काकडीवरील पांढरी माशी, थ्रीप्स नियंत्रण
काकडीवरील पांढरी माशी, थ्रीप्स नियंत्रण 🇮🇳प्रगतिशील शेतकरी 🏆
👉बीजप्रक्रिया - इमिडॅक्लोप्रिड 5 ग्रॅम किंवा कार्बोसल्फान 30 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी.
👉लागवडीचे वेळी शेतात निंबोळी पेंड हेक्टरी 400 ते 500 किलो मिसळावी. रासायनिक खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे द्याव्यात.
📌 नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात देऊ नयेत.
👉रस शोषणाऱ्या किडी आणि सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी 📌कार्बोफ्युरान 33 किलो किंवा
📌फोरेट 20 किलो प्रति हेक्टरी प्रत्येक रोपाभोवती रोपे उगवल्यानंतर रिंग पद्धतीने टाकून मातीने झाकावे.
👉लागवडीनंतर पिकावर 2-3 पाने दिसू लागताच आणि फळे येण्यापूर्वी रस शोषणाऱ्या किडींसाठी खालीलपैकी एक किंवा दोन कीटकनाशकांची फवारणी 10 ते 15 दिवसाचे अंतराने 2 ते 3 वेळा करावी.
📌मिथील डिमेटॉन 10 मि. लि. किंवा
📌डायमेथोएट 10 मि. लि. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉 नवीन कीटकनाशकामध्ये प्रयोगातून परिणामकारक असलेले 📌इमिडॅक्लोप्रिड 4 मि. लि. किंवा
📌ट्रायऍझोफॉस 20 मि. लि. 10 लिटर पाण्यातून फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने किंवा गरजेनुसार करावी.
👉फळे आल्यानंतर खालील कीटकनाशकांची फवारणी 10 ते 15 दिवसांचे अंतराने किंवा गरजेनुसार करावी.
👉जैविक कीटकनाशकामध्ये
📌व्हर्टिसिलियम 20 ग्रॅम 10 लिटर पाणी किंवा
📌निंबोळी अर्क 4 टक्के (4 किलो निंबोळी 100 लिटर पाणी) .
👉लाल कोळी या किडींसाठी खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने गरजेनुसार करावी.
📌व्हर्टिसिलियम 20 ग्रॅम किंवा
📌केलथेन 20 मि. लि. 10 लिटर पाण्यातून किंवा
📌निंबोळी अर्क 4 टक्के (4 किलो निंबोळी 100 लिटर पाणी).
👉नवीन कोळीनाशकामध्ये प्रयोगातून परिणामकारक असलेले
📌 व्हर्टिमेक 4 मि. लि. किंवा
📌 इथिऑन 10 मि. लि. 10 लिटर पाण्यातून गरजेनुसार फवारावे.
Comments
Post a Comment