डाळींबाची छाटणी कशापदधतीने करावी How to do pomegranate pruning (methodology)

डाळींबाची छाटणी कशापदधतीने करावी♥प्रगतशील शेतकरी♥

♥ डाळींबाचे कलम लावल्यानंतर त्याची वाढ एका मजबूत खोडावर करून घ्यावी. मुख्य खोडाच्या अर्धा मिटर उंचीपर्यंत कोणतीही फूट वाढू देऊ नये.
या उंचीनंतर ४ ते ६ फांद्या चहूबाजूने वाढतील अशा बेताने ठेवावेत.
बुंध्यापासून जोमदार फुटवे येतात ते वेळिच काढून टाकावेत.

♥ छाटणी करताना रोगट व किडग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात.

♥ जोमदार वाढीसाठी खालीलप्रमाणे खते फेब्रुवारी - मार्च, जून- जुलै आणी सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यात विभागून द्यावीत.

♥ पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडाला ५० किलो शेणखत, १४०० ग्रँम युरीया १६०० ग्रँम सुपर फॉस्फेट व ४०० ग्रँम म्युरेट ऑफ पोटँश द्यावे.
फांद्याच्या बाहेरील पस-याखाली गोलाकार चर खणून त्यात खते टाकून मिसळून घ्यावीत व लगेच पाणी द्यावे.

♥ उन्हाळ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास किंवा ठिबक सिंचन असल्यास आंबे-बहारच धरावा कारण या बहारामध्ये फळाचा दर्जा उत्कृष्ट असतो.
तसेच रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असतो.

♥ सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या मिश्रणाची पानावर फवारणी केल्यास फळाची गुणवत्ता व उत्पादन वाढते.
फळधारणा झाल्यावर लोह झिंक मँग्नेशियम, बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या २ ते ३ फवारण्या १ महिन्याच्या अंतराने कराव्यात.

♥ किडीचा व रोगाच्या वेळोवेळी फवारणी घेऊन बंदोबस्त करावा.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!