पॉलीथीन मल्चिंग तंत्रज्ञान
पॉलीथीन मल्चिंग तंत्रज्ञान🇮🇳 प्रगतशील शेतकरी 🏆
(1) फळबाग डाळींब मल्चिंग चे फायदे , मोसंबी ई, शेतकरी यशोगाथा
(2)भुइमूग मल्चिंग चे मल्चिंग चे फायदे फायदे
(3)कलिंगड मल्चिंग चे फायदे
(4)टोमॅटो मल्चिंग चे फायदे
♥मोसंबी व डाळिंब उत्पादकांनी यंदाच्या भीषण दुष्काळात सेंद्रिय व प्लॅस्टिक मल्चिंगद्वारे आपली पिके जगवण्याचा प्रयत्न केला, त्यातून हिरवाई टिकवली व आर्थिक आधाराची आशाही पल्लवीत झाली.
♥औरंगाबाद- बीड महामार्गावरील सांजखेडा हे पिंप्री राजा मंडळातील गाव. मोसंबीचे आगार समजल्या जाणाऱ्या भागातील हे गाव आहे. मोसंबीची बाग म्हणजे पाणी भरपूर आहे असे म्हटले जाते. सुकना मध्यम प्रकल्पाचा कॅनॉलही जवळून वाहतो, त्यामुळे हे पीक भरभराटीस आले; मात्र या वर्षी दुष्काळाच्या झळा या गावातील मोसंबी उत्पादकांनाही बसल्या. विहिरीचे पाणी आटले. कॅनॉल तर वर्षाच्या सुरवातीपासूनच कोरडा होता. खरीप व रब्बी पाण्याअभावी वाया गेला. मोठ्या कष्टाने जगविलेल्या बागा नष्ट होताना पाहणे दुःखकारक होते. अशा वेळी कृषी विभाग, प्रगतिशील शेतकरी आणि पैठण तालुक्यातील देवगावचे जय जवान जय किसान शेतकरी मंडळ पुढे आले आणि बागा जगविण्याच्या प्रयत्नाला सुरवात झाली.
♥शेतकऱ्यांकडून दोन- तीन वर्षांपासून शेततळ्यांतील पाण्याचा वापर फळबागांसाठी व्हायचा; मात्र या वर्षी पाऊसच इतका कमी झाला, की विहिरींचा तळ उघडा पडला, त्यामुळे शेततळ्यांत भरण्यासाठी पाणीच राहिले नाही. मिळेल तेथून पाणी विकत आणण्याचा व त्यातून पिके जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागले. मात्र, पाणी कुठपर्यंत विकत घ्यायचे व ते पुढे विकत मिळेलच याची शाश्वती नव्हती.
♥आच्छादनाचा पर्याय निवडला
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली फळबागांना मल्चिंग (आच्छादन) करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मल्चिंगचे महत्त्व समजावून देण्यात आले. यात दोन प्रकारचे म्हणजे सेंद्रिय पदार्थांचे व प्लॅस्टिकचे (पॉलिमल्चिंग) आच्छादन शेतकऱ्यांनी वापरले.
♥सेंद्रिय आच्छादन
शेतातीलच गवत, काडी कचरा, बाजरीच्या बनग्या व अन्य प्रकारचा पालापाचोळा शेतकऱ्यांनी सेंद्रिय आच्छादन म्हणून वापरला. दुपारच्या वेळेस झाडाची सावली जमिनीवर जिथपर्यंत पडते तेथपर्यंतचा भाग आच्छादनाने झाकला. त्याखाली वाळवीसारख्या किडींचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून थोडे फोरेट टाकले. ठिबकवरच आच्छादन होते, त्यामुळे तेथे पडणारे पाणी हे जमीन व त्यालगतचे आच्छादन सतत ओले ठेवू लागले. जमीन थंडगार राहू लागली. झाडाच्या सर्व मुळ्यांना पुरेशी ओल मिळू लागली. पाऊस कमी असल्याने पाहिजे तेवढे गवत वा काडी कचरा उपलब्ध झाला नसला तरी शक्य तेवढे सेंद्रिय पदार्थ शेतकऱ्यांनी वापरले.
♥प्लॅस्टिक आच्छादनाचा पर्याय
ज्यांच्याकडे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध नव्हते अशांनी प्लॅस्टिक आच्छादनाचा पर्याय स्वीकारला. औरंगाबाद, जालना, नाशिक जिल्ह्यातून प्लॅस्टिक आणले. चार फूट रुंदी व 1300 फूट लांबी असलेले प्लॅस्टिकचे प्रत्येक बंडल होते. मोसंबीच्या जुन्या झाडांना आच्छादन करताना किमान दहा फूट रुंद व दहा फूट लांब असे चौकोनी प्लॅस्टिक आच्छादणे गरजेचे होते. मात्र, ठिबक असल्याने झाडाच्या दोन्ही बाजूस आच्छादन केले तरी त्याचा उपयोग होणार होता, त्यामुळे चार फुटांचा पट्टा दोन्ही बाजूस अंथरला. ठिबकची नळी आच्छादनाखाली येईल अशी काळजी घेतली.
♥मल्चिंगचे असे केले नियोजन
ठिबक सिंचन करताना झाडाच्या चार कोपऱ्यांत पाणी पडते. प्लॅस्टिक आच्छादन करण्यापूर्वी जेथे पाणी पडते, तेथे सहा बाय सहा इंच आकाराचा खड्डा घेऊन त्यात एक घमेले शेणखत भरले. ठिबकच्या मायक्रोट्यूबमधून पाणी पडेल अशा प्रकारे नळ्या अंथरूण घेतल्या. त्यावर चार बाय दहा फूट आकाराचा प्लॅस्टिक पेपर एका बाजूने अंथरला. प्लॅस्टिक उडून जाऊ नये म्हणून त्याच्या कडा चोहोबाजूने मातीने दाबून टाकल्या. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूनेही प्लॅस्टिक अंथरूण घेतले. शेणखत टाकल्यामुळे पाणी जास्त काळ धरून ठेवले जाते. ज्यांची मोसंबीची झाडे लहान आहेत, त्यांनी चार बाय दहा फूट आकाराचे प्लॅस्टिक संपूर्ण झाडाभोवती अंथरूण घेतले.
प्लॅस्टिक पेपरची एक बाजू चंदेरी रंगाची (सिल्व्हर), तर एक बाजू काळी आहे. चंदेरी बाजू वरच्या दिशेने राहील अशा प्रकारे पेपर अंथरला. ही बाजू वरच्या दिशेने असल्याने सूर्यकिरणे परावर्तित होण्यास मदत होऊन प्लॅस्टिक कमी प्रमाणात तापते, त्यामुळे पाण्याची वाफ कमी प्रमाणात होते, त्यामुळे पाण्याची बचत होते.
काहींनी आच्छादन करण्यापूर्वी एका विशिष्ट पॉलिमरचा वापर केला, त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची शक्ती चांगल्या प्रकारे आहे. पॉलिमरसाठी आलेला खर्च पाणी विकत आणण्यापेक्षा काही पट कमी होता.
♥झाडाची कळी खुलली
आच्छादनाचा परिणाम दृष्टिपथास येऊ लागला. झाडाच्या मुळ्यांभोवती सतत ओलावा टिकून राहू लागला. आठ दिवसांनी द्यावयाची पाण्याची पाळी पंधरा दिवसांनी देणे शक्य झाले. झाडाभोवतालची जमीन सतत वाफसा स्थितीत राहिल्यामुळे पांढऱ्या मुळींची वाढ झाली. आच्छादनाखाली सतत ओलावा राहिल्याने गांडुळांची संख्या वाढली. झाडाच्या पोषणास योग्य वातावरण निर्माण झाल्याने झाडाची कांती टवटवीत झाली.
♥पिकाचे सुयोग्य नियोजन
झाडावर बहर असला तर पाण्याची गरज जास्त असते. अशा वेळी तेवढे पाणी देणे शक्य नसल्याने फळे मर्यादित ठेवण्यावर शेतकऱ्यांनी नियंत्रण ठेवले. जास्तीच्या फांद्याही काढून झाडाची पाण्याची गरज कमी केली. झाडे जगवणे हेच महत्त्वाचे होते. मोसंबीला दर दिवशी सरासरी 80 ते 140 लिटर पाण्याची गरज असते; मात्र ठिबक सिंचनाद्वारे जास्तीत जास्त एक तासभर पाणी देता येऊ शकत असल्याने प्रति झाड आठ ते नऊ लिटर पाणी देण्यात आले.
♥डाळिंबासाठी प्लॅस्टिक पट्टा
डाळिंबाची झाडे मोसंबीच्या तुलनेत जवळ- जवळ असतात, फांद्या एकमेकांना भिडल्या जातात, त्यामुळे ज्या ठिकाणी डाळिंबाचे झाड येईल, तेवढ्या भागापुरते प्लॅस्टिक गोल कापून संपूर्ण गादीवाफाच प्लॅस्टिकने झाकून टाकला. डाळिंबाला प्रति झाड 20 ते 50 लिटर पाणी प्रति दिवस लागते. आच्छादनामुळे तीन दिवसांनंतर देण्यात येणारी पाण्याची पाळी आठ दिवसांनंतर देणे शक्य झाले.
मोसंबी व डाळिंबाच्या झाडांना प्लॅस्टिक आच्छादन करण्यासाठी प्रति हेक्टरी 30 ते 35 हजार रुपये, तर अंथरण्यासाठी 4000 रु. खर्च आला.
•बळिराम काळे
तीन वर्षांची डाळिंबाची झाडे असून, एक वेळ उत्पादन घेतले आहे. 50 गुंठे क्षेत्रातून या वर्षी आठ टन उत्पादन मिळाले. प्लॅस्टिक मल्चिंगसाठी 20 हजार रु. खर्च आला. डाळिंबासाठी एक तास व शेवग्यासाठी अर्धा तास ठिबक चालविले. प्लॅस्टिक आच्छादनामुळे दर तीन दिवसांनी देत असलेले पाणी पाच दिवसांनंतर दिले तरी जमिनीत ओल पुरेशी राहिली.
•एकनाथ गवळी
मोसंबीची आठ वर्षांची झाडे असून, त्यासाठी पाणी विकत आणून द्यावे लागले. मोसंबीच्या दोन्ही बाजूला 19 x 4 फूट आकाराचे प्लॅस्टिक आच्छादन केले. त्यापूर्वी शेणखत टाकले. त्यामुळे मोसंबीखाली सतत ओलावा टिकून राहिला. पांढऱ्या मुळींची वाढ झाली. गांडुळांची संख्या वाढली. झाडे हिरवीगार झाली.
•गणेश ठोंबरे
मोसंबीची काही झाडे आठ वर्षांची, तर काही दोन वर्षांची आहेत. टॅंकरने पाणी विकत आणून झाडे जगविताना एका टॅंकरसाठी 1500 रु. खर्च येतो. एका वेळेस चार टॅंकर मागवावे लागतात. दुष्काळी परिस्थितीत हा खर्च परवडणारा नाही. विहिरीत कमी पाणी असून ते किती दिवस टिकेल याची शाश्वती नाही. अशा वेळेस प्लॅस्टिक आच्छादनाने थोडीशी आशा जागविली.
•रामराव तवार
अकरा वर्षांच्या मोसंबीच्या व एक वर्षाच्या डाळिंबाच्या बागेत प्लॅस्टिक मल्चिंग केले. त्यापूर्वी चार टॅंकर पाणी विकत आणून टाकावे लागायचे. नंतर दोनच टॅंकर पाणी प्रत्येक आठवड्याला विकत घ्यावे लागेल अशी वेळ आली. पाण्याची बचत झाल्याचे आढळले.
•दीपक जोशी
पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन मंडळाने विविध प्रकारच्या आच्छादनांचा वापर मोसंबीसाठी करण्यास सुरवात केली. आतापर्यंत परिसरातील 25000 झाडांना आच्छादन केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥भुईमूग मल्चिंग
पॉलीथीन कागदामुळे जमिन झाकली जाते व बाहेरील गवताचे बियाणे जमिनीवर पडण्यास अटकाव होउन गवताची वाढ जवळपास 26 टक्केनी कमी होते. त्याचबरोबर जमिनीचे तपमान वाढण्यास मदत होते परिणामी पेरणीच्या वेळी जमिनीचे तपमान कमी असले तरी बीयाणांची उगवण चांगली व 3 ते 4 दिवस लवकर होते.
कागद अंथरणे व पेरणी - वरील प्रकारच्या कागदाची रूंदी 90 सेमी असते व त्यावरती बियाची टोकण करणेसाठी 4 सेमी व्यासाची छिद्रे असतात. जमिन किंचीत ओली केरून वाफ्यावरती कागद अंथरावा व दोन्ही बाजूस मातीत खोचुन घट्ट बसवणे. कागदास छिद्रे नसल्याने लोखंडी/पी.व्ही.सी पाईपने 4 सेमी व्यासाची छिद्रे पाडून घ्यावी. टीजी-26 ही उन्हाळी भुईमुगाची जात निवडावी. जात उपटी असल्याने दोन छिद्रात अंतर 15 सेमी तर दोन ओळीत अंतर 30 सेमी ठेवावे व दोन ओळीच्या मध्ये पध्दतीने एक एक अशी छिद्रे घ्यावे.
पॉलीथीन रू. 200 - 500 प्रती किलो या भावाने मिळते. सर्वसाधारण एक एकर क्षेत्रासाठी 5 रोलची आवशकता असते. एका रोलमध्ये 6 किलो इतका कागद असतो. दलाली टॅक्स धरून प्रती एकर रू.20000-4000 इतका पॉलीथीन कागदासाठी खर्च येतो. इंडिअन पेट्रोकेमीकल्स लिमिटेडचे 7 मायक्रॉन जाडीचे पॉलीथीन खरेदी करू शकता. कागदाची जाडी 7 मायक्रॉन एवढीच असल्याने त्यातुन आ-या सहजपणे खाली जातात.
वरील पध्दतीने छिद्रे तयार केलेनंतर रायझोबियम व फॉस्फरस विरघळणारे जीवाणू यांची प्रक्रीया केलेले टीजी-26 जातीचे बियाणे प्रत्येक छिद्रात 2 बिया याप्रमाणे टाकावे.
खते - गादी वाफ्यावरती प्लॅस्टीकचा कागद अंथरल्यानंतर खते टाकणे शक्य होत नाही म्हणून गादी वाफे तयार करतानाच प्रती एकरी 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 10 किलो पालाश अशी खतांची मात्रा द्यावी व नंतर कागद अंथरावा.
~~~~~~~~~~~~~\~~\\~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥कलिंगड पिकामध्ये पॉलिथिन आच्छादनाचा (प्लास्टिक मल्चिंगचा) वापर फायदेशीर दिसून आला आहे. या आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही, वारंवार खुरपणीची गरज नाही, त्याचबरोबरीने पाणी आणि खतांचीही बचत होते. शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकासाठी आच्छादनाचा वापर केल्यास निश्चितच दर्जेदार उत्पादन घेणे शक्य आहे. उच्च प्रतीच्या भाजीपाल्याची शहरातून, तसेच निर्यातीला वाढती मागणी, पाण्याचा तुटवडा, तणांच्या वाढीमुळे होणारे पिकाचे नुकसान या बाबींचा विचार करता भाजीपाल्यामध्ये आच्छादनाचा वापर आवश्यक आहे. आच्छादनासाठी वाळलेला पालापाचोळा, गव्हाचे काड, लाकडाचा भुस्सा, भाताचे तूस, उसाच्या पाचटाचा वापर केला जातो. त्याचबरोबरीने आता पॉलिथिन कागदाचासुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
कलिंगडामध्ये पॉलिथिन कागदाच्या आच्छादनाचे चांगले फायदे दिसून आले आहेत. पॉलिथिन आच्छादनाचे फायदे -
1) तणांचे नियंत्रण - पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने कलिंगड पिकासोबत स्पर्धा करणारी अनेक तणे नियंत्रित राहतात, त्यामुळे पिकास दिलेली महागडी खते पिकाच्या उत्पादनवाढीसाठी उपलब्ध होतात. मल्चिंग न वापरल्यास ही खते तण शोषून घेतात.
2) मजुरांची बचत - भाजीपाला पिकामध्ये मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज भासते. शेतात नेहमी ओलावा ठेवल्यामुळे तणांची वाढ होऊन वारंवार खुरपणी करण्याची गरज भासते. आजकाल मजुरीही परवडणारी नसल्यामुळे पॉलिथिन कागदाचे आच्छादन हा त्यावर चांगला उपाय ठरतो.
3) पाण्याची बचत - पॉलिथिन कागदाच्या आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे कमी पाण्यातसुद्धा उन्हाळ्यात कलिंगडाचे भरघोस उत्पादन मिळते. हे आच्छादन ठिबक सिंचनासोबत वापरणे जरुरीचे आहे. पॉलिथिन कागदाचे आच्छादन केल्यास ठिबक सिंचन संचातील लॅटरलचे आयुष्यमान वाढते.
4) खतांची बचत - कलिंगड पिकाच्या अनेक संकरित जाती संशोधित झाल्या आहेत. या जातींपासून भरघोस उत्पादन मिळते. याचा अर्थच असा आहे की, हे पीक कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचे शोषण करते. रासायनिक खताच्या किमती सातत्याने वाढत आहेत. रासायनिक खते उघड्या जमिनीत दिल्यास त्यातील बराच मोठा अंश वातावरणाशी संपर्कात आल्यामुळे जमिनीतून नष्ट होतो. परिणामी जमिनीत दिलेल्या खतांचे अपेक्षित परिणाम पिकावर दिसत नाहीत. पॉलिथिन कागदाचे आच्छादन वापरल्यामुळे अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो.
5) वातावरण नियंत्रित होणे - उन्हाळ्यामध्ये दिवसा जमिनीचे तापमान झपाट्याने वाढते. अनेकदा पिकाच्या मुळ्यांना ते सोसत नाही, अशा वेळी पॉलिथिन कागदाचे आच्छादन त्यावरील उपाय आहे. याशिवाय हिवाळ्यात जमिनीचे तापमान विशेषतः रात्रीच्या वेळी खूप खाली जाते, त्यामुळे बोरॉनसारख्या अन्नद्रव्याचे शोषण होत नाही आणि कलिंगडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. बऱ्याचदा फळांचा आकार बिघडतो. पॉलिथिन कागदाच्या आच्छादनामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. उन्हाळ्यात ओलावा टिकून राहतो, तसेच हिवाळ्यात उबदारपणा टिकून राहतो.
6) उपयुक्त जिवाणूंची वाढ - तापमान जास्त वाढल्यास तसेच तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यास जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. आच्छादनामुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित राहिल्यामुळे उपयुक्त जिवाणूंची वाढ होऊन रोगकारक जिवाणूंचा बंदोबस्त करता येऊ शकतो.
7) अतिवृष्टीपासून संरक्षण - अचानक झालेली अतिवृष्टी ही कलिंगड पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. अशा अतिवृष्टीनंतर बाजारपेठेत कलिंगडाचा तुटवडा भासतो आणि भाव गगनाला भिडतात, परंतु ज्या शेतकऱ्यांनी पॉलिथिन कागदाचे आच्छादन केले आहे, अशा शेतकऱ्यांच्या कलिंगड पिकाचे अतिवृष्टीपासून संरक्षण झाले आहे.
8) फळांच्या प्रतीत सुधारणा - कलिंगडमध्ये आच्छादन वापरल्याने फळांचा मातीशी संपर्क न आल्यामुळे फळांची प्रत सुधारते. फळांचा आकर्षकपणा टिकून राहून त्यांना भाव चांगले मिळतात .
9) रोग आणि किडींचा बंदोबस्त - कलिंगड पिकात पॉलिथिन कागदाचे आच्छादन न वापरल्यास मूळ कूज, खोड कूज, फळ कूज, पानांवरील करपा अशा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. पिकास दिलेली भर, तसेच उंच गादीवाफ्यांचा वापर आणि त्यासोबत ठिबक सिंचनाची व्यवस्था आणि आच्छादनामुळे शोषक मुळाच्या परिसरात जास्त झालेले पाणी शेतातून बाहेर काढण्यास सुलभ होते. परिणामी रोग नियंत्रित राहतात. काही किडींचे अवशेष गळून पडलेल्या फळांवाटे व पानांवाटे जमिनीत जातात आणि तेथे काही काळ सुप्त अवस्थेत राहून पुन्हा पिकांवर प्रादुर्भाव करतात. नागअळी आणि फळ पोखरणाऱ्या या अळ्यांचा प्रादुर्भाव राहून हातातोंडाशी आलेले पीक नुकसानीत जाते. पॉलिथिन कागदाचे आच्छादन केल्यास किडींच्या जमिनीतील वाढीस अटकाव होऊन कलिंगडाच्या विक्रीयोग्य उत्पादनात वाढ होते, तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्यांची संख्या कमी करता येणे शक्य आहे.
~~~~~~~~~~~~~\~\~~~~~~~~~~\~~~~~~~~~~~~~~~~~~
♥टोमॅटोसाठी पॉलिथिन आच्छादनाचा वापर फायदेशीर
टोमॅटोसाठी पॉलिथिन आच्छादनाचा वापर फायदेशीर रामकृष्ण परब, बाळासाहेब मोटे टोमॅटोच्या चांगल्या उत्पादनासाठी पॉलिथिन आच्छादनाचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. या आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही, वारंवार खुरपणीची गरज नाही, त्याचबरोबरीने पाणी आणि खतांचीही बचत होते. शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकासाठी आच्छादनाचा वापर केल्यास निश्चितच दर्जेदार उत्पादन घेणे शक्य आहे. उच्च प्रतीच्या भाजीपाल्याची शहरातून, तसेच निर्यातीला वाढती मागणी, पाण्याचा तुटवडा, तणांच्या वाढीमुळे होणारे पिकाचे नुकसान या बाबींचा विचार करता भाजीपाल्यामध्ये आच्छादनाचा वापर आवश्यक आहे. आच्छादनासाठी वाळलेला पालापाचोळा, गव्हाचे काड, लाकडाचा भुस्सा, भाताचे तूस, उसाच्या पाचटाचा वापर केला जातो. त्याचबरोबरीने आता पॉलिथिन कागदाचासुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. टोमॅटोमध्ये पॉलिथिन कागदाच्या आच्छादनाचे चांगले फायदे दिसून आले आहेत. पॉलिथिन आच्छादनाचे फायदे ः
1) तणांचे नियंत्रण ~पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने टोमॅटो पिकासोबत स्पर्धा करणारी अनेक तणे नियंत्रित राहतात, त्यामुळे पिकास दिलेली महागडी खते पिकाच्या उत्पादनवाढीसाठी उपलब्ध होतात. मल्चिंग न वापरल्यास ही खते तण शोषून घेतात.
2) मजुरांची बचत ~भाजीपाला पिकामध्ये मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज भासते. शेतात नेहमी ओलावा ठेवल्यामुळे तणांची वाढ होऊन वारंवार खुरपणी करण्याची गरज भासते. अशा वेळी एका खुरपणीसाठी वीस महिला मजूर प्रति दिन एवढी गरज भासते. आजकाल मजुरीही परवडणारी नसल्यामुळे पॉलिथिन कागदाचे आच्छादन हा त्यावर चांगला उपाय ठरतो.
3) पाण्याची बचत ~पॉलिथिन कागदाच्या आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे कमी पाण्यातसुद्धा उन्हाळ्यात टोमॅटोचे भरघोस उत्पादन मिळते. हे आच्छादन ठिबक सिंचनासोबत वापरणे जरुरीचे आहे. पॉलिथिन कागदाचे आच्छादन केल्यास ठिबक सिंचन संचातील लॅटरलचे आयुष्यमान वाढते.
4) खतांची बचत~ टोमॅटो पिकाच्या अनेक संकरित जाती संशोधित झाल्या आहेत. या जातींपासून भरघोस उत्पादन मिळते. याचा अर्थच असा आहे की, हे पीक कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचे शोषण करते. रासायनिक खताच्या किमती सातत्याने वाढत आहेत. रासायनिक खते उघड्या जमिनीत दिल्यास त्यातील बराच मोठा अंश वातावरणाशी संपर्कात आल्यामुळे जमिनीतून नष्ट होतो. परिणामी जमिनीत दिलेल्या खतांचे अपेक्षित परिणाम पिकावर दिसत नाहीत. पॉलिथिन कागदाचे आच्छादन वापरल्यामुळे अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो.
5) वातावरण नियंत्रित होणे ~उन्हाळ्यामध्ये दिवसा जमिनीचे तापमान झपाट्याने वाढते. अनेकदा पिकाच्या मुळ्यांना ते सोसत नाही, अशा वेळी पॉलिथिन कागदाचे आच्छादन त्यावरील उपाय आहे. याशिवाय हिवाळ्यात जमिनीचे तापमान विशेषतः रात्रीच्या वेळी खूप खाली जाते, त्यामुळे बोरॉनसारख्या अन्नद्रव्याचे शोषण होत नाही आणि टोमॅटोच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. बऱ्याचदा फळांचा आकार बिघडतो. पॉलिथिन कागदाच्या आच्छादनामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. उन्हाळ्यात ओलावा टिकून राहतो, तसेच हिवाळ्यात उबदारपणा टिकून राहतो.
6) उपयुक्त जिवाणूंची वाढ ~तापमान जास्त वाढल्यास तसेच तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यास जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. आच्छादनामुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित राहिल्यामुळे उपयुक्त जिवाणूंची वाढ होऊन रोगकारक जिवाणूंचा बंदोबस्त करता येऊ शकतो.
7) अतिवृष्टीपासून संरक्षण~ अचानक झालेली अतिवृष्टी ही टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. अशा अतिवृष्टीनंतर बाजारपेठेत टोमॅटोचा तुटवडा भासतो आणि भाव गगनाला भिडतात, परंतु ज्या शेतकऱ्यांनी पॉलिथिन कागदाचे आच्छादन केले आहे, अशा शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचे अतिवृष्टीपासून संरक्षण झाले आहे.
8) फळांच्या प्रतीत सुधारणा ~टोमॅटोमध्ये आच्छादन वापरल्याने फळांचा मातीशी संपर्क न आल्यामुळे फळांची प्रत सुधारते. फळांचा आकर्षकपणा टिकून राहून त्यांना भाव चांगले मिळतात .
9) रोग आणि किडींचा बंदोबस्त ~टोमॅटो पिकात पॉलिथिन कागदाचे आच्छादन न वापरल्यास मूळ कूज, खोड कूज, फळ कूज, पानांवरील करपा अशा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. पिकास दिलेली भर, तसेच उंच गादीवाफ्यांचा वापर आणि त्यासोबत ठिबक सिंचनाची व्यवस्था आणि आच्छादनामुळे शोषक मुळाच्या परिसरात जास्त झालेले पाणी शेतातून बाहेर काढण्यास सुलभ होते. परिणामी रोग नियंत्रित राहतात. काही किडींचे अवशेष गळून पडलेल्या फळांवाटे व पानांवाटे जमिनीत जातात आणि तेथे काही काळ सुप्त अवस्थेत राहून पुन्हा पिकांवर प्रादुर्भाव करतात. बऱ्याचदा टोमॅटोमध्ये विषाणूंचा प्रसार होतो. नागअळी आणि फळ पोखरणाऱ्या या अळ्यांचा प्रादुर्भाव राहून हातातोंडाशी आलेले पीक नुकसानीत जाते. पॉलिथिन कागदाचे आच्छादन केल्यास किडींच्या जमिनीतील वाढीस अटकाव होऊन टोमॅटोच्या विक्रीयोग्य उत्पादनात वाढ होते, तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्यांची संख्या कमी करता येणे शक्य आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~\~~~~~~~~~~~~~~~~~\\\\~\\\\\\\\
संकलित!
Comments
Post a Comment