ऊस उत्पादक व त्यांच्या समस्या
ऊस उत्पादक व त्यांच्या समस्या.........
महाराष्ट्रात सुमारे 10 लाख हेक्टर म्हणजे 25 हजार एकरावर ऊस पिक घेतले जाते. उत्पादकता 35 टन प्रति एकर एवढे असून इतर राज्याच्या मानाने चौथा क्रमांक लागतो मात्र साखर उतार्या मधे देशात प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात कोल्हापुर विभाग हां साखर उतार्या मध्ये आघाडीवर आहे.
ऊस उत्पादन अधिक चांगले मिळवायचे असेल तर काही महत्वाच्या बाबींवर लक्ष्य ध्यावे लागते
1 जमिनिचि सुपिकता
2 ऊस लागनिचि योग्य पद्धत
3 रासा खताच्या मात्रा
4 पाणी व्यवस्थापण
5 पिक संरक्षण आणि सम्पूर्ण व्यवस्थापन
1 जमिनीची सुपिकता - सेंद्रिय कर्ब , सामू , क्षारता , अन्न द्रव्ये इत्यादि महत्वाच्या बाबी योग्य प्रमाणात असल्या तरच अपेक्षित उत्पादन मिळू शकते.
यासाठी सेंद्रिय खताचा मुबलक / योग्य पुरवठा करावा लागतो. जसे शेणखत, कम्पोष्ट ख़त, अखाद्य पेण्डि , लेण्डी ख़त, हिरावळीचे ख़त वगैरे ख़त पुरवावे लागेल.
सद्य परिस्थितीत ही सर्व खते एकतर उपलब्धता फार कमी आहे आणि असल्यास कीमत फार जास्त आहे.
अलीकडे ही मोठी अड़चन निर्माण झाली आहे. त्याचा परिणम सरसरी उत्पादकते वर होत आहे. घसरत आहे.
2. उस लागनिचि पद्धत - बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती नसल्याने पूर्व पार पध्दतीने लागण करतो . त्याला मिलेबल केन आणि येणारे फुट्वे यांचे गणित समजले पाहिजे.
सरिची रुंदी
आपल्या बर्याच जणांना पडलेला हा प्रश्न ! हो ना?
चला या मागचे शास्त्राच समजाऊन घेऊ; म्हणजे दर वेळी हा प्रश्न नको.
खालील बाबी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा.
नैसर्गिक रित्या प्रति एकारामध्ये पक्व ऊसाचि संख्या 35000 ते 45000 असते. "सरासरी 40000 असते" ! इथून पुढे हे सतत लक्षात ठेवले पाहिजे, " एकरी पक्व ऊसाचि संख्या 40000 असते" !
सुरुवातीला म्हणजे लागण झाले नंतर येणार्या फुटव्यांची संख्या अति जास्त असते. जास्त म्हणजे किमान दिड दोन लाखा पेक्षा जास्त ! आणि एवढे जास्त असलेली फुटव्यां पैकी शेवटी उरतात फक्त 40000 पक्व ऊस !! बाकीचे फ़ुटवे बरेच दिवस जगतात, जमिनीत टाकलेले अन्न ( खते ) खात असतात आणि 4 / 5 महिन्यानंतर ह्ळु ह्ळु 'गर्दी' मुळे मरुन जातात. ते आपोआप मरत असतात , त्या साठी आपल्याला काही करायचे नसते.
इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या - शेवट पर्यन्त नैसर्गिक रित्या जगणारे पक्व ऊस ( 40000 ) आणि गर्दी होऊन मराणारे ( एक ते दोन लाख ) हे दोन्ही फ़ुटवे जमिनीतील अन्न समान खात असतात आणि समान वाढत असतात. 4/5 महिन्यानी त्यातील कमकुवत असणारे फुटवे हळु ह्ळु गर्दी मुळे मरायला लागतात. हे जे मरणारे फ़ुटवे आहेत ते जेवढे दिवस जगतात तेवढे दिवस जमिनीतील अन्न खात असतात. आणि 4/5 महिन्यानी गर्दिमुळे हळु ह्ळु मरुन जातात. यात काळजी करण्यासारखे म्हणजे असे अन्न खाऊन मरणार्यान्ची संख्या 'शेवट पर्यन्त जगणार्या फ़ुट्व्यापेक्षा' (पक्व ऊस) खुपच जास्त असते. जवळ पास 3 ते 5 पट जास्त! त्या मुले जमिनीत आपण टाकलेल्या खता पैकी खुप जास्त खत (3 ते 5 पट) मरणारे फुटवे खातात , आणि मध्येच मरुन जातात. त्या मुळे जगणार्याना खुप कमी खत खायला मिळते. याचा परिणाम त्यांची जाडी, उंची चांगली येत नाही, ऊस चांगल्या प्रकारे वाढत नाही ऊस बारीक रहातो आणि शेवटी उत्पादन कमी मिलते.
लक्षात घ्या, ऊस हे खादाड पिक आहे. त्याला सुरुवाती पासून आणि पुढेही वेळच्या वेळी संतुलित ख़त खायला मिळावे लागते. आणि यासाठी त्यांना स्पर्धा करणारे फ़ुट्व्यान्ची संख्या मर्यादित असावी लागते. योग्य असावी लागते.
आपल्या लक्षात आले असेल की; पक्व उसाला स्पर्धा करणारे फुटवे जास्त नकोत. आणि असे फुटवे जेवढे जास्त तेवढा पक्व ऊस किंवा शेवट पर्यन्त जगणारे ऊस,स्पर्धा करणार्या फ़ुट्व्यान्नि खत जास्त खाल्या मुळे बारीक रहातात, आणि त्यामुळे अपेक्षित आव्हरेज/ टनेज मिळत नाही. आम्हा खुप शेतकरयाना असे वाटते की, "ऊसाचे फ़ुटवे जेवढे जास्त तेवढा ऊस फार चांगला आला" असे आपण म्हणतो. एवढेच नव्हे तर आपण एकमेकाला सांगतो की; ऊसाला जेवढे फुटवे जास्त तेवढा ऊस चांगला.
पण असे नाही, फुटवे योग्य प्रमाणात असायला हवेत. कमी नव्हेत!! "योग्य" पाहिजेत. योग्य म्हणजे किती हे समजले पाहिजे.
आपण पाहिले आहे की आहे की, "नैसर्गिक रित्या एक एकरात सरासरी 40000 ऊस जगतात". आणि फुटवे 60000 ते 70000 असावेत. म्हणजे त्यातील 20000 30000 फुटवे वेगवेगळ्या कारणानि मरतात. म्हणजे काही खोड कीड़ी मुळे मरतात, तर काही बाळ भरणी आणि मोठी भरणीच्या वेळी मारतात. अशा मराणार्यांची सख्या कमी असावी. म्हणजे खत फार वाया जाणार नाही.
एकंदरीत सुरुवातीला 60000 ते 70000 फुटवे घ्यावेत आणि त्यातील 40000 ते 45000 फुटवे जगुन ते पक्व ऊस होतील.
@@@@सहजा सहजि लक्षात देवण्यासाठि
एकरी 40000 ते 45000 ऊस जगतात.
फुटवे 60000 ते 70000 असावेत.
* म्हणजेच एक चौरस फ़ुटास एक ऊस नैसर्गिक रित्या जगतो.
* आणि एक चौरस फ़ुटास सव्वा ते दीड पट फुटवे असावेत.
* 43560 चौ फ़ुट म्हणजे एक एकर क्षेत्र. आपण तोंडी हिशेब करणार आहोत म्हणून आपण 44000 चौ फूटाचा एक एकर समजू.
** आता वरील प्रमाणे, एका चौरस फ़ुटास एक ऊस जगतो म्हणजे एकाराचे चौरस फ़ुट 44000 म्हणजे एकरी सरासरी 44000 ऊस जगातील. म्हणजेच खरतर 35000 ते 45000 ऊस जगतात. हे लक्षात घ्या.
** आता फुटवे किती पाहू. ' सुरुवातीला सव्वा ते दिड पट फ़ुटवे ' म्हणजे 44000 चौ फ़ुटाचा एकर x सव्वा ते दिड पट फुटवे म्हणजे 60000 ते 65000 फुटवे घ्यावेत. या पेक्षा जास्त घेतले तर खाऊन मरणारे संख्या जास्त असल्यामुळे जास्त ख़त खातील; जगणार्याना कमी ख़त मिळेल आणि ते बारिक रहातील.
******
एक गणित पहा
समजा 5 फ़ुट रुन्दिची सरी आहे त्या सरिची 10 फ़ुट लांबी मोजावी आणि त्यातील फुटवे मोजावेत.
* 5 फ़ुट रुन्दिची सरी x 10 फ़ुट लांबी = 50 चौ फ़ुट,
* एका चौ फ़ुटात एक ऊस जगतो म्हणजे 10 फ़ुट लंबित शेवटी जगणारे ऊसाचि संख्या 50 असेल. हो एवढीच किंवा या पेक्षा कमीच असते, खात्री करून घ्या.
* आणि एका चौ फ़ुटात सव्वा ते दिड फुटवे म्हणजे 50 चौ फ़ुटात 60 ते 75 फुटवे असावेत. ऊसाचे वय 60 / 65 दिवसाचे दरम्यान ही संख्या असावी.
** आपण मोजलेले फुटवे वरील याचेशी तुलना करुन पहा. 5 फ़ुट रुन्दिच्या सरित आणि लांबी 10 फ़ुटात फुटवे 60 ते 75 असावेत. या पेक्षा जेवढे फुटवे जास्त त्या प्रमाणात उत्पादन कमी कमी मिळेल.
दोन महिन्याचे दरम्यान फुटव्यांची संख्या योग्य आले नंतर ऊसाचि "बाळ बांधणी" करावी. म्हणजे पुढे जादा फुटवे येणार नाहित आणि उत्पादनावर जादा फ़ुट्व्यान्मुळे वाईट परिणाम होणार नाही.
ऊसाचि "बाळ बांधणी" करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
बहुतेक आपण ऊसाचि "बाळ बांधणी" करत नाही. दुर्लक्ष करतो.
आता याच प्रमाणे गणित करावे.
सरिची रुंदी x सरिची लांबी = तेवढे जगणारे ऊस
सरिची रुंदी x सरिची लांबी = त्याचे सव्वा दीड पट फुटवे
*5 फ़ुट x 10 फ़ुट = 50 चौ फ़ुट, जगणारे 50 ऊस आणि फुटवे 60 ते 75
*6 फ़ुट x 10 फ़ुट = 60 चौ फ़ुट , जगणारे 60 ऊस आणि फुटवे 70 ते 90 फुटवे
*7 फ़ुट x 10 फ़ुट = 70 चौ फ़ुट, जगणारे 70 ऊस आणि 90 ते 110 फ़ुटवे
*4.5 फ़ुट x 10 फ़ुट = 45 चौ फ़ुट, जगणारे 45 ऊस आणि 60 ते 70 फुटवे
*4 फ़ुट x 10 फुटी = 40 चौ फ़ुट, जगणारे 40 ऊस व 55 ते 60 फुटवे
* 3.5 फ़ुट x 10 फ़ुट = 35 चौ फ़ुट, जगणारे 35 ऊस व 50 फुटवे
* 3 फ़ुट x 10 फ़ुट = 30 चौ फ़ुट, जगणारे 30 आणि फुटवे 45 असावेत
**** वरील प्रमाणेच फुटवे असावेत, हे निरिक्षण अत्यंत महत्वाचे आहे.
*कोणत्याही परिस्तिथित फुटवे प्रमाणा पेक्षा जास्त नकोत.
** यासाठी बाळ भरणी महत्वाची.
तरीही सरी किती फ़ुटाचि?
हा प्रश्न उरतोच.
वरील सर्व वाचुन समजाऊन घ्या. चिंतन करा!!!
**मागील अनुभव लक्षात आणा !
ज्या वेळी फुटवे कमी / योग्य होते तेंव्हा त्या त्या वेळी आपल्या ऊसाचि जाडी निश्चितच चांगली होती. हो ना?
*****आठवा!! 7527 हां ऊस!!. याला फ़ुट्व्याचि संख्या फारच कमी होती. हो ना? आता त्याची जाडी आठवा! कशी होती त्याची जाडी? एकदम मस्त ना? याचाच अर्थ फुटवे योग्य किंवा कमी म्हणजे योग्य वातावरणात जाडी जास्त !!!
***** आठवा!!! 86032 हा ऊस!! याला फुट्व्यांची संख्या जास्त असते, हो ना? आता फुटवे जास्त आले असतानाची जाडी आठवा!!! खुपच बारीक ना??? याचाच अर्थ , जेवढे फुटवे जास्त जास्त तेवढे उसाची जाडी बारीक बारीक.
***** आठवा !!! 0265 ऊस!!!! फुटवे मध्यम , जाडी चांगली!!!!
अशी खुप उदाहरणे देता येतील. आपणच निरिक्षण करा.
वरील बाबतीत सर्वच तज्ञ सहमत असतील असे नाही. पण तुमचे स्वत:चे निरिक्षण खोटे असणार नाही. निरिक्षण करा.
"योग्य फुटवे!! उत्तम ट्नेज!!!!
3 रासा खताच्या मात्रा-
एक टन उस निर्मिति साठी मूळ अन्न द्रव्ये किती लागतात. जमिनित शिल्लक किती आहेत ते वजा जाता अपेक्षित उत्पादनासाठी वरुन किती ध्यावे लागतील या साठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने प्रसारित केलेले माती परिक्षणाच्या आधारे अपेक्षित ऊस उत्पादनाचे सूत्र वापरने आवश्यक आहे. पण याचा प्रसार शेतकार्यांपर्यान्त खालेला नाही. माती तपासनीचे रिपोर्ट वेगवेगळे येतात. त्यामुळे शेतकरी ढोबल मानाने आणि एकमेकाचे पाहुन खते देतो.
असंतुलित आणि यावेळी दिलेल्या खताचा वाईटी परिणाम पिकावर आणि जमिनीवर होतो. हे केवळ् योग्य माहिती नसल्यामुळे.
गेली 4 वर्षात खताच्या कीमती यूरिया वगळता दुप्पट टिप्पट वाढल्या आहेत. एवढी purchase power शेतकऱ्यांची नाही. मग स्वस्त मिलाणाऱ्या खाताचा वापर वाढतो , जसे फक्त यूरिया. आणि अति नात्राचा वाईट परिणाम होतो.
4 पाणी व्यवस्थापन -
ऊसाचे मूळ परिसरात जेवढे पाणी उपलब्ध होइल तेवढेच फक्त वापरू शकते. मुलांच्या परिसरावरती अथवा खाली कितीही पाणी असले तरी त्याचा पिकाच्या दृष्टिने फारसा उपयोग होत नाही. दिलेले पाणी मुळाच्या परिसरात कसे राहील यावरच त्या पाण्याची उपयुक्तता अवलंबून असते. अथवा मूळांची वाढ भरपूर ती मुळे जमिनीच्या सर्व थरात कशी खालीवर खोल पसरतील हे पाहिले तरी पाण्याचा वापर योग्य त-हेने होण्यास मोठी मदत होते. भारी जमिनीचा पाण्याचा निचरा होण्याची क्षमता फारच कमी असते. त्यामुळे एकावेळी पाणी जास्त दिल्यास मुळांचे परिसरातील प्राणवायुचे प्रमाण घटल्याने मूळांची कार्यक्षमता एकदम कमी होऊन उभार वाढ खुंटते, नविन फुटवे येत नाहीत. आधी आलेले फुटवे मलूल होतात व् एकंदर पिकाचा जोरच कमी होतो. स-या तुडुम्ब भरुन पाणी वाहू लागेल अशा पद्धतीने पिकाला पाणी दिलेस वर उल्ल्हेख केलेले धोके प्रकर्षाने जाणवतात. माफक व मुरेल तेवढे पाणी एकावेळी पिकाला देणे नेहमीच फायदेशीर ठरते.
परंतु सध्या ज्या पद्धतीने विजेचा पुरवठा होतो त्या मुळे पाण्याचे नियोजन करता येणे शक्य होत नाही. रात्रि 10 नंतर सकाळी 6 वाजेपर्यात नेहमी नेहमी शेतकरी किंवा मजूर कसा पाणी देईल? उत्पादन कमी एण्यात ही एक फॉर मोठी समस्या आहे.
5 पिक संरक्षण आणि सम्पूर्ण व्यवस्थापन-
नव नविन येणार्या कीड़ी रोग आणि त्यावर नियंत्रण ही एक फार मोठी समस्या आहे. अलीकडे याचे प्रामाण फार वाढले आहे. वेगवेगळी महागड़ी औषधे , फवारानी साठी मजूर मिळण्यातील अडचणी ही समस्या आहे.
आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम ऊस उत्पादकतेवर होतो.
Comments
Post a Comment