मूगाच्या जाती
मुग जाती ♥प्रगतशील शेतकरी♥
♥एस ८ : ही जात ६० ते ६५ दिवसात तयार होणारी असून खरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये घेत येते. उत्पादन एकरी ४.५क्विंटल पर्यंत मिळते.
♥बी. एम. ४ : ही जात ६५ ते ७० दिवसात काढणीस येते. विशेष म्हणजे ही जात करपा रोगास प्रतिबंधक असून दाणे हिरवे, मध्यम आकाराचे असतात. महाराष्ट्र, गुजरात तसेच मध्यप्रदेशमध्ये लागवडीस योग्य जात आहे. एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन मिळते.
♥के ८५१ : निमपसरट वाढ होत असून दाणे मोठे असतात. लागवडीपासून ६० ते ६५ दिवसात काढणीस येते. महाराष्ट्रामध्ये लागवडीस योग्य. एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन मिळते.
♥मूगाच्या वैभव, कोपरगाव, फुले एम. २, एस. ८, बी.एम. ४, के. ८५१ या जाती आहेत .
♥वैभव : ही जात ७० ते ७५ दिवसात काढणीस येते. याचे दाने आकर्षक, हिरवे, टपोरे असतात. भुरी रोगास प्रतिकारक्षम असते. एकरी उत्पन्न ४.५ ते ५.५. क्विंटल येते.
♥कोपरगाव : ही जात ६० ते ६५ दिवसात काढणीस येते. याचे दोने आकर्षक, टपोरे, हिरवे चमकदार असतात. ही जात भुरी रोगास बळी पडते. महाराष्ट्रात लागवडीसाठी चांगली आहे. एकरी उत्पन्न ३ ते ४ क्विंटल येते.
♥फुले एम. २ : ही जात ६० ते ६५ दिवसात काढणीस येते. याचे आकर्षक मध्यम, हिरवे दाणे असतात. खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी योग्य आहे. ४.५ ते ५ क्विंटल एकरी उत्पादन येते.
संकलीत!
Comments
Post a Comment