सुक्ष्म अन्नद्रव्ये
सुक्ष्म अन्नद्रव्ये
पिकाच्या परिपुर्ण वाढीसाठी ५० पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात लागणा-या अन्नद्रव्यांना सुक्ष्म अन्नद्रव्ये म्हणुन ओळखले जाते.
■झिंक
फेरस (लोह)
बोरॉन
मँगनीज
कॉपर
मॉलेब्डेनिय
झिंक (जस्त)
झिंकचे पिका मधिल कार्य -
ऑक्झिन्स च्या निर्मितीमध्ये गरजेचे अन्नद्रव्य. प्रामुख्याने इंडॉल असेटिक असिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वा जोमदार होण्यात मदत मिळते.
प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते. तसेच पिकामधिल शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे.
झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे.
झिंक बिज (सीड) आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते.
झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे.
पिकाच्या पेशीमधिल योग्य प्रमाणातील झिंक च्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखिल तग धरुन राहते.
झिंकच्या उपल्धतेवर परिणाम करणारे घटक-
जमिनीचा सामु- मातीचा सामु जास्त असल्यास झिकची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही, असिडीक स्वरुपातील झिंकचा वापर करुन हि कमतरता दुर करता येते.
झिंक आणि स्फुरद (फॉस्फोरस) चे गुणोत्तर - जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते. नत्राची कमी प्रमाणातील उपल्बधता पिकाच्या वाढीवर करित असलेल्या दुष्परिणांमुळे ईतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, हाच परिणाम झिंक वर देखिल लागु पडतो.
सेंद्रीय पदार्थ - जमिनीतील सेंद्रीय पदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात.तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे इनऑरगॅनिक स्वरुपातील जस्ताचे चिलेशन होवुन त्याची पिकास उपल्बधता वाढते. जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपल्बधता कमी होते.
झिंक व कॉपर चे गुणोत्तर - पिक झिंक व कॉपर एकाच पध्दतीने शोषुन घेत असल्या कारणाने जर एकाचे प्रमाण वाढले तर दुस-याची कमतरता जाणवते.
झिंक व मॅग्नेशियमचे गुणोत्तर - मॅग्नेशियमच्या वापराने झिंक चे पिकाद्वारा शोषण वाढते.
जस्त (झिंक) Zn चे विविध स्त्रोत
उत्पादन रासायनिक फॉर्म्युला सर्वसाधारण झिंकचे प्रमाण
झिंक सल्फेट ZnSO4-H2O 36%
झिंक ऑक्झि सल्फेट Zn0-Zn SO4 38-50%
झिंक ऑक्साईड ZnO 50-80%
झिंक क्लोराईड ZnCl2 50%
झिंक (इ.डी.टी.ए.) चिलेट ZnEDTA 6-14%
झिंक ( एच.ई.डी.टी.ए.) चिलेट ZnHEDTA 6-10%
■फेरस (लोह)
फेरस (लोह) चे पिकातील कार्य –
हरीत लवक निर्मितीत आणि हरीतलवकाच्या कार्यात गरजेचे
पिकातंर्गत उर्जेच्या वहनासाठी गरजेचे
काही एन्झाईम्स व प्रोटीन्सचा घटक आहे.
पिकातंर्गत अन्ननिर्मितीसाठी आणि चयापचयाच्या क्रियेत गरजेचे आहे.
सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या क्रियेत गरजे आहे.
फेरस (लोह) उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक –
जमिनीचा सामु – जास्त सामु असलेल्या जमिनीतील कार्बोनेटस् मुळे देखिल फेरसची उपलब्धता कमी होते.
रस स्फुरद संबंध – जास्त प्रमाणातील स्फुरदमुळे फेरसची उपलब्धता कमी होते.
नायट्रेट नत्राच्या वापारामुळे पिकातील धन-ऋण भार (अनायन-कॅटायन) असंतुलन निर्माण होवुन फेरसची उपलब्धता कमी होते.
फेरस मँगनीज संबंध – दोन्ही मुलद्रव्य विरोधात असल्याने एकाची जास्त उपलब्धता दुस-याची उपलब्धता कमी करते.
रस मॉल्बडेनियम – जास्त प्रमाणातील मॉल्बडेनियम मुळे पिकाच्या मुळांवर आयर्न मॉल्बडेट चा थर तयार होतो.
फेरसचे विविध स्रोत
प्रकार फेरसचे प्रमाण
फेरस सल्फेट 20%
फेरस अमोनियम सल्फेट 14%
आयर्न डीटीपीए चिलेट 10%
आयर्न एचईडीटीए चिलेट 5-12%
■ बोरॉन
बोरॉन पिकास शर्करा आणि स्टार्च यांत संतुलन साधते.
पिकातील शर्केरेच्या आणि कर्बोदकांच्या वहनात गरजेचे आहे.
परगीभवन आणि बीज (सीड प्रोडक्शन) निर्मितीत गरजेचे आहे.
नियमित पेशी विभाजन, नत्राच्या चयापचयात आणि प्रथिनांच्या चयापचयात गरजेचे आहे.
नियमित पेशी भित्तिका तयार होण्यात गरजेचे आहे.
पिकांतर्गत जल व्यवस्थापनात गरजेचे आहे.
बोरॉनच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक –
सामु – जास्त सामु बोरॉन ची कमतरता निर्माण करते.
जास्त प्रमाणात जमिनीत पाणी झाल्यास बोरॉन वाहुन जाते व बोरॉन ची कमतरता जाणवते.
बोरॉनचे विविध स्रोत –
प्रकार बोरॉन चे प्रमाण
बोरॅक्स 11%
बोरीक असिड 17%
सोडीयम टेट्राबोरेट 10-20%
सोल्युबोर 20%
■मँगनीज
मँगनीज चे पिकातील कार्य –
प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डाय ऑक्साईडचे रुपांतर शर्करेमध्ये होण्यात कार्य करते.
हरीत लवक निर्मितीत आणि नायट्रेट असिमिलेशन (वापर) मध्ये कार्य करते.
कॅल्शियम आणि बोरॉन सोबत पेशी विकसित होण्यासाठी आवश्यक
राबोफ्लॅविन, अस्कोर्बीक असिड, आणि कॅरोटीन तयार करण्यात गरजेचे आहे.
प्रकाश संश्लेषण क्रियेत ईलेक्ट्रॉन ची देवाण घेवाण करण्यात गरजेचे आहे. तसेच पाण्याचे विघटन करण्यात गरजेचे आहे.
मँगनीज पिकास उपलब्ध होण्यावर परिणाम करणारे घटक –
जमिनीचा सामु – मातीचा जास्त सामु (पीएच) मँगनीजची उपलब्धता कमी करते, तर कमी सामु वाढवते.
सेंद्रिय पदार्थ – जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत मँगनीज त्या पदार्थांसोबत स्थिर होते व त्याची कमतरता जाणवते.
मँगनीज फेरस संबंध- जास्त प्रमाणातील फेरस (लोह) मँगनीजची उपलब्धता कमी करते.
मँगनीज सिलिकॉन संबंध – सिलिकॉनच्या वापराने मँगनीजची विषबाधा कमी करता येते.
नत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते.
मँगनीज चे विविध स्रोत –
प्रकार मँगनीजचे प्रमाण
मँगनीज सल्फेट 23-28%
मँगनीज ऑक्साईड 41-68%
चिलेटेड मँगनीज 5-12%
■कॉपर
कॉपर चे पिकातील कार्य –
कॉपर पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेत आणि श्वसनाच्या क्रियेत उत्तेजक म्हणुन कार्य करते.
अमिनो असिडचे रुपांतर प्रोटीन्स (प्रथिने) मध्ये करणा-या काही एन्झाईम्स चा घटक आहे.
कॉपर कर्बोदके (कार्बोहायड्रेटस) आणि प्रथिनांच्या पचनात गरजेचे आहे.
पिकाच्या पेशीला ताकद आणि सुरक्षा प्रदान करणा-या लिग्निनच्या निर्मितीसाठी कॉपर अत्यंत गरजेचे आहे.
कॉपर फळांच्या टीकाऊ क्षमतेवर, चव आणि शर्करेच्या प्रमाणावर देखिल नियंत्रण करते.
मँगनीज पिकास उपलब्ध होण्यावर परिणाम करणारे घटक –
जमिनीचा सामु – मातीचा जास्त सामु (पीएच) मँगनीजची उपलब्धता कमी करते, तर कमी सामु वाढवते.
सेंद्रिय पदार्थ – जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत मँगनीज त्या पदार्थांसोबत स्थिर होते व त्याची कमतरता जाणवते.
मँगनीज फेरस संबंध- जास्त प्रमाणातील फेरस (लोह) मँगनीजची उपलब्धता कमी करते.
मँगनीज सिलिकॉन संबंध – सिलिकॉनच्या वापराने मँगनीजची विषबाधा कमी करता येते.
नत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते.
पिकावर कॉपर युक्त बुरशीनाशकांची सतत फवारणी होत असते त्यामुले देखिल कॉपर ची गरज भागुन निघते. याशिवाय विविध स्त्रोत खाली देत आहोत.
कॉपर चे विविध स्रोत –
प्रकार कॉपरचे प्रमाण
कॉपर सल्फेट मोनो हायड्रेट 35%
कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट 25%
क्युप्रिक ऑक्साईड 75%
कॉपर क्लोराईड 17%
कॉपर चिलेटस् 8-13%
Comments
Post a Comment