जिवनाचा खरा अर्थ Real meaning of LIFE

हे वाचल्या नंतर जिवनाचा खरा अर्थ सर्वांच्या लक्षात येईल..

♡एका माणसाचं निधन होतं..

हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा
साक्षात ♥भगवंत हातात एक गाठोड़ घेऊन त्याच्या समोर प्रगटतात.

♥भगवंत आणि त्या ♡माणसामधील संवाद..

♥भगवंत - वत्स, चल आधीच उशिर झालाय !

♡माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत.
मला आणखी खुप काही
करण्याची इच्छा आहे.

♥भगवंत - माफ कर, अगोदर च फार उशीर झाला आहे.

♡माणूस -  पण भगवंता, ह्या गाठोडयात काय आहे ?

♥भगवंत - जे आहे ते तुझंच
आहे !

♡माणूस -  माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे.....???

♥भगवंत - ते काही नाही कारण त्या सर्व भुतलाशी संबंधित आहेत.

♡माणूस -  माझ्या आठवणी ?

♥भगवंत - त्या काळाशी संबंधित आहेत.

♡माणूस - माझं क्रतुत्व ..?

♥भगवंत -नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे.

♡माणूस -  माझे मित्र आणि परिवार..?

♥भगवंत - नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते.

♡माणूस - माझी पत्नी व मुलं..?

♥भगवंत -  ते तर तुझ्या ह्रुद्यात आहेत.

♡माणूस - मग माझं शरीर आहे का त्या गाठोडया मधे???

♥भगवंत - नाही, नाही ते तर राख झालं..

♡माणूस - मग नक्की माझा आत्मा असेल...

♥भगवंत -  वत्सा तु परत चुकलास तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे..

♡माणसाच्या डोळ्यातून आता तर अश्रु ओघळतात.

त्याने भगवंताच्या हातातून ते
गाठोडं घेतलं आणि मोठ्या
आशेने उघडून बघितलं तर
काय ...

रिकाम होतं ते..

निराश होऊन डोळ्यातील अश्रु
पुसत

♡माणूस -
म्हणजे माझं स्वता:चं असं काहीच नाही ?

♥भगवंत -
अगदी बरोबर, तुझ्या मालकीच
कधीच काही नव्हतंच.

♡माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय ??

"जीवन हे क्षणभंगुर आहे..
फक्त जगा..प्रेम करा.. माणसं जोड़ा.."

आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच
घमेंड करू नये,
कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात
त्या नक्कीच संपत असतात ...

" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"

1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
2:-"समाज" स्मशाना  पर्यंत
3:-"पुत्र" अग्निदाना
पर्यंत

             फक्त आणी फक्त 
             ★ "कर्म"☆
             ईश्वरा  पर्यंत

◆जिच्या उदरात जन्म
होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त
होतो ती माती यातील वेलांटीचा फरक
म्हणजेच माणसाचे जीवन.....

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!