ऊस लागवड
ऊस लागवड 🇮🇳प्रगतिशील शेतकरी 🏆
👉वर्षभरातील विविध हंगामात उसाची लागवड केली जाते, हंगामावरून केल्या जाणार्या लागवडीवरून
1)सुरु,
2)आडसाली व
3)पूर्व हंगामी अशी नावे देण्यात आली आहेत.
👉उस लागवडीसाठी खालीलप्रमाणे लागवड हंगाम निवडावा-
1) सुरू- १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी.
2) पूर्वहंगामी-१५ आक्टोबर ते १५ नोव्हेंबर.
3) अडसाली- १५ जूलै ते १५ आगस्ट.
👉सुचविलेल्या फुले २६५, कृष्णा, ८६०३२ (नीरा) या तीनही जाती उत्कृष्ट आहेत
👉परंतु आपण महाराष्ट्रातील कोणत्या भागात उस लागवड करणार आहोत हे लक्षात घेऊन योग्य जात निवडावी.
👉तसेच आपण ज्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येता त्या कारखान्याची शिफारस लक्षात घ्यावी.
👇ठिबक सिंचनाचे फायदे तर आहेतच पण तोटे आधिच अधोरेखित करावे...
तोटे खालील प्रमाणे-
१. उसास आग लागल्यास ठिबक सिंचानावरील खर्च वाया जाण्याची शक्यता असते.
२. ठिबक सिंचन प्लास्टिक पासून बनवला जात असल्याने त्याच्या अंतिम काळात त्यापासून प्लास्टिक प्रदूषण होते.
३. सिंचानासाठीच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास ठिबक संच चालवणे त्रासदायक ठरू शकते.
४. ठिबक संच हा दर ८-१० वर्षांनी नवीन विकत घ्यावा लागतो.
५. एका शेतात वापरलेला किंवा एका पिकासाठी वापरलेला संच दुसर्या शेतात किंवा दुसर्या पिकासाठी वापरणे त्रासदायक ठरू शकते.
६. ठिबक संच बसवणे खर्चिक बाब आहे.
७. संच चालवण्यासाठी संच चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
८. संच चालवण्याकरिता उर्जेची गरज असते. काही ठिकाणी गुरुत्व पद्धतीने पाट पाण्याद्वारे उसास पाणी दिले जाते, अशा ठिकाणी उर्जेची गरज नसते.
👉उसाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे वापर होण्यासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे प्रयोग घेण्यात आले.
👉त्यामध्ये पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास इतर पद्धतींपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे दिसून आले. या पद्धतीत खतमात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी लागते.
👉पहिली खतमात्रा खोडवा ऊस तुटल्यानंतर वाफसा आल्यावर 50 टक्के रासायनिक खताची शिफारशीत मात्रा (सूक्ष्म अन्नद्रव्यांच्यासह) पहारीच्या साहाय्याने बेटापासून 15 सें.मी. अंतरावर आणि 10 ते 15 सें.मी. खोल छिद्र घेऊन उसाच्या एका बाजूस द्यावी.
👉 दोन छिद्रांमधील अंतर 30 सें.मी. ठेवावे. दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी.
👉पहारीच्या साह्याने खते देण्याच्या पद्धतीचे फायदे -
खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते, त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते.
👉दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध कमी येत असल्याने हवेद्वारे फार कमी प्रमाणात खतांचा ऱ्हास होतो.
👉खत जमिनीत गाडल्यामुळे वाहून जात नाही.
👉तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो आणि खुरपणीवरील खर्चात 50 ते 75 टक्के बचत होते.
👉 रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन पिकाची जोमदार वाढ होते आणि भरघोस उत्पादन मिळते.
👉सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते, त्यामुळे सर्वत्र एकसारख्या प्रकारचे पीक येते आणि ऊस उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.
👉या पद्धतीत आपण एकावेळी एकाच बाजूने खते वापरत असल्याने, तसेच खते खोडापासून दूर असल्याने विरुद्ध बाजूस उपयुक्त जिवाणू नेहमीप्रमाणे वाढत राहतात.
👉रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. पीकवाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होते.
Comments
Post a Comment