ऊस अनुभव टारगेट एकरी 100 टनाचे

ऊस अनुभव टारगेट एकरी 100 टनाचे♥प्रगतशील शेतकरी♥
सुरेश कबाडे रा.कारंडवाडी.ता. वाळवा.जिल्हा.सांगली.

मोबा:-9403725999

♥जमिनीची उभी आडवी नांगरट करून ,एकरी 5/6 ट्रेलर शेणखत टाकुन लगेच 4.5 ते 5 फूटी सरी सोडावी साधारण पणे 15 ते 20 मे पर्यंत हिरवळीच्या खतासाठी एकरी 25 किलो धेंच्या टाकून ,लगेच पाणी द्या.
साधारण 50/55 दिवसानी धेंच्या जमीनी मध्ये मुजवून घ्यावा.
लागण पद्धत:--1 डोळा अंतर 2 फुट 

♥बिज प्रक्रीया:-- 20 टक्के क्लोरो 1 लिटर पाण्यामध्ये 2 मिली.
बाविस्टिन:--1 लिटर पाण्यामध्ये 2 ग्राम (gram)
जर्मीनेटर:-- 1 लिटर पाण्यामध्ये 5/10 मिली.
या मध्ये 10/15 मिनिटे बियाणे बुडवून लागण करावी.

♥लागणी चा बेसल डोस प्रती 1 एकर:--लागणी पूर्वी सरी च्या एका बगलेला कूदळीच्या सहाय्याने चळ घेऊन त्या मध्ये पुढील प्रमाणे खते वापरावीत , 2 डीएपी , 8 किलो फरटेरा , 2 किलो फोरेट/थिमेट यांचे मिश्रण करुन चळी मध्ये मातीआड करुन त्या मध्ये 1 डोळा लागण करावी.

♥लागणी नंतर 3 दिवसानी सेंकोर या तणनाशकाची फवारणी करून घ्या.प्रमाण 15 लिटर पाण्यामध्ये 25 ग्राम.

♥लागणी नंतर 30 दिवसानी:-- कूदळी ने चळ घेऊन 
1 पोते यूरिया, 1 पोते अमोनियम सल्फेट ,1 पोते पाट्याश.

♥लागणी नंतर 60/65 दिवसानी जेठा कोंब मोडून घ्या.
नंतर, 2 पोती 12/32/16 व , 1 पोती यूरिया ,1 पोती अमोनियम सल्फेट , 1 पोती पोट्याश टाकुन सरीवरील माती ने मुजवून घेणे.

♥लागणी नंतर 85 दिवसानी:--सुक्ष्म अन्नद्रवे प्रती एकर
पुढील प्रमाणे:--झिंक सल्फेट 10 किलो , फेरस सल्फेट 10 किलो , मैगनेशियम सल्फेट 10 किलो , गंधक 10 किलो. मैग्निज 5 किलो. बोरोन 3 किलो वरील सर्व सुक्ष्म अन्नद्रवे 5/6 पोती चाळलेले शेणखत घेऊन त्या मध्ये 8/10 दिवस मिक्स करून ठेवने व त्या नंतर सरी मध्ये टाकुन सरीवरील माती चे हलकीसी भर लावणे.

♥लागणी नंतर 105/110 दिवसानी:--2 पोती डीएपी 2, पोती यूरिया ,1 पोती पोट्याश , 2 पोती सकेंडरी टाकुन पॉवर टिलर च्या सहाय्याने रिवर्स भरणी करुन घ्या.
----------------------------------------------------------
♥लागनिनंतर 135/140 दिवसानी:-- 1 पोती यूरिया--
1 पोती पोट्याश टाकून पॉवरटिलरच्या रेजरने भरणी
करावी.

♥लागणीनंतर 160/170 दिवसानी:--ऊसाचा पाला काढणे व तो पाला एकआड एक सरीमधे टाकुन घ्यावा
व मोकळया सरीच्या दोन्ही बाजूला कुदळीने चळ घेऊन
2 पोती 12/32/16 व 1 पोती यूरिया टाकुन मुजवून -
घ्यावे. त्यानंतर 2 महिन्याने दसरयावेळी पाला काढने व
तो पाला प्रत्येक सरीमधे टाकने.

♥फवारनी:--
लागणीनंतर 30 दिवसानी:--मायक्रोनुत्रंट 5 मिली प्रति लिटर व19/19/19 प्रती लिटर 7 ग्राम
60 दिवसानी मायक्रोनुत्रट:--10 मिली प्रती लिटर, 13/00/45 प्रती लिटर, 10 ग्राम.
90 दिवसानी:--मायक्रोनुत्रट 10 मिली प्रती लिटर, 00/00/50 प्रती लिटर, 10 ग्राम.

♥आळवणी:--
लागणीनंतर 35 दिवसानी:-- azatobactor 10 मिली
प्रती लिटर, p.s.b. 10 मिली प्रती लिटर.
50 दिवसानी:--azatobactor 10 मिली प्रती लिटर, p.s.b. 10 मिली प्रती लिटर, k-mobilayzing 10 मिली प्रती लिटर.
65 दिवसानी:-- azatobactor 10 मिली प्रती लिटर,
p.s.b. 10 मिली प्रती लिटर, k- mobilayzing----
10 मिली प्रती लिटर.
80 दिवसानी:-- azatobactor 10 मिली प्रती लिटर,
p.s.b. 10 मिली प्रती लिटर,k-mobilayzing----
10 मिली प्रती लिटर.
सदर आळवणी स्प्रे पम्पाच्या साह्याने नोझल काढून शेतामधे भरपूर ओल असताना सायंकाळी 4 वाजलेनंतर आळवणी करावी.
-------------------------------------------------------------------
♥महत्वाच्या सुचना

1--ऊसाचे बियाने जाड, व लांब पेराचे व रुंद पानचे असावे.
2--बियाणे निवडताना साधारण 9/10 महीन्याचे असावे.
3--ऊसामधे नांगया भरने (तुटआळी साधनेसाठी) एकरी 4/5 मोळी बियानाची रोपे तयार करावीत.
4--गवती रोपे ( केवडा झालेली रोपे) काढून टाकावित व त्या ठिकाणी चांगली रोपे लावावीत.
5--लागवडीचा प्रत्येक डोस माती आड़ करावा,उघडया-
वर टाकू नये.
6--शेतामधे भरपूर ओल असताना फवारणी/ आळवणी करावी.
7--जीवाणू खतांची फवारणी/ आळवणी करताना बुरशीनाशके मिसळू नये.
8--प्रत्येक वेळी 1 पोती यूरिया वापरताना 10 किलो लीम्बोळी पेंड किंवा नीमिन 250 मिली 2 दिवस अगोदर युरियाला कोटिंग करावे.

संकलित!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

ओशो के अनमोल विचार ... Osho great thought in Hindi & English ...