टोमँटो लागवड नियोजन Tomato cultivation practices
टोमँटो नियोजन असे कराल🇮🇳 प्रगतिशील शेतकरी 🏆
♥टमाटा च्या विवीध जाती♥प्रगतशील शेतकरी♥
♥ टमाटा च्या विवीध जाती-
१) पुसा रुबी
२) सिऑक्स
३) रोमा
४) एनटीडीआर-१
५) अर्का सौरभ
६) अर्काविकास
७) पुसा अर्ली ड्वार्फ
८) हिस्सार अरूण
९) हिस्सार ललित
१०) पंजाबछुआरा
११) सोनाली
१२) सदाबहार
१३) प्रिती
१४) गुलमोहर
१५) सोनाली
१६)मॉर्निंगसन
१७) पुसा गौरव
१८) वैशाली, रुपाली आणि रश्मी
१९) मंगला.
♥संपर्क :- कृषी विभाग!
संकलित!
♥अभिवृध्दी आणि लागवड पध्दती -
- टोमँटोची रोपे तयार करण्यासाठी भरपूर सेंद्रीय पदार्थ असलेली रेताड पोयट्याची किंवा पोयट्याची जमीन निवडावी. या जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करून गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक गादीवाफा हा ७.५ मिटर लांब, १.२ मिटर रुंद आणि १० सेंमी. उंच ठेवावा. एक हेक्टर लावणीच्या रोपासाठी असे दहा गादीवाफे तयार करावे लागतात. प्रत्येक गादीवाफ्यात साधारणतः १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. याशिवाय अर्धा किलो १५,१५,१५ हे मिश्रखत मिसळावे. - टोमँटोच्या रोपांसाठी हेक्टरी ४०० ते ५०० ग्रँम बियाणे लागते. उन्हाळी टोमँटोच्या पिकासाठी दर हेक्टरी १ ते १.५ किलो बियाणे टाकावे कारण उन्हाळ्यामध्ये रोपे मरण्याचे प्रमाण अधिक असते. संकरीत टोमँटोचे बी दर ७५ ते १०० ग्रँम इतक्या कमी प्रमाणात टाकावे.
टोमँटो खरीप पिकाची लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यात तर उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात करावी. बिगरहंगामी टोमँटोसाठी यापेक्षा उशिरा लागवड करावी. टोमँटोच्या रोपावर सामान्यपणे ५-६ पाने आली, की अशी रोपे शेतात लागवडीसाठी योग्य असतात. लागवडीच्या ४ दिवस आधी गादीवाफ्यावरील रोपांना पाणी देण्याचे बंद करावे. यामुळे शेतात लागवड केलेल्या रोपांच्या चांगला जम बसतो. अंतर ६० सेंमी. आणि दोन रोपांतील अंतर ४५ सेमी. ठेवावे. वरील अंतर टोमँटोच्या जातीनुसार, जमिनीच्या सुपीकतेनुसार आणि हंगामानुसार कमी अधिक करावे. पाण्याची बचत करण्यासाठी एक मिटर रुंदीच्या वाफ्यावर दोन्ही बाजूंना रोपांची लागवड करावी. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात रोपलागवडीचे काम दुपारी किंवा सायंकाळी पूर्ण करावे. रोपलागवडीनंतर लागलीच पाणी द्यावे. टोमँटोच्या अधिक उत्पादनासाठी २ रोपे एका ठिकाणी लावणे अधिक फायदेशीर असते.
♥खत व्यवस्थापन
टोमॅटोच्या संकरीत वाणासाठी 20 टन शेणखत व 300:150:150 किलो प्रती हेक्टर नत्र,स्फुरद, पालाश या रासायनीक खतांच्या मात्रा देण्याची शिफारस करण्यात येत आहे. यापैकी निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश तसेच पूर्ण शेणखताची मात्रा लागवडीवेळी द्यावी. उरलेले नत्र लागवडीनंतर 3 हप्त्यात विभागुन द्यावे. टोमॅटोच्या ' धनश्री' वानासाठी शेणखत 20 टन प्रती हेक्टर आणी मुख्य अन्नद्रव्य 200:100:100 नत्र, स्फुरद, पालाश प्रती हेक्टर देण्याची शिफारास केली आहे. टोमॅटोच्या पूर्व लागवडीच्या अगोदर शेणखताची पूर्ण मात्रा तसेच नत्र खताची अर्धी मात्रा, स्फुरद व पालाश खताची पूर्ण मात्रा द्यावी आणि नत्राची राहीलेली मात्रा तीन समान भागामध्ये करून 20 दिवसांच्या अंतराने द्यावी.
♥रोग व किड नियंत्रण -
♥लवकर येणारा करपा -
टोमँटोवरील लवकर येणा-या करप्याच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डँझीम ०.००५ टक्के किंवा डेल्टान ०.२ टक्के किंवा बेनोमिल ०.०५ टक्के च्या तीन फवारण्या घेण्याची शिफारस करणेत आली आहे. पहिली फवारणी लागणीनंतर २० दिवसांनी व उरलेल्या दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात. टोमँटोच्या पुसा रुबी या जातीवर येणा-या करप्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी आणि टोमँटोचे उत्पादन वाढविण्यासाठी मँन्कोझेब ०.२५ टक्के किंवा डायफोलँटॉन ०.२० टक्के किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ०.३० टक्के किंवा झायनेब ०.३० टक्के च्या फवारणीची शिफारस करण्यात आली आहे. म.फु.कृ.वि.राहुरी येथून लवकर येणा-या करप्याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम-४५ (०.२५ टक्के) किंवा डायफोलँटॉन (०.२ टक्के) च्या फवारणीची शिफारस करण्यात आली आहे. रोग दिसताच तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात. टोमँटोवरील करप्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी तसेच त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार फवारण्या घेण्याची शिफारस करणेत आली आहे. - पहिली फवारणी कार्बेन्डँझीम ५० डब्ल्यू.पी. (०.१५ टक्के) दुसरी फवारणी मँन्कोझेब ७५ डब्ल्यू.पी. (०.२टक्के) आणि तिसरी फवारणी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० डब्ल्यू.पी. (०.२५ टक्के) किंवा - - पहिली फवारणी क्लोरोथँलोनिल ४० एस.सी. किंवा (०.१ टक्के), दुसरी फवारणी मँन्कोझेब ७५ डब्ल्यू.पी. (०.२ टक्के) आणि तिसरी फवारणी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० डब्ल्यू.पी. (०.२५ टक्के)
♥अल्टरनेरीया करपा -
टोमँटोवरील अल्टरनेरीया करप्याचा नियंत्रणासाठी व त्यातून जास्त उत्पादन मिळविण्यासाठी निमपावडर (५ टक्के) किंवा मँन्कोझेब (०.२५ टक्के) च्या पाच फवारण्या लागणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने घेण्याची शिफारस करणेत आली आहे. टोमँटोवरील बक आय रॉट या रोगाच्या प्रभावी नियंत्रण साठी प्रोपिनेब ०.१५ टक्के किंवा मँन्कोझेब ०.२५ टक्के च्या चार फवारण्या रोग दिसल्यापासून १० दिवसांच्या अंतराने घ्याव्यात . टोमँटोमधील वैशाली या जातीमधील स्पॉटेड विल्ट व्हाईरस या रोगाचा प्रादुर्भाव करणेसाठी आणि उत्पादन वाढविणेसाठी कार्बोफ्युरॉन १.२५ किलो प्रती हेक्टर वाफ्यामध्ये देण्याची व नंतर एन्डोसल्फान ०.०५ टक्के च्या तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने घेण्याची शिफारस करणेत आली आहे.
♥किडी -
♥ फळ अळी -
टोमँटोमधील फळ अळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी २५० एच.एन.पी.व्ही. रोगग्रस्त अळ्यांच्या तीन फवारण्या १० दिवसांच्या अंतराने घ्याव्यात. टोमँटोवरील फळ अळीच्या नियंत्रणासाठी ५०.००० ट्रायकोग्रामा पतंग एका आठवड्याचा अंतराने ५ वेळा सोडावेत. पहिल्यावेळच्या अळ्या सोडून झाल्यानंतर ५ दिवसांनी एच.एन.पी.व्ही.च्या तीन फवारण्या एक आठवड्याच्या अंतराने घ्याव्यात. किंवा एच.एन.पी.व्ही.च्या पाच फवारण्या एका आठवडयाच्या अंतराने घ्याव्यात .फळ अळीच्या नियंत्रणासाठी फेनवेलरेट ३० ग्रँम (ए.आय.) च्या २-३ फवारण्या फुले आल्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने घेण्याची शिफारस करणेत आली आहे.
♥खोडकिडा-
या पिकाचे जैविक नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस ह्या मित्रकिडी १.५ लाखप्रतिहेक्टरी याप्रमाणात उगवणीनंतर दोन आठवड्यानी सुरवात करून दर १० दिवसाच्या अंतराने ३ ते ४ वेळा पिकावर सोडावेत.
याशिवाय या किडीचा प्रादुर्भाव वाढता असल्यास पिक सुमारे ३० दिवसाचे झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास एन्डोसल्फॉन प्रवाही १० मिली १० लिटर पाण्यात मिसळुन पिकावर फवारणी करावी.
♥ नागअळी -
नागअळीच्या नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या संशोधनावरून सायपरमेथ्रीन ०.०१ टक्के किंवा निमार्क ५ टक्के किंवा एन्डोसल्फान ०.०७ टक्के किंवा डायमिथोएट ०.०३ टक्के च्या दोन फवारण्या लागणीपासून २० दिवसांनी १५ दिवसांच्या अंतराने घेतलेले प्रभावी व कमी खर्चीक दिसून आले आहे. नागअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एन.एस.के.ई. ५ टक्के किंवा सायपरमेथ्रीन ०.०१ टक्के किंवा डायमिथोएट ०.०३ + किंवा एन्डोसल्फान ०.०५ टक्के च्या दोन फवारण्या लागणीपासून २० दिवसांनी १५ दिवसांच्या अंतराने घेण्याची शिफारस करणेत आली आहे.
♥तुडतुडे -
तुडतुड्यांचे प्रमाण सारखे राखण्यासाठी (२.५ प्रौढ प्रति पान) एन्डोसल्फान (०.०५ टक्के) आणि डेल्टामेथ्रीन (०.००१ टक्के) च्या ३ आलटून पालटून फवारण्या लागवडीपासून ३० दिवसांनी १५ दिवसांच्या अंतराने घेण्याची शिफारस करणेत आली आहे.
संकलित!
वैशाली टमाट सर्व म
ReplyDelete