चुरडा मुरडा नियंत्रण असे करावे

चुरडा मुरडा नियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥
रोगकिडीच्या प्रकारानुसार फवारण्या घ्याव्यात.

♥पानावर पांढरीमाशी, फुलकिडे, मावा, या रस शोषण करणा-या किडीच्या प्रादुर्भाव दिसून येत असल्यास सदर किडीच्या नियंत्रणासाठी -
( फवारणी पानांच्या दोन्ही बाजुंनी)

♥1.एन्डोसल्फान 10 मिली + अँसिफेट 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

♥2. दुसरी फवारणी त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी निंबोळी आर्क 5 टक्के ची फवारणी घ्यावी

♥3. तिसरी फवारणी एन्डोसल्फान 10 मिली + मेटासिस्टॉक्स 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे घ्यावी. त्यानंतर निंबोळी आर्कची 5 टक्के फवारणी करावी.

♥4. गरज पडल्यास कॉन्फीडॉर 4 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

*अतिरिक्त लक्षणावर ऊपाय
पावडरी मिल्ड्यू किंवा बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भाव दिसून येत असेल
तर बावीस्टीन 25 ग्रॅम,
किंवा एम 45, 20 ग्रॅम,
किंवा डायथेन झेड78- 20 ग्रॅम प्रती
10 लिटर पाण्यातून आदलून बदलून फवारणी करावी.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!