वांगी पिकाची लागवड
🏆वांगी पिकाची लागवड🇮🇳 प्रगतिशील शेतकरी
👉वांगी पिकाची लागवड करताना प्रामुख्याने सुधारित व संकरित जातींची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ मिळण्यास मदत होणार आहे.
👉महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागामध्ये वांगी पिकाच्या रंग आणि आकारानुसार अनेक जातींची लागवड केली जाते.
👉सुधारित जाती - मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन, को-1, को-2 व पी.के.एम. 1.
👉लागवडीचा हंगाम - उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पेरून रोपांची लागवड फेब्रुवारीत केली जाते.
👉जमीन - चांगली निचरा असलेली मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी चांगली असते.
👉बियांचे प्रमाण - सुधारित जातीसाठी हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बी लागते. संकरित जातीसाठी हेक्टरी 120 ते 150 ग्रॅम बी पुरेसे असते.
👉रोपवाटिका -
- वांग्याची रोपे तयार करणेसाठी गादीवाफे साधारणतः 3 x 2 मीटर आकाराचे तयार करून, वाफा 1 मीटर रुंद व 15 सें.मी. उंच करावा.
👉प्रत्येक वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन घमेले टाकावे व 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत टाकावे.
- बी लागवडीपूर्वी बियाणास ट्रायकोडर्मा व्हिरीडी (4 ग्रॅम प्रतिकिलो) याची बीजप्रक्रिया करावी.
- रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया खत दोन ओळीमध्ये काकरी पाडून द्यावे. हलके पाणी द्यावे. रोप लागवडीस 5 ते 6 आठवड्यात तयार होते. रोपे 12 ते 15 सें.मी. उंचीची झाल्यावर लागवड करावी.
👉रोपांची लागवड -
रोप लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करून (हेक्टरी 30 ते 40 टन) शेणखत मिसळून द्यावे.
👉लागवड अंतर -
* हलक्या जमिनीत - 75 x 75 सें.मी.
* संकरित जातीसाठी - 90 x 90 सें.मी.
* कमी वाढणाऱ्या जातीसाठी/ मध्यम जमिनीत - 90 x 75 सें.मी.
* जास्त वाहणाऱ्या जमिनीसाठी/ भारी जमिनीसाठी - 120 x 90 सें.मी.
👉प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर -
वांगी लागवड प्लॅस्टिक आच्छादन किंवा मल्चिंग पेपर वापरून लागवड केल्यास उत्पादन वाढते. फळांचा दर्जा सुधारतो. तण नियंत्रणाचा खर्च कमी होतो. पाण्यामध्ये बचत होते.
* वांग्यासाठी 25 मायक्रॉन जाडीचा काळा व सोनेरी रंगाचा मल्चिंग पेपर वापरला जातो. काळा रंग आतील बाजूला व चंदेरी/सोनेरी रंग वरच्या बाजूला ठेवून दोन्ही बाजूने पेपर जमिनीत गाडून लागवड केली जाते. यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरावी लागते.
👉वांग्यासाठी ठिबक सिंचन आराखडा -
* प्रथमतः 120 सें.मी. रुंदीचे गादीवाफे व दोन गादीवाफ्यातील अंतर 30 सें.मी. असे गादीवाफे तयार करून घ्यावेत. प्रत्येक गादीवाफ्याच्या मधोमध लॅटरल टाकून घ्याव्यात.
* नंतर या लॅटरल लाइनवर 60 सें.मी. अंतरावर 4 लिटर प्रतितास ड्रीपर व दोन ट्रिपरमधील अंतर 50 सें.मी. असेल तर 3.5 लिटर प्रतितास क्षमतेचे ड्रीपर बसवावे.
* दोन लॅटरलमधील अंतर 1.5 मी. ठेवावे.
* लागवड करताना जोड ओळ पद्धतीने करावी. दोन ओळींमधील अंतर 90 सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 75 किंवा 60 सें.मी. ठेवून लागवड करावी.
👉खत व्यवस्थापन -
माती परीक्षणाच्या अहवालानुसारच खते द्यावीत. वांगी पिकासाठी मध्यम काळ्या जमिनीसाठी एकरी 60 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश आवश्यक आहे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे आणि अर्धे उरलेले नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने, दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन महिन्यांनी द्यावा.
👉पीकसंरक्षण -
* वांगी या पिकावर प्रामुख्याने तुडतुडे, मावा, पांढरी माशी व कोळी या रस शोधणाऱ्या किडी आणि शेंडा व फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो.
* रोगामध्ये प्रामुख्याने बोकड्या किंवा पर्णगुच्छ, मर व फळकूज रोग हे दिसून येतात.
👉वांगी पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन ♥प्रगतशील शेतकरी♥
♥ज्या जमिनीत टोमॅटो, मिरची, भेंडी किंवा वेलवर्गीय भाज्या ही पिके घेतली असल्यास तिथे वांग्याची लागवड करू नये. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो.
♥रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात कार्बोफ्युरॉन 30 ग्रॅम टाकावे. तसेच रोपावर डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे.
♥रोपांची पुनर्लागवड करताना रोपे इमिडॅक्लोप्रीड (10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी) च्या द्रावणामध्ये बुडवून नंतर लागवड करावी.
♥कामगंध सापळे 10 (दहा) प्रतिहेक्टर वापरावेत तसेच यातील सेप्टा (ल्युसी ल्युर) दर दोन महिन्यांनी बदलावी.
♥लागवडीनंतर 45 दिवसांनी तुडतुडे, मावा व पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.लि. किंवा मिथिल डिमेटॉन 25 टक्के प्रवाही मि.लि. किंवा ट्रायझोफॉस 10 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे.
♥लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. या किडीसाठी सायपरमेथ्रीन (25 टक्के प्रवाही) 5 मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 3 मि.लि. 10 लिटर पाण्यातून फवारावे.
♥वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा डायकोफॉल 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
♥वांग्यामधील बोकड्या/ पर्णगुच्छ याचा प्रसार तुडतुडे या किडीमुळे होतो. यासाठी तुडतुड्यांचे वरीलप्रमाणे नियंत्रण करावे.
👉सरासरी उत्पादन -
30 ते 40 टन प्रतिहेक्टर.
दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी पिकाच्या रोपवाटिकेपासून ते पिकाचा कालावधीमध्ये प्रत्येक टप्प्यावर योग्य व व्यवस्थित काळजी घेतल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते.
Comments
Post a Comment