खरीप पिकांतील तणनियंत्रण नियोजन असे कराल

खरीप पिकांतील तणनियंत्रण नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

तणनाशके फवारताना खालील दहा मुद्दे
दुर्लक्षित केले तर नुकसान होउ शकते!♥प्रगतशील शेतकरी♥

♥1) विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकेच दिलेल्या मात्रेत व दिलेल्या वेळी अचूकपणे वापरावीत.
तणनाशकाची मात्रा चुकल्यास म्हणजे तणनाशकाची शिफारशीपेक्षा कमी मात्रा दिल्यास तणांचे नियंत्रण कमी प्रमाणात होते,
तर अधिक मात्रा वापरल्यास पिकांना इजा होण्याचा धोका असतो.

♥2) मुदत संपलेली (Expired) तणनाशके वापरू नयेत.
तणनाशके खरेदी करताना याची काळजी घ्यावी.

♥3) तणनाशकांच्या फवारणीसाठी वेगळा (स्वतंत्र) पाठीवरचा नॅपसॅक पंप

किंवा

फुटस्प्रे वापरावा;

परंतु ते शक्‍य नसल्यास तणनाशकांच्या फवारणीनंतर त्याच पंपाने पिकावर कीटकनाशके फवारणी करण्यापूर्वी फवारणी पंप दोन-तीन वेळा साबणाच्या पावडरणे स्वच्छ धुऊनच वापरावा.

♥4) तणनाशके ही नेहमी जोराचे वारे नसताना तसेच स्वच्छ सूर्यप्रकाशात फवारावीत.

तसेच फवारणीनंतर तीन ते चार तास पाऊस न येण्याची शक्‍यता पाहूनच फवारणी करावी.

ढगाळ वातावरणात फवारणी करणे टाळावे.

♥5) फवारा जमिनीवर मारताना वारा मारणाऱ्याने मागे-मागे सरकत जावे,
जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडणार नाहीत.

6) तणनाशके वारलेले शेत तुडवू नये.
कमीत कमी 12-15 दिवस कोणतीही मशागत करू नये.

7) तणनाशकांचा वापर कोणत्याही कीटकनाशक, बुरशीनाशक, वाढनियंत्रक, खते किंवा घुलनशील द्रावकासोबत मिसळून करू नये.

♥8) तणनाशकाचे शिल्लक राहिलेले द्रावण कोणत्याही पिकाच्या जमिनीत,
पाण्याची डबकी किंवा
इतर वाहत्या पाण्यात टाकू नये.

♥9) तणांमध्ये तणनाशकांसाठी निर्माण होणारा प्रतिकार किंवा त्यांच्यात होणारे बदल टाळण्यासाठी णनाशकांचा क्रमवार, आलटून-पालटून तसेच इतर पद्धतींच्या जोडीने त्यांचा वापर करावा.

♥10) तणनियंत्रणासाठी परिस्थितीनुसारच तणनाशकांचा शिफारशीनुसार वापर करावा. त्यांच्या वारंवार वापराचा अतिरेक टाळावा,
तसेच तणनाशके फवारलेल्या जमिनीत दर वर्षी शेणखत किंवा कंपोस्ट खत अथवा गांडूळ खताचा वापर करावा.

संकलित!

♥विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकेच दिलेल्या मात्रेत व दिलेल्या वेळी अचूकपणे वापरावीत.
फवारा जमिनीवर मारताना फवारा मारणाऱ्याने मागे-मागे सरकत जावे जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडणार नाहीत. तणांमध्ये तणनाशकांसाठी निर्माण होणारा प्रतिकार किंवा त्यांच्यात होणारे बदल टाळण्यासाठी तणनाशकांचा क्रमवार, आलटून-पालटून तसेच इतर पद्धतींच्या जोडीने त्यांचा वापर करावा.

संकलित!

प्रमुख खरीप पिकांतील तणनियंत्रण ♥प्रगतशील शेतकरी♥

♥पीकवाढीच्या सुरवातीचा 1/3 कालावधी तणमुक्त ठेवणे पीक उत्पादनाच्यादृष्टीने मिळण्यासाठी महत्त्वाचे असते.
जोमाने वाढणारे, पसरट पाने व मुळे असणारी पिके अधिक कार्यक्षमपणे निविष्ठांचा वापर करतात.
वाढ होऊन जमिनीचा भाग झाकून टाकतात, तर कापूस, ऊस यांसारखी पिके सुरवातीला हळूहळू वाढतात.
त्यांचा पीक-तण स्पर्धेचा कालावधीदेखील वाढतो. बहुवार्षिक तणे उदा. हराळी, कुंदा, नागरमोथा इत्यादी तणांचे प्रभावी नियंत्रण करणे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरते.
म्हणूनच तणनाशकांचा वापर वाढतो आहे.

♥तणनाशकांच्या विशेषतः उगवणपूर्व तणनाशकांच्या वापरामुळे पिकाच्या सुरवातीपासूनच्या काळापासून प्रभावी तणनियंत्रण होऊन पिकांची जोमदार वाढ होते,
तर कोळपणीसारख्या कायिक पद्धतीच्या तणनियंत्रण पद्धतीमुळे पुढे उगवून आलेल्या तणांचाही बंदोबस्त तर होतोच,
तसेच पिकांना आंतरमशागतीचा दुहेरी फायदा व पर्यावरणाचा समतोल राखणे यासारख्या बाबीही साध्य होतात.
पेरणीपासून पीक काढणीपर्यंत सर्व प्रकारे सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. यामध्ये योग्य मशागत, वेळेवर तसेच योग्य खोली व अंतरावर पेरणी करणे, खताची मात्रा, योग्य पद्धतीने देणे, हेक्‍टरी रोपांची योग्य संख्या राखणे, नेमके पाणी व्यवस्थापन व निचरा पद्धतीचा अवलंब करणे, कीड व रोगनियंत्रण वेळेवर करणे, आच्छादनाचा वापर, आंतरपीक पद्धतींचा अवलंब करणे यांचा समावेश होतो.

♥प्रमुख खरीप पिकांतील तणनियंत्रण

♥तृणधान्य पिके

♥ज्वारी पिकातील तणनियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥
ज्वारी पिकातील तणनियंत्रणासाठी
पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी

ऍट्राझीन 50 डब्ल्यू.पी. तणनाशक 1.0 ते 1.5 किलो प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे (0.50 ते 0.75 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी)

किंवा

खरीप ज्वारीतील प्रभावी तणनियंत्रणासाठी
पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी

2,4-डी (सोडिअम क्षार) 80 डब्ल्यू.पी. (विशेषतः रुंद पानी तणांसाठी)
0.625 ते 1.0 किलो प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
(0.50 ते 0.8 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी).

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

♥बाजरी पिकातील तणनियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥

बाजरीतील तणनियंत्रणासाठी
पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी

ऍट्राझीन 50 डब्ल्यू.पी. 0.5 ते 1.0 किलो प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (0.25 ते 0.50 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी).

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

♥मका पिकातील तणनियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥

मका पिकातील प्रभावी तणनियंत्रण व अधिक उत्पादनासाठी
पीक उगवणीपूर्वी

ऍट्राझीन 50 डब्ल्यू.पी. 1.5 ते 2.0 किलो प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे (0.75 ते 1.0 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी).

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

♥पेरसाळ पिकातील तणनियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥

पेरसाळीतील तणनियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी तणनियंत्रणासाठी
पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी

पेंडीमिथॅलीन 30 ई.सी. तणनाशक 2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (0.75 ते 1.0 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी)

व त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.

पेरसाळीतील तणनियंत्रणासाठी

पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी

ब्युटाक्‍लोर 50 ई.सी. 2.0 किलो प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (1.0 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी).

पेरसाळीतील तणनियंत्रणासाठी

पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी
2,4-डी (सोडिअम क्षार) 80 डब्ल्यू.पी. (विशेषतः रुंद पानी तणांसाठी) 0.625 ते 1.0 किलो प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे (0.50 ते 0.8 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी).

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

♥कडधान्य पिके

♥तूर पिकातील तणनियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥

खरीप कडधान्यापैकी तूर हे पीक प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
तूर हे जास्त कालावधीचे पीक आहे, तसेच सुरवातीला पिकाची वाढ हळू होत असते.
त्यामुळे सुरवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
तुरीतील तणनियंत्रणाकरिता पेरणीनंतर 3, 6 व 9 आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी.
सध्या मजुरांची अनुपलब्धता व वाढते मजुरी दर यामुळे पूर्णतः कोळपणी व खुरपणीद्वारे तणनियंत्रण करणे अवघड बनले आहे.

तूर पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी

पेंडीमिथॅलीन 30 ई.सी. तणनाशक
2.5 ते 3.3 लिटर प्रतिहेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (0.75 ते 1.0 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) जोडीला
पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

♥उडीद पिकातील तणनियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥

पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी

ऑक्‍सिफ्लोरफेन 23.5 ई.सी.
425 मि.लि. प्रति हेक्‍टरी 450 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे,
तसेच पाच आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी.

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

♥मूग  पिकातील तणनियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥

मुगातील तणनियंत्रणासाठी
पीक उगवणीपूर्वी
पेंडीमिथॅलीन 30 ई.सी.
2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे,
तसेच पाच आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी.

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

♥गळीत धान्य पिके -

♥सोयाबीन पिकातील तणनियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥

सोयाबीन पिकातील तणनियंत्रणासाठी
पीक उगवणीपूर्वी
ऍलॅक्‍लोर 50 ई.सी. हे तणनाशक
4.0 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (2.00 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) व

पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.

किंवा

पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी
पेंडीमिथॅलीन 30 ई.सी. तणनाशक
2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (0.75 ते 1.0 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) व
त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.

किंवा

सोयाबीन पीक पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी
इमॅझिथापर 10 ई.सी.
1000 मि.लि. प्रति हेक्‍टरी 500 ते 750 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (100 मि.लि. क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी).

किंवा

सोयाबीन पिकातील एकदल वर्गीय तणनियंत्रणासाठी
पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी
क्विझालोफॉफ इथाईल पाच ई.सी. 800 ते 1000 मि.लि. प्रति हेक्‍टरी 500 ते 750 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (40 ते 50 मि.लि. क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी).

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

♥सूर्यफूल पिकातील तणनियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥

पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी
ऑक्‍सिफ्लोरफेन 23.5 ई.सी.
425 मि.लि. प्रति हेक्‍टरी
750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (100 मि.लि. क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) तसेच पाच आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी.

किंवा

पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी
पेंडीमिथॅलीन 30 ई.सी. तणनाशक
2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टरी
750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (0.75 ते 1.0 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) व
त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

♥कापसातील तणनियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥

कपाशीच्या उत्पादनावर परिणाम करणाऱ्या विविध बाबींमध्ये रसशोषक किडी, विविध रोग याबरोबरच तणांचा प्रादुर्भाव हीदेखील एक महत्त्वाची समस्या आहे. कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध लांब तसेच रुंद पानाच्या तणांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

कपाशीतील तणनियंत्रणासाठी
पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी
पेंडीमिथॅलीन 30 ई.सी. 2.5 लिटर प्रति हेक्‍टरी या प्रमाणात 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (25 ते 33 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी).
त्याचबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी कोळपणी व खुरपणी करावी.

किंवा

कपाशीतील तणनियंत्रणासाठी
पीक उगवणीनंतर वापरण्याची काही तणनाशकेदेखील बाजारात उपलब्ध आहेत. कपाशीतील एकदल वर्गीय तणनियंत्रणासाठी
पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी क्विझॉलोफॉफ इथाईल पाच ई.सी. 800 ते 1000 मि.लि. प्रति हेक्‍टरी 500 ते 750 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (40 ते 50 मि.लि. क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी)

किंवा

पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी
पायरिथायोबेक सोडिअम 10 ई.सी.
625 मि.लि. प्रति हेक्‍टरी 500 ते 750 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (62.5 मि.लि. क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी).

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

उगवणपट्ट्यात वापरावयाची तणनाशके वापरत असताना विशेष काळजी घ्यावी.
ही तणनाशके तणे व पीक उगवणीनंतर पिकांच्या दोन ओळींमधील उगवून आलेल्या तणांवर फवारताना ती इतर पिकांवर उडून जाणार नाही.
यासाठी हूडचा वापर ज्वारी, मका इत्यादी पिकांमध्ये 2,4-डी हे तणनाशक वापरताना त्याचा थोडाही फवारा कपाशीवर येणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच तो फवारा कपाशीतील कुठल्याही फवारणीसाठी वापरू नये, कारण त्यामुळे कपाशीवर विपरीत परिणाम होतो व उत्पादनातही घट येते.

♥विविध पिकांतील पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी

पीक +पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी (पेरणीनंतरचे दिवस)
मूग, उडीद +15 ते 30
बाजरी +15 ते 35
खरीप ज्वारी, सूर्यफूल, भात (स्थलांतरित) सोयाबीन, भुईमूग (उपट्या) +15 ते 45
भुईमूग (पसऱ्या), कापूस, तूर +20 ते 60
ऊस +20 ते 120
पेरभात +पूर्णवेळ

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलीत!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!