सेंद्रिय शेतक-यांची प्रतिज्ञा
सेंद्रिय शेतक-यांची प्रतिज्ञा
♥भारत माझा देश आहे.
♥सारे भारतीय माझे बांधव आहेत.
♥माझ्या शेतीवर माझे प्रेम आहे.
♥माझ्या देशातील पुरुष व स्त्रियांना समान हक्क असेल.
♥माझ्या देशातील पारंपारिक बि-बियाणे आणि विविधतेने नटलेल्या संस्कूतिचा मला अभिमान आहे.
♥त्या पारंपारिक बि-बियाणे व सेंद्रिय शेतीची संरक्षण करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
♥मी माझ्या शेतातील किंवा आजुबाजुला उपलब्ध असलेल्या पशुपक्षी,वनस्पती,प्राणी,सुक्ष्मजीवजीतू व सेंद्रिय बि-बियाणे यांचे संरक्षण करीन.
♥मी पाण्याचा योग्य वापर करीन व जलाचरांचे संवर्धन करील.
♥मी सेंद्रिय खते व बि-बियाणे तयार करून त्याचाच वापर करील व जमिनीला जिवंत ठेविल.
♥मी माझ्या सेंद्रिय शेतीत विषारी औषधी रासायनिक खते तसेच जिनात्मक प्रक्रिया केलेले बीज वापरणार नाही व बिज प्रक्रियासाठी नैसर्गिक व पारंपारिक पदार्थांचाच वापर करीन.
♥माझी सेंद्रिय शेती व माझॆ सेंद्रिय शेतकरी बांधव याच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे.
♥त्यांचे कल्याण आणि त्यांचा विकास ह्यातच माझे सौख्य सामावलेले आहे.
संकलित।
Comments
Post a Comment