गांडूळ खत कसे तयार करावे?
गांडूळ खत कसे तयार करावे?♥प्रगतशील शेतकरी♥
♥गांडूळ खतनिर्मिती करण्यासाठी झाडाच्या सावलीत,
जनावराच्या गोठ्याजवळ उंचवटाच्या ठिकाणी जिथे पाण्याचा निचरा चांगला होऊ शकतो, अशा जागेत सहा ते नऊ फूट रुंद,
दोन ते अडीच फूट खोल,
बारा फूट लांब खड्डा खोदला जातो.
♥त्यामध्ये अर्धा फूट जाडीचा काडीकचरा व पिकांचे अवशेष यांचा थर देऊन चांगला दाबून घ्यावा.
♥त्यावर अर्धवट कुटलेले शेणखत व चाळलेल्या वरच्या थरातील मातीचे मिश्रण ३:१ या प्रमाणात अडीच ते तीन इंचाचा थर देऊन पाणी शिंपडून भिजवून घ्यावे.
♥त्यावर एक ते दीड इंचाचा ताज्या शेणाचा थर द्यावा व परत हलकेसे पाणी शिंपडून ओलावून घ्यावे आणि सहा ते आठ दिवस तसेच ठेवावे,
त्यातील कुजण्याची प्रक्रिया सुरू होईल.
♥त्यानंतर खड्ड्यातील उष्णता कमी झाल्यानंतर प्रति चौरस फुटाला १०० पूर्ण वाढ झालेली गांडुळे सोडावीत.
♥त्यांच्यावर सेंद्रिय पदार्थानेच झाकून घ्यावे. नियमित पाणी शिंपडून ओलावा टिकवून ठेवावा.
♥३० ते ४० दिवसांनी त्याच क्रमाने खड्डा सेंद्रिय पदार्थ,
अर्धवट कुजलेले शेणखत व माती यांचे ३:१ या प्रमाणात मिश्रण अडीच ते तीन इंचाचा थर व नंतर ताजे शेण एक ते दीड इंचाचा थर ओलावून घ्यावा.
हा ढीग गोणपाट्याच्या पोत्याने झाकून घ्यावे.
अधूनमधून पाणी शिंपडून ओलावा टिकवून ठेवावा.
गांडुळाच्या मदतीने खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू राहते.
♥साधारणतः दोन ते अडीच महिन्यांत एक टन चांगले कुजलेले गांडूळ खत तयार होते.
♥एकदा खड्यामध्ये भरपूर गांडूळ तयार झाल्यास नंतर एवढेच खत तयार होण्यास अवघा एक ते दीड महिन्याचा कालावधी पुरेसा आहे.
संकलित!
Comments
Post a Comment