आनंद यात्री

■आनंदयात्रा

♡सहज एकदा फेरफटका मारताना  वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?
♥मी म्हटलं अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया"पण माहेरपणाला आल्ये
तस तोंड फिरवून निघून गेला।

♡पुढे बाजारात "चिडचिड" गर्दीत उभी दिसली
खर तर हि माझी बालमैत्रीण
♥पण पुढे कौलेजात "अक्कल" नावाचा मित्र भेटल्यावर हिच्याशी संपर्क तुटला
♡आज मला पाहून म्हणाली अरे "किटकीट" आणि "वैताग" ची काय खबरबात ?
♥मी म्हटलं," काही "कल्पना" नाही बुवा हल्ली मी "भक्ती"ला कामावर ठेवल्यामूळे "आनंदा"त आहे"

♡पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला
♥मी नुकतीच "बोर" विकत घेतली होती "गंमत" म्हणून
माझं अन त्याच हाडवैर अगदी 36 चा आकडा
मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला
♥मी हि मग मुद्दाम "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो

♡पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"
♥मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास?
आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी"
♡तस "लाजून" म्हणालं, "अरे पाचवीला पडलो(पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात, कस काय सर्व ? घरचे मजेत ना?". 
♥मी म्हणालो, "छान आहे सर्व. "श्रद्धा" आणि "विश्वास" असे दोन भाडेकरू ठेवलेत त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस".
हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.

♡थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला हिणवत होत, "धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय आज श्रीमती सोनावणे (श्रीमंती सोनेनाणे) यांच्याकडे जेवायला जायचंय".
♥मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झाली रे. एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकट पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधल्ये माझी "शांती" आणि मूलाच नाव 'समाधान" ठेवलंय."
तसं हसलं माझ्याकडे पाहून आणि परत पाठ फिरवून निघून गेलं माझा मित्र "मत्सर"च्या हातात हात घालून अन मला "इर्षे"च्या विळख्यात ढकलून.

😊😊😊😊😊😊

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!