भुईमुग लागवड नियोजन Groundnut cultivation practices
भुईमुग लागवड अशी कराल ♥प्रगतिशील शेतकरी ♥
सरीवरील भुईमूग लागवडीचे नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥या पद्धतित उंच वरंबे आणि सरी तयार करतात.
♥भुईमूग लागवडीची ईक्रिसॅट म्हणजेच विशीष्ठ पद्धतीने सरी वरंबा आखणी पद्धत जास्त उत्पादनासाठी प्रचलित आहे.
♥या पद्धतीत रुंद वरंबे आणि सरी तयार करतात.
♥120 सेमी अंतरावर 30 सेमी रुंदिचे पाट पाडुन रुंद वरंबे आणि सरी तयार करता येते.
♥गादीवाफ्याप्रमाणे असणार्या वरंब्यावर लागवड करुन सरीद्वारे पाणी देतात.
♥या वरंब्यावर 4 ओळिची लागवड करतात.
♥गादीवाफ्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो.
हवा खेळती राहते.
त्यामुळे उत्पादन अधिक येते.
♥उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते. या हंगामात रोग व किडींचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळतो. उन्हाळी लागवडीसाठी सुधारित वाणाची निवड करावी. 10 फेब्रुवारीपर्यंत पेरणी पूर्ण करावी.
♥भुईमूग लागवडीसाठी बियाण्यांचे प्रमाण ठरविताना निवडलेला वाण, पेरणीची पद्धत, हेक्टरी झाडांची संख्या, 100 दाण्याचे वजन, बियाण्याची उगवणशक्ती यांचा विचार करावा. भुईमूग लागवड करताना हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास तीन ते पाच ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डझिमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
♥लागवडीचे तंत्र
लागवडीसाठी जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखराची पाळी देण्यापूर्वी दहा गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. लागवडीसाठी वरंबे किंवा वाफे तयार करून घ्यावे. उन्हाळी भुईमुगाची पेरणी थंडी कमी झाल्यानंतर 10 फेब्रुवारीपर्यंत पेरणी पूर्ण करावी. पेरणी सरी वरंबा पद्धत किंवा सपाट वाफा पद्धतीने करावी. पेरणी यंत्राने किंवा टोकण पद्धतीने पेरणी पूर्ण करावी. एका ठिकाणी एकच बी पेरावे. बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्यास दोन बियाण्यांतील अंतर कमी करावे. पेरणी दोन ते अडीच इंच खोल करावी. उगवण झाल्यानंतर खांडण्या असल्यास ताबडतोब भरून घ्याव्यात. टीएजी-24 हा वाण 3 x 10 सें.मी. अंतरावर पेरावा. म्हणजे एकरी झाडांची संख्या 1.33 लाख होईल. एसबी-11 हा वाण 30 x 15 सें.मी. किंवा 45 x 10 सें.मी. अंतरावर पेरावा. म्हणजे एकरी झाडांची संख्या 88,888 राहील.
भुईमूग खत व्यवस्थापन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥ पेरणीपूर्वी किंवा भुईमूग पेरताना संपूर्ण रासायनिक खताची मात्रा पिकास द्यावी.
साधारणतः प्रति एकरी 10 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद द्यावे. त्याकरिता एकरी 50 किलो अमोनिअम सल्फेट किंवा 22 किलो युरिया अधिक 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे.
♥ पीक 50 टक्के फुलोरावस्थेत असताना तज्ज्ञांचा सल्ला आणि माती परीक्षण अहवालानुसार हेक्टरी 300 ते 500 किलो जिप्सम तासाच्या दोन्ही बाजूला सरळ ओळीमध्ये मिसळावे.
जिप्सममधून 24 टक्के कॅल्शिअम व 18 टक्के गंधक पिकास मिळते.
♥ भुईमुगास नत्र, स्फुरद आणि पालाशच्या खालोखाल कॅल्शिअम आणि गंधकाची आवश्यकता असते.
तसेच झिंक, बोरॉन, लोह आणि मॅग्नेशिअम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासते.
रासायनिक खतासोबत एकरी चार किलो झिंक सल्फेट वर्षातून एकदा आणि हलक्या प्रतीच्या जमिनीस तीन वर्षांतून एकदा बोरॅक्स दोन किलो द्यावे.
उभ्या पिकात सूक्ष्म पोषण द्रव्यांची कमतरता आढळून आल्यास शिफारशीनुसार त्यांची पूर्तता फवारणीद्वारे करावी.
संकलित!
♥आंतरमशागत
पीक साधारणतः सहा ते सात आठवड्यांचे होईपर्यंत तणविरहित ठेवावे.
त्याकरिता तीन वेळा डवरणी आणि आवश्यकतेनुसार दोन ते तीन वेळा निंदणी करावी.
पीक साधारणतः 50 दिवसांचे झाल्यानंतर मातीची भर देण्याकरिता शेवटची डवरणी करावी.
नंतर मोठे तण उपटून घ्यावे.
आऱ्या सुटल्यानंतर आंतरमशागत करू नये.
भुईमुग पाणी व्यवस्थापन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥ पेरणीपूर्वी पाण्याची पहिली पाळी द्यावी.
वाफसा आल्यावर पेरणी करून लगेच पाण्याची दुसरी पाळी द्यावी.
♥ उगवण झाल्यावर खांडण्या असल्यास त्या भरून घ्याव्या व नंतर पाण्याची तिसरी पाळी द्यावी.
नंतर पाण्याचा ताण द्यावा.
म्हणजे साधारणतः 20-25 दिवस पिकास पाण्याची पाळी देऊ नये.
यामुळे एकदम फुले येण्यास मदत होते.
♥ त्यानंतर पाण्याची चौथी पाळी देऊन ताण तोडावा. पुढे पाण्याची कमतरता पडू नये.
तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे भुईमुगास मानवते.
सर्व पिकास समप्रमाणात पाणी मिळेल याची खबरदारी घ्यावी.
(सुचना-भुईमुग पाणी व्यवस्थापण करताना पावसाचे पाणीनुसार बदल करावा!)
संकलित!
♥ साधारणतः फेब्रुवारी महिन्यात 10, मार्च महिन्यात 8, एप्रिल महिन्यात 6-8 आणि मे महिन्यात 4-6 दिवसांनी पिकास ओलीत करावे.
♥वाणांची निवड
👉टीएजी-24 -
उन्हाळी हंगामात हा वाण लवकर (110-115 दिवसांत) परिपक्व होतो. याचे झाड मध्यम उंच आणि विस्तार कमी असतो. शेंडेमर रोगास प्रतिकारक आहे. बियाण्यास सुप्तावस्था नाही. दाण्याचा रंग गुलाबी, उतारा 70 ते 74 टक्के, तेलाचा उतारा 50 ते 51 टक्के, वाळलेल्या शेंगांचे सरासरी उत्पादन 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. हा वाण आंतरपिकास योग्य आहे.
👉एसबी-11 -
याचे झाड जोमदार उभट वाढते. मध्यम कालावधीचा वाण, उन्हाळी हंगामात 115-120 दिवसांत परिपक्व होतो. सुप्तावस्था नाही. शेंगांतील दाण्याचे प्रमाण 72-76 टक्के, तेलाचे प्रमाण 50-51 आहे, शेंगांचे सरासरी उत्पादन 14 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.
संकलित!
Comments
Post a Comment