ढोबळी (शिमला) मिर्ची लागवड
ढोबळी (शिमला) मिर्ची लागवड♥प्रगतशील शेतकरी♥
♥शेडनेटमध्ये ढोबळी मिर्ची लागवड फायदेशीर ठरते .
♥लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
मातीचा सामू ५.५ ते ६.५ असावा. काळ्या मातीची निवड करू नये.
♥लाल माती (७०टक्के),
शेणखत (२०टक्के) आणि
भाताचे तूस (१० टक्के) किंवा वाळू (१० टक्के) या प्रमाणात मिश्रण मिसळून लागवडीसाठी तयार करावे.
♥१० गुंठे शेडनेटसाठी लाल माती ९० ब्रास, शेणखत ३० ब्रास आणि भाताचे तूस ४ टन किंवा वाळू ४ ब्रास या प्रमाणात वापरावी.
♥सदर संपूर्ण एकत्रित मिश्रण कल्टिव्हेटरच्या साह्याने शेडहाऊसमध्ये समपातळीत पसरून घ्यावे.
♥सपाट सारे वाफे बनवून त्यामध्ये पाणी सोडावे.
काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचा कागद त्यावर व्यवस्थित झाकावा.
७ दिवसांनंतर सदर प्लॅस्टिकचा कागद काढून पुन्हा एकदा वाफ्यामध्ये पाणी सोडावे. लागवडीसाठी वाफसा येताच गादीवाफे तयार करावेत.
♥गादीवाफ्याच्या पृष्ठभागाची रुंदी ९० सें.मी., उंची ४० सें.मी. आणि दोन गादीवाफ्यांतील अंतर ५० सें.मी. ठेवावे.
♥एका गादीवाफ्यावर दोन ओळींत ढोबळी मिर्चीची लागवड करावी. दोन ओळींतील (रांगांतील) अंतर ५० सें. मी . आणि दोन रोपांतील अंतर ४५ ते ५० सें. मी. ठेवावे.
♥रोपांची निवड करताना ती ४ ते ५ आठवडे वयाची असावीत.
प्रत्यक्ष रोपावर ४ ते ५ पाने असावीत.
रोपांच्या मुळाचा जारवा चांगला झालेला असावा.
रोपे कीडमुक्त आणि रोगमुक्त असावीत.
♥झाडाला आकार येण्यासाठी छाटणी करणे आवश्यक असते, त्यासाठी ६ पाने झाडावरती ठेवून लागवडीनंतर २१ दिवसांनी झाडांची छाटणी किंवा पिंचिंग करावे.
♥लागवडीनंतर फांद्यांना नायलॉन किंवा प्लॅस्टिकच्या (जाडसर) दोरीने बांधून जमिनीस समांतर व जमिनीपासून ३ मीटर उंचीवर लावलेल्या लोखंडी तारांना या दोऱ्या टांगाव्या.
♥ वरच्या लोखंडी तारा मजबूत (१२ गेजच्या) असाव्यात, जेणेकरून रांगेतील सर्व झाडांचे वजन त्या सहन करू शकतील. एका गादीवाफ्यावरील दोन ओळींच्या वरती ३ लोखंडी तारा बांधतात व एका झाडाला ४ प्लॅस्टिक दोरया बांधाव्या.
♥माती परीक्षणानुसार एकरी ६ ते ८ गाड्या चांगले कुजलेले शेणखत,
तसेच माती परीक्षण अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ८० किलो पालाश पिकाला द्यावे.
संबंधित खतमात्रा संदर्भासाठी दिलेली आहे. संपूर्ण पालाश स्फुरद आणि शेणखत, तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी.
उर्वरित अर्धे नत्र लागवडीनंतर ३० व ५० दिवसांच्या अंतराने दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे.
मिश्रखतांचा वापर केल्यास अधिक फायदा होतो .
♥तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार
पीकवाढीच्या अवस्थेत योग्य वेळी पाण्यात विरघळणाऱ्या खतांची फवारणी करावी .
संकलीत!
Comments
Post a Comment