कलिंगड नियोजन असे कराल .. Watermelon cultivation practices

कलिंगड नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी 25 ग्रॅम मेटॅलॅक्झिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा 20 ग्रॅम फोसेटील ए . एल . अधिक 20 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 10 मि.लि . ऍझॉक्झिस्ट्रॉबीन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी .
काळा करपा (ऍन्थ्रॅक्नोज) आणि पानांवरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब अथवा क्लोरोथॅलोनील किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून - पालटून फवारणी करावी .
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायडेमार्फ किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
फुलकिडे , मावा व पांढरी माशीची पिल्ले आणि प्रौढ पानांतील रस शोषून घेतात , त्यामुळे पाने वाकडी होतात , तसेच हे कीटक विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात . नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम चार ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
नागअळी पानांच्या आत राहून आतील भाग खाते , त्यामुळे पानांवर नागमोडी रेषा तयार होतात . या किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क चार टक्के किंवा 20 मि.लि . ट्रायऍझोफॉस प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
फळमाशीच्या अळ्या फळांतून राहून आतील गर खातात , त्यामुळे फळे सडतात आणि अकाली पक्व होतात . नियंत्रणासाठी एकरी पाच क्यू ल्यूरचे सापळे लावावेत ; तसेच किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास 20 मि.लि . मेलॅथिऑन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवड- 20 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान करावी
- 2 ते 2.5 अंतरावर सरी काढून सरीच्या दोन्ही बाजूस 1 मीटर अंतरावर आळी काढून त्यात बि टोकावे. आळ्यात 2-3 बिया लावाव्यात व 2 रोपे ठेवावीत.
- जमीन नांगरून कुळवून घ्यावी. आळ्यामध्ये कुजलेले शेणखत, लिंडेन पावडर एकरी 4 किलो, सुपर फॉस्फेट एकरी अडीच पोते, पोटॅश 30 किलो, निंबोळी पेंड एकरी 200 किलो, झिंक सल्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट, फेरस सल्फेट एकरी 4 किलो मिसळावे.
- 10 दिवसांनी एकरी 2 किलो प्रत्येकी पीएसबी, अँझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा द्यावे.
- त्यानंतर आठवड्याने अमोनिअम सल्फेट एकरी 4 पोती 3 हप्त्यांत 15 दिवसांच्या अंतराने द्यावे, खते माती परीक्षणानुसार द्यावीत, व खते बांगडी पध्दतीने द्यावीत.
-

1)तांबडे भुंगेरे नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारी लिंडेन 15 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावी. मॅलेथिऑन 20 मिली प्रती 10 लीटर पाण्यातून फवारावे.
2)फळमाशी नियंत्रणासाठी किडलेली फळे जाळावीत. 10 लिटर पाण्यात 20 मिली मॅलेथिऑन + 100 ग्रॅम गुळ मिसळून फवारावे. कोकण कृषी विद्यापिठाने तयार केलेला रक्षक सापळा वापरावा.
3) लीफ मायनर नियंत्रणासाठी एकरी 4 किलो फोरेट किंवा थायमेट जमिनीत मिसळावे. सायपरमेथ्रीन 5 मीली प्रती 10 लीर पाण्यातून फवारावे. निंबोळी अर्क 4 किलो प्रती 100 लीटर पाण्यात मिसळून गाळून फवारावे.
4) भुरी नियंत्रणासाठी 5 ग्रॅम कॅलीक्झीन किंवा कॅराथेन 10 मिली किंवा बाविस्टीन 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

कलिंगड पिकास वाफसा अवस्था राहिल एवढे पाणी द्यावे. जमीनीत पाण्याच्या निचरा होऊ द्यावा. वेल पाण्यात भिजणार नाहित याची काळजी घ्यावी.
फळांवर कोरडे गवत ठेवावे. ऊन्हापासून संरक्षण करावे.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!