मोसंबी लागवड

मोसंबी लागवड 🇮🇳प्रगतिशील शेतकरी 🏆

👉मोसंबी पिकासाठी मध्यम काळी, उत्तम निचऱ्याची, साधारणतः एक मीटर खोल असलेली जमीन चांगली असते.
👉 दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुन्याचे प्रमाण असलेल्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये.
👉जमिनीचा सामू 6 ते 8 च्या दरम्यान असावा.
👉 फार हलक्‍या जमिनीत लागवड केल्यास झाडांची वाढ खुंटते व एकूण भरखते व वरखतांची मात्रा जास्त प्रमाणात वापरावी लागते.
👉 मोसंबीमध्ये न्युसेलर ही जात प्रचलित आहे.
👉तसेच राजा पिंपरी, मुदखेड या जातीही चांगले उत्पादन देतात.
👉रंगपूर खुंटावर केलेली कलमे लागवडीसाठी निवडावीत.
👉मोसंबीची लागवड करण्यासाठी 6 X 6 मीटर अंतरावर 60 सें.मी. X 60 सें. मी. X 60 सें.मी. आकाराचे खड्डे घेऊन
त्यात 2 पाटी चांगले कुजलेले शेणखत,
500 ग्रॅम स्फुरद मातीत मिसळून खड्डे भरून घ्यावेत.
👉 जून - जुलै महिन्यांत पाऊस पडल्यानंतर कलमे लावावीत.
👉कलमांची लागवड करताना डोळा बसवलेला भाग जमिनीपासून 15 ते 20 सें.मी. वर राहील याची काळजी घ्यावी.
👉वखराच्या पाळ्या देऊन बाग वेळोवेळी स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.
👉पूर्ण वाढलेल्या झाडास 50 कि.ग्रॅ. शेणखत,
800 ग्रॅम नत्र,
400 ग्रॅम स्फुरद,
400 ग्रॅम पालाश दरवर्षी द्यावे.
नत्र खत दोन वेळा विभागून द्यावे.
स्फुरद, पालाश व अर्धे नत्र ताण पूर्ण झाल्यानंतर द्यावे.
उरलेले नत्र फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावे.
👉पाणी देताना झाडाच्या बुंध्यास लागणार नाही याची काळजी घ्यावी. 👉साधारणपणे जमिनीच्या मगदुरानुसार पावसाळ्यात जेव्हा गरज पडेल तेव्हा पाणी द्यावे.
👉 हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांनी द्यावे.
👉उन्हाळ्यात 6 ते 8 दिवसांच्या अंतराने द्यावे.
👉पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास फायदेशीर ठरते.
👉मोसंबी बागेतील रसशोषक किडींचे करा नियंत्रण
📌मोसंबीच्या मृग बहराची फळे वाढीच्या अवस्थेत आहेत.
📌या फळांचा आकार वाढविण्याकरिता जिबरेलीक आम्ल अधिक पोटॅशियम नायट्रेट १५०० किलोग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
📌मृग बहराच्या फळावर मोठ्या प्रमाणात कोळी या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.
📌या किडीच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल १.५ मिलि किंवा इथिऑन २ मिलि अथवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी घेऊन १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
📌बहुतांश मोसंबी उत्पादक पट्ट्यामध्ये मोसंबीच्या झाडास डिंक्‍याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
अशा ठिकाणचा डिंक पूर्णपणे खरडून बागेबाहेर टाकावा व ताबडतोब बोर्डोपेस्ट लावून घ्यावी.
झाडाखाली २५ ग्रॅम कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड प्रति १० लिटर पाणी घेऊन आळवणी करावी.
📌बऱ्याच मोसंबी बागांमध्ये फळे पोखरणाऱ्या अळीची विष्ठा झाडावर पडलेली दिसून येत आहे. याकरिता झाडाच्या अशक्त, रोगट फांद्यांचा नायनाट करावा.
📌मुख्य खोडाला ज्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव असेल तेथे डायक्‍लोरव्हॉस ५ मिलि प्रति लिटर पाणी घेऊन इंजेक्‍शनद्वारे छिद्रात सोडावे.
📌 याच औषधाची २ मिलि प्रति लिटर पाणी घेऊन झाडावर फवारणी करावी.
📌 बागांमध्ये फुलकिडे व मावा या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहेे. या किडींची पिल्ले व प्रौढ या दोन्ही अवस्था कळ्या, फुले व पानातून रस शोषण करतात.
नियंत्रणासाठी फिप्रोनिल २० मिलि अथवा स्पिनोसॅड ३.५ मिलि प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
📌पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांनी आंबे-बहराचे नियोजन करावे.
📌अन्य बागायतदारांनी पाण्याची कमतरता असल्यास झाडे मरू नये म्हणून ५० टक्के फळे व २५-३० टक्के फांद्याची विरळणी करावी.
📌मोसंबी झाडे जगविण्याच्या दृष्टीने ताबडतोब जमिनीलगत गवत, भुसा, प्लॅस्टिक कागद इत्यादीचे आच्छादन करावे.
📌 मृग बहर घेतलेल्या शेतकऱ्यांनी आंबे बहराचे नियोजन करू नये. अन्यथा झाड अशक्त होऊन दगावण्याची भीती असते.
📌पाण्याची कमतरता असणाऱ्या शेतकऱ्यांनी बहर घेण्यापेक्षा झाडे जगविण्यावर अधिक भर द्यावा.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!