 👆🏻
इंजेक्शन देण्यासाठी हाथ हे स्थिर असावेत
आणि ओवर कॉन्फिडेंस नसावा

मित्रानो वरील माहिती ही शेळीला इंजेक्शन देण्या संबंधी आहे माझी तुम्ही सर्वाना विनंती आहे की आपण आपल्या पशु चिकिस्तक कडून अधिक माहिती घ्यावी

संकलित!

Comments

  1. मला खूप आवडले एवढे चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन. माझी एक अडचण आहे माझी शेळी चार महिन्याची गाभण आहे तीची कास खूप कडक झाली आहे आणि तिला खूप त्रास होतोय स्मृती नाहीशी झाल्यासारखे वागते उपाय सुचवा माझा #9850902368

    ReplyDelete
  2. mazekde ek pille ahe te 2 mahineche ahe chara khate firte pn basle ki uthayla yet nahi khup ashkt zale ahe konte aushdh vaprave mi

    ReplyDelete
  3. शेळिचे पिल्ले चक्कर येउन खालि पडतात काय करावे?दोन,तिन महिनयाची आहेत .मेढया खोकत असतात काय उपाय करावेत? फोन 9309860713

    ReplyDelete
  4. शेळया गाभढले उपाय सागा

    ReplyDelete
  5. सर करडे अता अचानक हात पाय खोडून मरण पावतयेत कय आजार जला असेल

    ReplyDelete
  6. Sheli chi pille dhodh pit nahi kay karave 15 days chi ahe pille

    ReplyDelete
    Replies
    1. Amoxylin chi powder or oxytetrecyclin lit.orally

      Delete
  7. माझ्या शेळीचे पिल्लू चार दिवसाचं आहे ते अचानक खाली बसत आहे पिल्लू उभा राहत नाही आणि दुध पीत नाही अंग खाली टाकत आहे उपाय काय करावा 9594424065

    ReplyDelete
  8. शेळ्यांच्या तोंडाच्या सर्व बाजूंनी तोंड आल्यासारखे वाटतय तो कोणता आजार आहे आणि त्यावरील उपचार सांगा

    ReplyDelete
  9. शेळ्यांच्या तोंडाच्या सर्व बाजूंनी तोंड आल्यासारखे वाटतय तो कोणता आजार आहे आणि त्यावरील उपचार सांगा

    ReplyDelete
  10. Sir karadanchya magchya sidela jakhma zalya ahet upay sanga

    ReplyDelete
  11. Shedicha pillu janmla teva tyachi nad tutali ani tithe khup motha khada padla kay karave 4divs zale pilala please kahi oushad asel tr sanga please call mi 9545716162

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!