उन्हाळी भाजीपाला पिकांची काळजी अशी घ्या, गारपिटीनंतर घ्यावयाची काळजी Summer Vegetable crop Management, Crop Management after Snow fall
शेती सल्ला:
♥उन्हाळी भाजीपाला पिकांची काळजी अशी घ्या:

कांदा, मिरची, वांगी, भेंडी, कारली, दोडका, टरबूज, काकडी,गवार,मेथी,अंबाडी,चुका,पालक, कोथिंबीर व दुधी भोपळा या उन्हाळी भाजीपाल्याच्या लागवडी पूर्ण कराव्यात.
या महिना अखेर बटाटे काढणीस तयार होतात . ती काढून थंड जागेत झाकून ठेवावी म्हणजे त्यात किडींना अंडे घालण्यास अवसर मिळणार नाही. रताळी जुनी काढणी व नवीन लागवड करावी.

♥गारपिटीनंतर घ्यावयाची काळजी –
१) गारपीटीनंतर हवेत थंडावा निर्माण होतो. थंडीपासून फळबागेचे संरक्षण करणेसाठी त्याचदिवशी बागेस विहीरीचे पाणी देऊन हलके हलके ओलीत करावे.
२) द्राक्षे किंवा बोर बागेची फळगळ झाली असल्यास तात्काळ स्वच्छता करावी.
३) ऊस, ज्वारी पिकाची पड झाली असल्यास पीक बांधणी करावी.
४) बागेभोवती बांधावर काडीकच-याचे ढीक करून ते पेटवून शेकोट्या कराव्यात.
५) झाडाच्या खोडाभोवती व आळ्यात गवत, पालापाचोळा इ.चे जमिनीवर आच्छादन करावे.

♥विशेष –
१) विविध पिकांच्या लागवडी संबंधी अद्ययावत शास्त्रीय माहिती शेतक-यांना व्हावी म्हणून शेतकरी मासिकाचे जास्तीतजास्त वर्गणीदार व्हा. तसेंच सर्व कृषि विद्यापिठाने प्रकाशित केलेली कृषि दर्शनी २०१६ आपल्या माहितीसाठी संग्रही ठेवा.
२) दुरदर्शनवरील सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ६.३० वाजता प्रक्षेपित केला जाणारा आमची माती आमची माणसे हा कार्यक्रम पाहा.
३) ABP माझावरील ७/१२ च्या बातम्यां दररोज सकाळी ६:४५ वाजता तर अग्रोवन साम टीव्ही वर सकाळी ७:०० वाजता पहा.

Comments
Post a Comment