शेळीपालन यशोगाथा Success story of Goat Farm
सांगलीच्या तेजस लेंगरेची यशोगाथा♥प्रगतशील शेतकरी♥
♥150 शेळ्यांच्या माध्यमातून वर्षाला 20 लाखांची उलाढाल..
●सांगली जिल्ह्यातल्या बामणीचे लेंगरे कुटूंब मुळत: मेंढपाळ. घरची परिस्थिती बदलली आणि घरच्यांवर मोलमजुरी करण्याची वेळी आली.
●१९९९ साली तेजस १० वी उत्तीर्ण झाला.
पिकअप गाडी विकत घेउन मालवाहतूक करु लागला आणि इथचं त्याचा संबंध पुन्हा आला आपल्या परंपरागत व्यवसायाशी आला.
●साताऱ्यातील फलटन इथला एक शेळीपालन व्यवसाय त्यानं पाहीला आणि
त्याला शेळीपालनातून समृध्दीचा त्याला मार्ग सापडला.
●150 शेळ्या आणि वर्षाकाठी 20 लाखांची उलाढाल२००६ साली तेजसनं
आफ्रिकन बोअर जातीचा एक नर आणि एक मादी खरेदी केली आणि
शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली.
●सुरुवातीला माद्या तशाच ठेऊन अतिरिक्त नरांची तो विक्री करायचा.
त्यामुळं शेळ्याच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत राहीली.
दोन शेळ्यांपासून सुरु केलेला तेजसचा हा शेळीपालनचा व्यवसाय आज १५० शेळ्यांवर येऊन पोहचला आहे आणियातून तेजस तब्बल 20 लाखांची उलाढाल करतो.
●व्यवसाय जसा वाढला तसं तेजसचं लहान शेड कमी पडू लागलं.
त्यामुळं तेजसनं १३० बाय ५० फूट लांबीचं नविन शेड उभारलं.
त्यात नर, माद्या आणि लहान पिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली.
लोखंडी पट्ट्यां वापरून गाळे बंदिस्त केले.
खाद्य देण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली.
जमिनीवर शहाबादी फरशी वापरली.
त्यामुळं गोचिड आणि पिसवांचा त्रास कमी झाला.

●२० गुंठ्यात चारा पिकाची लागवड
तेजसकडं सध्या लहान मोठ्या मिळून १५० शेळ्या आहेत.
चाऱ्यासाठी शेजारील २० गुंठ्यावर चारा पिकाची लागवड केली आहे.
दिवसातून तीन वेळा या शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार चारा दिला जातो.
तसंच पाण्यातून प्रथिनं पावडर दिली जाते.
त्यामुळं शेळ्यांच्या वजनात वाढ होते.

●२१ दिवसांनंतर जंताचे औषध दिले जातं.
तर दर तीन महिन्यांतून एकदा लसीकरण केले जातं.
त्यामुळं या शेळ्या रोगांना बळी पडत नाही.

●आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्या, नर, मादी आणि पिलांसाठी स्वतंत्र शेडतेजसनं शेळ्याची अत्यंत चांगल्या पध्दतीनं जोपासना केली आहे.
त्यामुळं इथले नर धष्टपुष्ट आहेत. आफ्रिकन बोअर जातीत जुळे पिलं होण्याचं प्रमाण जास्त आहे. तसंच या जातीच्या नरांचे वजन दीड वर्षात १२० किलोपर्यंत होते. त्यामुळं तेजसला अधिक उत्पादन मिळतं.

●ईदीचे बोकड लाखाच्या घरात
बकरी ईदला यातील नरांचे तेजसला ७० हजार ते १ लाखांपर्यंत पैसे मिळतात.
तसंच इतर शेळ्यांची तेजस दर तीन ते साडेतीन महिन्यांनी प्रजननासाठी विक्री करतो. त्यातून त्याला दीड हजार रुपये किलोच्या दरानं पैसे मिळतात आणि यासाठी त्यालाबाजारपेठ शोधावी लागत नाही.
तर व्यापारी जागेवर येऊनच या शेळ्या घेउन जातात.
मागील वर्षी तेजसनं २५ नर आणि ३५ माद्यांची विक्री केली.
त्यातून त्याला २० लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं.
यातून ५ लाखांचा उत्पादन खर्च वजा जाता तेजसला १५ लाखांचा निव्वळ नफा झाला. यासोबतच २२ ट्रॉली लेंडीखताच्या विक्रीतून अतिरिक्त ५० हजारांचं उत्पन्न मिळालं.

Comments
Post a Comment