विहीरीचे पाणी शुद्धीकरण उपाय

विहीरीचे पाणी शुद्धीकरण उपाय♥प्रगतशील शेतकरी♥

♥सामुहिक पाणी शुध्दीकरण

घरोघर पाणी शुध्द करण्याऐवजी सामूहिक पाणीपुरवठा शुध्द ठेवणे जास्त चांगले. पण स्वयपाकाशिवाय इतरही कामासाठी हे पाणी वापरल्यास शुध्द करण्याचा तेवढा खर्च वाया जातो. तरीही सामूहिक पाणीपुरवठयात आधी शुध्दीकरण करून पुरवठा केलेला बरा.

1. पाणी शुध्दीकरण केंद्रे
शहरातील सुसज्ज पाणी-शुध्दीकरण केंद्रांवर तीन टप्प्यांत पाणी शुध्द केले जाते.

- तुरटी मिसळून गाळ बसू देणे,

- वाळूच्या थरातून पाणी गाळणे,

- क्लोरिन गॅस मिसळून पाणी निर्जंतुक करणे.

यातील बांधकाम, यंत्रसामग्री वगैरेंचा खर्च मोठा असतो. पण लहान गावांसाठी इतर स्वस्त आणि तेवढयाच परिणामकारक योजना करता येतात. भरपूर पाणी असलेली खोल विहीर असेल तर ती मागे सांगितल्याप्रमाणे आतून बाहेरून बांधून, झाकण लावून, उपसा यंत्रणा बसवून शुध्द ठेवता येते.

2. आदर्श विहीर

विहिरीत जमणा-या पाण्याचा झरा खडकाखालून येत असेल तर हे पाणी बहुधा शुध्द असते. अशा पाण्याच्या विहिरीत बाहेरून रोगजंतू मिसळू दिले नाहीत तर पिण्याच्या पाण्याच्या शुध्दतेची हमी देता येईल. जलस्वराज्य प्रकल्पात या प्रकारच्या सोयी केल्या आहेत.

- बाहेरून घाण मिसळू नये म्हणून विहिरीत सुधारणा कराव्या लागतील. प्रथम विहिरीला आतून पक्के बांधकाम करून पृष्ठभागावरचे पाणी झिरपणार नाही याची व्यवस्था करावी. जमिनीवर तीन-चार फूट कठडा करून घाण व बाहेरचे पाणी आत जाण्यापासून रोखावे, तसेच वरून झाकण लावावे.

- पाण्यात न उतरता पाणी काढण्याची व्यवस्था (उदा. पंप, रहाट इ.) करावी लागेल.

- सांडलेले पाणी आत झिरपू नये म्हणून विहिरींच्या कडेने चर बांधून पाण्याला वाट करून द्यावी लागेल.

- विहिरीच्या आजूबाजूला सुमारे दीडशे फुटांपर्यंत संडास, सांडपाण्याचा नाला, इत्यादी दूषित पाण्याच्या जागा असू नयेत.

एवढी काळजी घेतली तर पिण्याचे पाणी सुरक्षित व शुध्द राहील. शक्य असेल तर पंप बसवून हे पाणी नळाने गावात जागोजाग पोचवता येते. बोअरवेल व विहिरींच्या पाण्यात क्षारांमुळे जडपणा असतो. खरे म्हणजे अनेक क्षार शरीराला अपायकारक असतात. अन्न शिजवायलाही त्याने त्रास होतो व चव बदलते. म्हणून पाण्याची क्षार तपासणी करून घ्यावी. ठरावीक मर्यादेपलिकडे क्षार असतील तर उपाय करायला पाहिजेत. हल्ली क्षार गाळणी मिळू लागली आहेत. त्याचा सुरुवातीचा खर्च जास्त असतो. (रु.5000 पर्यंत) पण देखभाल खर्च कमी असतो.

सुजल वॉटर फिल्टर

हा वॉटर फिल्टर तयार करण्यासाठी धान्याचा कोंडा, वाळू, खडी व बाईंडर (सिमेंट) ह्यांचा वापर करण्यात येतो. हा फिल्टर तयार करण्याची पध्दत अतिशय सोपी आहे.

♥वैशिष्टये

1. एका वेळेस 8 ते 10 लिटर पाणी 4 तासात गाळले जाते.

2. पाण्यातील गढूळपणा 12 ते 18 टक्के कमी केला जातो.

3. किटाणूंची संख्या 13 ते 11 टक्के कमी होते.

4. पाण्यातील फ्लोराईड व आर्सेनिक यांचे प्रमाण कमी होते.

5. फिल्टर बेड 6 ते 8 महिने कार्यक्षम राहते.

6. फिल्टर अतिशय माफक दरात मिळतो व सहजपणे बनविता आणि बदलता येतो.

7. फिल्टर धानाची राख, वाळू, खडी व सिमेंट पासून बनविण्यात येतो.

♥फिल्टर वापरण्याबद्दल सूचना

- फिल्टर नेहमी जमिनीपासून काहीशा उंचीवर ठेवावा.

- फिल्टर ठेवलेली जागा व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.

- फिल्टरची काट्रिज (कांडी) व वरचे भांडे साफ करताना नेहमी स्वच्छ थाळीवर ठेवावे. जमिनीवर ठेवू नये.

- खालचे भांडे व प्लेट दररोज साफ करावी.

- आठवडयातून किमान एकदातरी फिल्टर स्वच्छ करण्यासाठी त्यात 7 लिटर उकळते पाणी ओतावे आणि ते खालच्या भांडयात पाझरु द्यावे.

- नेहमी खालच्या (नळ असलेल्या ) भांडयातूनच पाणी घ्यावे. वरच्या भांडयात ग्लास बुडवू नये.

- खालच्या भांडयातलेच पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य असते.

- फिल्टरमध्ये पाणी हळूवारपणे भरावे. असे केल्यास फिल्टर खराब होत नाही.

♥वनस्पती गाळण (स्लो सँड फिल्टर)

हल्ली काही लहान गावांमधूनही पाणीपुरवठा केंद्रे झालेली आहेत. मात्र पाणी-शुध्दीकरणाची पध्दत तशी खर्चीक असल्याने ब-याच लहान केंद्रांवर शुध्दीकरण अगदी जुजबी आणि असमाधानकारक असते.

गावासाठी पाणी शुध्दीकरणासाठी सोपे व स्वस्त तंत्रज्ञान उपलब्ध आहे. एक उदाहरण म्हणजे यांत्रिक गाळण्याऐवजी पाणवनस्पतींचा वापर करणे. या पाणवनस्पती वाळूच्या थरांवर पाणी साठल्यावर आपोआप वाढतात व त्यामधून गाळले जाणारे पाणी शुध्द होते. यांत्रिक गाळण्यांपेक्षा या गाळण्यांचे काम सावकाश होते; पण शुध्दीकरण मात्र त्यापेक्षा फारच चांगले असते. यात 99 टक्के जंतू नष्ट होतात. छोटया गावासाठी वनस्पतीयुक्त गाळणी वापरणेच अधिक योग्य आहे. त्याचा देखभाल खर्च अगदी कमी असून अत्यंत शुध्द पाणी मिळते.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!