कपाशीचे वाण निवडताना घ्यावयाची काळजी

कपाशीचे वाण निवडताना घ्यावयाची काळजी♥प्रगतशील शेतकरी♥

♥वाणांची निवड
सद्यस्थितीत बाजारात अनेक बी.टी./बी.जी.।।कपाशीचे वाण उपलब्ध आहेत.
यापैकी कोणता वाण निवडावा याबाबत संभ्रम हो आहेत. बी.टी. /बी.जी.।। कपाशीचा वाण निवडतांना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा.

♥ रस शोषण करणार्‍या किडींना सहनशील / प्रतिकारक्षम संकरित वाण असावा.

♥ पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा.

♥ रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा वाण निवडण्यात यावा.

♥ बोंडाचा आकार मोठा व चांगला फुटणारा वाण असावा.

♥ धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, ज्यामुळे कपाशीला बाजारभाव चांगल मिळू शकेल.

♥ शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशीरा लागणार्‍या बोंडाचा सुद्धा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते.

♥ कोरडवाहू लागवडीमध्ये मुळांची लांबी जास्त असणारा वाण निवडावा.

♥ बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण घेण्यात यावे.

♥ पुनर्बहार क्षमता (फरदड)असणारा वाण निवडावा.
आपला मागील हंगामातील अनुभव अथवा आपण स्वत : अन्य शेतकर्‍यांच्या शेतावरील अनुभव पाहून बी.टी. कपाशीच्या वाणाची निवड करण्यात यावी.

संकलित

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!