दुभत्या जाती
🇮🇳 प्रगतिशील शेतकरी 🏆
👇दुभत्या जाती
👉सहिवाल : मुख्यतः पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार आणि मध्यप्रदेशात आढळतात.दूध उत्पन्न – खेडेगावात:१३५०किलो- व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: २१०० किलो पहिल्या वेताचे वय - ३२ ते ३६ महिने दोन वेतांमधील अंतर – १५ महिने
👉गिर :मुख्यतः दक्षिण काठीयावाडच्या गिर जगंलां मध्ये आढळतात. दूध उत्पन्न – खेडेगावात : ९०० किलो क्ग्स – व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: १६०० किलो
👉थारपारकर :मुख्यतः जोधपुर, कच्छ आणि जेसलमेरमध्ये आढळतात. दूध उत्पन्न – खेडेगावात :१६६० किलो – व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: २५०० किलो
👉कॅरन फ्राई जातीची गाय : राजस्थानमधील थरपक्कर जातीची गाय उष्ण आणि दमट हवामानातही सशक्त राहू शकते. पण ही जात दुधासाठी मात्र सर्वसाधारण अशीच समजली जाते. या थरपक्कर जातीचा आणि होस्टन फ्रिशिअन जातीच्या कृत्रिम संकर करून कॅरन फ्राई या नव्या संकरीत गायीचा विकास करण्यात आला आहे.
या संकरीत गायीची वैशिष्ट्ये : ह्या जातींच्या गाईंच्या अंगावर, कपाळावर आणि शेपटीच्या गोंड्यावर काळे-पांढरे ठिपके डाग असतात. आचळे गडद रंगाची असतात व दुधाच्या शिरा ठळकपणे दिसतात.
कॅरन फ्राई जात स्वभावाने अतिशय शांत असतात. गोर्ह्यां पेक्षा गाय लवकर वयात येते व वयाच्या साधारण 32-34 व्या महिन्यामध्ये गाभण राहू शकते. गर्भार काळ 280 दिवसांचा असू शकतो. पहिल्यांदा वासरू दिल्यानंतर पुन्हा 3-4 महिन्यांतच या गायी पुन्हा गाभण राहू शकतात. त्यामुळे स्थानिक जातींच्या तुलनेने हे ही संकरीत जात फायदेशीर पडते. कारण स्थानिक जातीच्या गाई पुन्हा गाभण राहण्यासाठी 5-6 महिने जावे लागतात.
👉दुधाचे उत्पन्न :
कॅरन फ्राई जातीची गाय वर्षाकाठी सुमारे तीन ते साडेतीन हजार लिटर्स दूध देतात. एका प्रयोगात या जातीच्या गायीने साधारणतः तीन हजार सातशे लिटर्स दूध दिल्याची नोंद आहे. ह्या दुधामधील स्निग्धांश-फॅटचे प्रमाण 4.2 टक्के आहे व लॅक्टेशन दूध देण्याचा कालावधी तीनशे वीस दिवसांचा आहे.
भरपूर हिरवा चारा व इतर संतुलित आहार मिळाल्यास ह्या जातीच्या गायी समाधानी राहतात आणि दिवसाला साधारण पंधरा ते वीस लिटर दूध देतात. वासराच्या जन्मानंतरच्या तीन चार महिन्यांत दुधाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे दिवसाला पंचवीस ते पस्तीस लिटरपर्यंत जाते.
दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे या गायीच्या आचळांची काळजी घ्यावी लागते. त्यांना जंतुसंसर्ग (मॅस्टिटिस) होऊ नये व त्यांच्या दुधामधील विशिष्ट खनिजांचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी वेळीच लक्ष द्यावे लागते. त्यामुळे लगेच उपायही करता येतात.
👉लाल सिंधी :मुख्यतः पंजाब, हरियाना, कनार्टक, तामिळनाडु, केरळ आणि ओरिसामध्ये आहेत.दूध उत्पन्न – खेडेगावात:११०० किलो – व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: १९०० किलो
👉दुभत्या आणि भाकड जाती
ओंगल :मुख्यतः आंध्रप्रदेशच्या नेल्लोर, कृष्णा, गोदावरी आणि गुंटूर जिल्हयात आढळतात.
दुध उत्पन्न –१५०० किलो बैलगाडी ओढण्यासाठी आणि नांगरणीसाठी सक्षम आसतात.
👉हरियाना :मुख्यतः हरियानाच्या करनाल, हिसार आणि गुडगाव जिल्हयात , दिल्ली आणि पश्चिम मध्यप्रदेशात आढळतात . दूध उत्पन्न –११४० -४५०० किलो. बैल वाहतुकीच्या आणि नांगरणीसाठी उपयुक्त
👉कांकरेज :मुख्यतः गुजरातमध्ये आढळतात.दूध उत्पन्न – खेडेगावात:१३०० किलो – व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात : ३६०० किलो. पहिल्या वेताचे वय-३६ ते ४२ महिने दोन वेतांमधील अंतर– १५ ते १६ महिने. बैल वेगवान, चपळ आणि भक्कम. नांगरणी आणि वाहतुकीसाठी उपयुक्त.
👉देवनि :मुख्यतः आंध्रप्रदेशच्या ईशान्य आणि पश्चिम भागात आढळतात.गायी भरपुर दुभत्या आणि बैलकामासाठी उपयुक्त आहेत.
👉भाकड जाती
अमृतमहाल :मुख्यतः कनार्टक मध्ये आढळतात. नांगरणी आणि वाहतुकीसाठी चांगले.
👉हल्लिकार :मुख्यतः कनार्टकच्या टुमकुर, हासन आणि म्हैसुर जिल्हयात आढळतात .
👉खिल्लार
कांगायम :मुख्यतः तामिळनाडुच्या कोईंबतुर, इरोड, नमक्कल, करूर आणि दिंडीगुल जिल्हयात आढळतात.नांगरणी आणि वाहतुकीसाठी उपयुक्त. या जाती काटक असतात.
👇विदेशी दुभत्या जाती
👉जर्सी :पहिल्या वेताचे वय: २६ ते ३० महिने, दोन वेतांमधील अंतर – १३ ते १४ महिने,दूध उत्पन्न – ५०००-८००० किलो,दुधाचे उत्पन्न सुमारे २० लिटर आणि संकरित गायी दररोज ८ ते १० लिटर दूध देतात. भारतात या जातींना उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते.
👉होलस्टिन फि्रजियन : मूळ जात हाँलडची आहे. दूध उत्पन्न - ७२०० ते ९००० किलो, विदेशी दुधाळ जातीमध्ये दूध उत्पन्नात ही सर्वोत्तम आहे. दररोज सरासरी ही २५ लिटर दूध देवू शकते आणि संकरित होलस्टिन फि्रजियन गायी १० ते १५ लिटर दूध देवू शकतात.सागरी किनारपट्टी आणि पठार भाग यांना अनुकूल आहे.
👇म्हशींच्या जाती
👉मुर्रहा :मुख्यतः हरियाना, दिल्ली आणि पंजाब राज्यात आढळतात, दूध उत्पन्न – १५६० किलो दररोज सरासरी ८ ते १० लिटर दूध देवू शकते याशिवाय संकरित मुर्रहा ६ ते ८ लिटर दूध देवू शकते.या जातींना सागरी किनारपट्टी आणि किंचीत थंड हवामान चांगले मानवते.
👉सुर्ती : गुजरात १७०० – २५०० किलो
👉जाफराबादी : गुजरातचा काठीयावाड जिल्हा, १८००-२७०० किलो
👉नागपुरी : महाराष्ट्राचे नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्हे.दूध उत्पन्न – १०३० ते १५०० किलो
👇दुभत्या जाती निवडीची सामान्य पद्धत
👉दुभत्या गायींची निवड
बाजारात गुरांची किंवा वासरांची निवड ही एक कला आहे. एक उत्तम गवळी आपला कळप कळपातील पैदाशीने ऊभा करतो. खालील मार्गदर्शक सूचना दुभत्या गायींच्या निवडीसाठी उपयुक्त आहेत.
👉जनावर खरेदी करतांना विशेषतः त्याची जात आणि दुग्ध क्षमतेवर निवडावे.
👉पुर्ववृत पत्रक किंवा वंशावळ तक्ता जे उच्च व्यवस्थापित दुग्ध शाळेत जोपासली जातात त्यावरून जनावरांचा इतिहास मिळतो.
👉दुधाचे सर्वाधिक उत्तपन्न हे पहिल्या पांच वेतांमध्ये मिळते. म्हणून निवड करतांना पहिल्या किंवा दुस-या वेतांची गुरे निवडावी आणि वेतांच्या एक महिन्यानंतरची असावी.
👉गायींचे लागोपाठ दोन वेळा दोहन करावे. त्याची सरासरी जनावराच्या दूध उत्पादनाचा पुसट अंदाज दर्शविते.
👉गाय शांत आणि कोणालाही दोहन करु देणारी असावी.
👉शक्यतो आक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात गुरे खरेदी करावी.
👉दुधाचे सर्वाधिक उत्पादन वेताच्या ९० दिवसांनंतर मिळते.
👇उत्पादनक्षम गायींच्या जातींची लक्षणे
👉शांत स्वभावासोबत सुडौल बांधा, शक्तिवान, शरीराची नेटकी बांधणी आणि चांगली आकर्षक चाल असावी.
👉जनावराच्या शरीराचा आकार पाचरीसारखा(मागील बाजुस रूंद आणि पु़ढे निमुळता) असावी.
👉जनावराचे डोळे चमकदार आणि मान बारीक असावी.
👉कास पोटाला व्यवस्थित घट्ट चिकटलेली असावी.
👉कासेच्या त्वचेवर शिरांचे चांगले जाळे असावे.
👉कासेचे चारही कप्पे पूर्ण विकसीत असावे तसेच सडांची ठेवण नेटकी असावी.
👇व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात जातींची निवड - सूचना
👉भारतीय परिस्थीतीमध्ये व्यापारक्षम दुग्ध शाळेमध्ये किमान २० गुरं (१० गायी, १० म्हशीं) असणे आवश्यक आहे.
👉 ही संख्या सहज १०० गुरांपर्यंत जाऊ शकते.
👉१०० गुरं ५०:५० किंवा ४०:६० च्या प्रमाणात.
👇यानंतर तुम्हाला भांडवल आणि बाजारक्षमतेनुसार पुढील व्यवसायवृद्धिचा विचार करावा लागेल.
👉आरोग्यभिमुख मध्यमवर्गिय भारतिय कुटुंब कमी स्निग्ध पदार्थ असलेले दूध पिण्यासाठी पसंत करतात.
👉गुरांच्या मिश्र जाती दुग्ध शाळेत असणे अधिक चांगले. (संकरित, गायी आणि म्हशीं एकाच आश्रयाखाली वेगळ्या दावणीला)
👉तुमच्या नजिकच्या बाजारपेठेची पूर्ण माहिती घ्या, जेथे विक्रीचा विचार आहे.
👉तुम्ही वेगवेगळ्या दोन्ही प्रकारच्या जनावरांचे दूध एकत्रित किंवा मागणीनुसार विकू शकतात.
👉हाँटेल आणि काही सामान्य ग्राहक (३०% पर्यंत) म्हशींचे दूध पसंत करतात.
👉 दवाखाने आणि इतर ठिकाणी गायींचे दूध लागते.
👇दुग्ध शाळेसाठी गायीं/म्हशींची निवड
👉चांगल्या प्रतिच्या गायी बाजारात उपलब्ध आहेत आणि किंमत सुमारे रू./- ते रू./-प्रति लिटर प्रति दिन दूध उत्पादन. (उदा. १० लिटर दूध प्रति दिन गायीची किंमत/-
👉उत्तम व्यवस्थापनात १३ ते १४ महिन्याच्या अंतरात गाय हमखास एक वासरू देते.
👉गायी स्वभावाने शांत आणि हाताळण्यासाठी सोयींच्या असतात. अधिक दूध देणा-या संकरित जातींना (होलस्टिन आणि जर्सि संकर) 👉भारतीय हवामान पोषक आहे.
👉गायींच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थ ३ ते ५.५ टक्के असते जे म्हशींच्या दुधापेक्षा कमी आहे.
👇म्हशीं
👉भारतात आपल्याकडे चांगल्या म्हशींच्या जाती (उदा.मुर्हा आणि मेहसाना) व्यापारक्षम दुग्ध शाळेसाठी उपयुक्त आहेत.
👉म्हशीं दुधामध्ये गायींपेक्षा अधिक स्निग्ध पदार्थ असतात म्हणून त्याला लोणी आणि तुपासाठी अधिक मागणी असते. म्हशींचे दूध चहा आणि इतर भारतीय पेयांमध्ये अधिक वापरले जाते.
👉म्हशीं तंतुमय पिकांच्या ताटांवरसुद्धा जगवल्या जावू शकतात, म्हणून चा-याचा खर्च कमी होतो.
👉म्हशीं उशिरा वयांत येतात आणि त्यांचे दोन वेतांमधील अंतर १६ ते १८ महिने असते.
👉म्हशीं नर पाडसाची बाजारात कमी किंमत येते.
👉म्हशींना थंडाव्याची गरज असते.(उदा. पाण्याचे टाके किंवा तुषार पंखे)
Comments
Post a Comment