दहावी नंतर काय ? करिअर कसे निवडावे ?

दहावी नंतर काय? करिअर कसे निवडावे?
( जर तुमचा गोंधळ अजूनही असेल तर तुम्हाला मदत करण्यासाठी हा लेख)

(दहावीत यश - शुभेच्छा!
दहावीत अप+यश.. चिंता नको, नव्या जोमाने अभ्यासात लागु, कुठे कमी पडलो ते पाहुन त्याचावर मात करुन, पुढच्या वर्षी दहावीत अविश्वसनीय यशासाठी मनापासुन शुभेच्छा!)

♥दहावी अतिशय महत्वाचे वर्ष. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष. आता तुम्हाला महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या करिअरची दिशा ठरवायची आहे. कदाचित तुम्ही ती ठरवली असेल, किंवा तुम्ही खूप गोंधळलेले असाल. जर तुमचा गोंधळ अजूनही असेल तर तुम्हाला मदत करण्यासाठी हा लेख. तुम्ही तुमचे करिअर ठरवलेले असेल तरी ते का याची चाचपणी सुद्धा तुम्ही करा.

♥करिअर कसे निवडावे:
दहावी नंतरच्या विविध पर्यायांचा विचार करण्यापूर्वी तुम्ही तुमचे करिअर कसे निवडावे याचे काही ठोकताळे आहेत, ते आपण पाहू.

♥आवड: तुमच्या निर्णयाचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुमची आवड. तुम्हाला काय आवडते किंवा काय व्हावेसे वाटते? काहींना लहानपणापासून काही विशिष्ट करिअरने झपाटलेले असते. मला लहानपणासून क्रिकेटर व्हावेसे वाटे, अर्थात त्याचे कारण सचिन तेंडूलकर. मी त्यासाठी क्रिकेट कोचिंग ला प्रवेश सुद्धा घेतला होता. पुढे मला असे वाटले, कि वाचन आणि अभ्यास हा माझा आवडीचा भाग आहे. आणि क्रिकेट मागे पडले. तसे काही तुमच्या बाबतीत आहे का? अनेकदा तुमचा छंद हेच तुमचे करिअर होते. आणि तेच अधिक योग्य आहे. असे म्हणतात, कि करिअर असे असावे जे तुम्हाला आवडते. बर्याच माणसांच्या बाबतीत हे घडते, कि चाकोरीबद्ध  जगताना ते पैसे तर कमावतात पण आयुष्याला त्यांच्या काही अर्थ उरत नाही. फक्त जगरहाटी आहे म्हणून नोकरी व्यवसाय करतात. त्यामुळे हे लोक खुश नसतात. सुखी नसतात.
तुमच्या आवडीच्या गोष्टी काय आहेत हे पहा. म्हणजे खेळ- त्यात अनेक प्रकार, नाटक कला, चित्र किंवा दुसरे छंद, अभ्यास- त्यातही इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान- अगदी विज्ञानातही धुमकेतू, अंतराळ, ग्रह किंवा माणसाच्या शरीराची रचना या सगळ्या गोष्टी तुमचे करिअर काय असावे याचे द्योतक आहे. कारण तुमची आवड हेच तुमचे करिअर झाले तर तुम्ही सुखी होणार आहात.

♥व्यावहारिकता: दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे करिअर व्यावहारिक आहे का? व्यावहारिक चा अर्थ ते करिअर तुम्हाला जमणार आहे का आणि दुसरे म्हणजे आर्थिक दृष्ट्या ते किती योग्य आहे. याचा अर्थ हा नव्हे कि प्रत्येक करिअरचा निर्णय किती पैसे मिळतील हेपाहुनच करावा, नाहीतर सगळेच डॉक्टर होतील. पण तुमच्या आवडीला बाजारात किती मागणी आहे हेही पाहणे गरजेचे असते. अन्यथा, नंतर ते डोईजड जाते, उदाहर्नार्थ तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर तुम्ही त्यातच करिअर करू शकता, मात्र तुम्हाला हे समजणे आवश्यक आहे कि यात तुम्हाला कमी पैसे मिळतील.जर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसेल तर मेडिकल सारख्या महागड्या पर्यायांचा विचार करणे सयुक्तिक नाही. तसेच तुम्हाला तुमच्या शारीरिक क्षमतांचा विचार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जहाजावर काम करायचे असेल तर महिनोन्महिने तुम्हाला घरापासून दूर राहायचे आहे ह्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. तुम्हाला सैन्यात जायचे असेल तर बर्याच गोष्टींचे त्याग तुम्हाला केले पाहिजेत.

♥उद्दिष्ट्य: तुमचे आयुष्याकडून उद्दिष्ट्य काय याच्यावरही तुमचा करिअरचा निर्णय अवलंबून आहे. उदाहरणार्थ पैसा हे तुमचे उद्दिष्ट्य असेल तर तुम्हाला लवकर करिअर करणाऱ्या आणि अप्लावधीत जास्त पगाराची नोकरी देणाऱ्या करिअरचा विचार करवा लागेल. उदाहरनार्थ इञ्जिनिअरिङ्ग, एमबीए. तुम्हाला आयुष्य उपभोगायला आवडत असेल तर पर्यटनासारखे करिअर नाही. तुम्हाला समाजासाठी वेळ द्यायचा असेल तर पत्रकारिता आणि सोशल वर्क पेक्षा वेगळे तुम्ही विचार करता उपयोग नाही. तुम्हाला व्यक्त होणे आवडत असेल किंवा संवाद साधे आवडत असेल तर तुम्ही पब्लिक रिलेशन अर्थात जनसंपर्क तुमचे करिअर म्हणून निवडा.

♥नाविन्य: तुमची नाविन्याची हौस किती आहे यावरही तुमचा करिअरचा निर्णय अवलंबून असतो.

इतर करतात त्यापेक्षा नवीन, नाविन्यपूर्ण करिअरचा विचार तुम्ही करत असाल तर नेनो तंत्रज्ञान, बायो तंत्रज्ञान, पुरातत्वशास्त्र हे करिअरचे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत.

♥पालक: बर्याचदा पालक आपली आवड मुलांवर लादतात. तुमच्या बाबतीत असे होत असेल तर तुम्हाला हे पालकांना पटवून देणे गरजेचे आहे कि तुमच्या करिअर मध्ये काय वेगळे आहे. मुळात तुम्हाला तेच करिअर का करायचे आहे या बाबतीत तुम्ही स्वत: ठोस विचार करणे गरजेचे आहे.

आता तुम्हाला जे करिअर निवडायचे आहे त्याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्तमानपत्रात येणारी कात्रणे, इंटरनेट वरील माहिती, करिअर काय आहे, शिक्षण काय आणि कुठे, सर्वोच्च शिक्षण काय, विविध नोकरीच्या/व्यवसायाच्या संधी काय ह्याचा विचार करणे गरजेचे आहे.

♥अॅप्टीट्युड टेस्ट

बरेच विद्यार्थी आपली आवड, कल समजण्यासाठी चाचणी करतात. त्यानंतर तुमच्या बुद्ध्यान्काप्रमाणे योग्य निर्णय घेणे तुम्हाला जमते. अशा अनेक संस्था, मानसतज्ज्ञ उपलब्ध आहेत. अनेक शाळा सुद्धा हि सेवा पुरवतात. तुम्हाला योग्य वाटत असेल तर अशी टेस्ट तुम्ही  शकता.

मात्र वर नमूद केल्याप्रमाणे तुमचे निर्णय तुमच्या बुद्ध्यांकावर अवलंबून असतीलच असे नाही. याबरोबर तुमची आवड तुमचे करिअर ठरवण्याच्या कामात अधिक हातभार लावते.

♥बारावीनंतर दिशा ठरवताना काय पाहावे!

बारावी हा आपल्या आयुष्यातील मधला टप्पा. यानंतर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांना निवडायचे, नोकरी निवडायची, डिप्लोमा करायचा कि इंजिनीरिंग अशा अनेक संभ्रमात विद्यार्थी येउन उभा ठाकतो. या वळणावर त्याला पदवीनंतर काय संधी आहेत, नोकरी स्वयंरोजगार याची माहिती असणे आवश्यक आहे.त्यामुळे नक्की काय केले असता, आपल्याला मनाजोगे करिअर निवडता येईल याची जाणीव याच टप्प्यावर असणे गरजेचे आहे.तुम्ही पुढील करिअर कसे निवडल?१.आवड: सर्वात प्रथम पहिली पाहिजे तुमची आवड. आणि हि तुमची तुम्हाला कळू शकते. तुम्हाला गाड्यांच्या आणि इलेक्त्रीकाल वस्तूंच्या भागांशी खेळायला आवडत असेल इथपासून ते अगदी लहान पाणी खेळलेल्या “शिक्षकाच्या” खेळापर्यंत तुमची आवड तुमच्या करिअरची दिशा समजावू शकेल.उदाहरणार्थ दुर्वेश ला टिव्ही वरील फिल्म्स बघण्याचा शौक आहे. आता हा  तो व्यर्थ आहे असे तुमचे म्हणणे असेल. पण थांबा. त्याला फिल्म मधील प्रत्येक सीनचे शुटींग कसे केले आहे, मागे स्थळ काय आहे, रंग संगती काय आहे आणि दृश्य कुठून कसे चित्रित केले आहे हे पाहायला आवडते, किंवा त्याचा अभ्यास करायला आवडतो. इथेच त्याच्या संभाव्य करिअरचे मुळ आहे. त्याला चित्रपटांचा आर्ट डायरेक्टर होणे योग्य आहे. त्यामुळे त्याने मास मिडिया मध्ये प्रवेश घेतला पाहिजे हे उघड आहे.लतिकाला एखादा लोग बघून त्यातून अर्थ काय प्रतीत होतो हे पाहणे अभ्यासणे आवडते. तिचे करिअर आहे ब्रान्डींग या क्षेत्रात किंवा जाहिरात क्षेत्रात.

♥वेळ: सर्वात अगोदर पाहावे लागेल तुमच्याकडे वेळ किती आहे? आर्थिक कारणांमुळे, घरच्या कारणामुळे जर तुमच्याकडे शिक्षणासाठी योग्य वेळ नसेल तर उपलब्ध पर्यायांमधून आणि तुमच्या आवडीप्रमाणे एखादा कोर्स करून तुमचे करिअर तुम्हाला सुरु करावे लागेल. त्यानंतर नोकरी सांभाळता सांभाळता दूरस्थ पद्धतीने शिक्षण पूर्ण करता येईल. अर्थात तुमचे करिअर सिए सिएस असे असेल किंवा इञ्जिनिअरिङ्ग असेल तर तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागेल.

♥उद्दिष्ट्य: तुमचे आयुष्याकडून उद्दिष्ट्य काय याच्यावरही तुमचा करिअरचा निर्णय अवलंबून आहे. उदाहरणार्थ पैसा हे तुमचे उद्दिष्ट्य असेल तर तुम्हाला लवकर करिअर करणाऱ्या आणि अप्लावधीत जास्त पगाराची नोकरी देणाऱ्या करिअरचा विचार करवा लागेल. उदाहरनार्थ इञ्जिनिअरिङ्ग, एमबीए. तुम्हाला आयुष्य उपभोगायला आवडत असेल तर पर्यटनासारखे करिअर नाही. तुम्हाला समाजासाठी वेळ द्यायचा असेल तर पत्रकारिता आणि सोशल वर्क पेक्षा वेगळे तुम्ही विचार करता उपयोग नाही. तुम्हाला व्यक्त होणे आवडत असेल किंवा संवाद साधे आवडत असेल तर तुम्ही पब्लिक रिलेशन अर्थात जनसंपर्क तुमचे करिअर म्हणून निवडा.

♥नाविन्य: तुमची नाविन्याची हौस किती आहे यावरही तुमचा करिअरचा निर्णय अवलंबून असतो.

अनंत फांदी म्हणतात तास “धोपट मार्गा सोडू नको” असा तुमचा विचार असेल तर पाठ्दिमधील करिअर तुम्ही निवडावे. किंवा नाविन्यपूर्ण करिअरचा विचार करावा. उदाहरणार्थ नेनो तंत्रज्ञान, बायो तंत्रज्ञान, पुरातत्वशास्त्र हे करिअरचे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत.

♥आता दहावी नंतर काय काय पर्याय उपलब्ध आहेत याचा आपण विचार करू.

♥साधारणतः तीन मुल पर्याय तुम्हाला उपलब्ध असतात. आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स. तुम्हाला इञ्जिनिअरिङ्ग करायचे असेल तर बारावी सायन्स न करता, दहावी नंतर डिप्लोमा करून इञ्जिनिअरिङ्ग करणे अधिक योग्य असते हे समजून घ्या. बर्याचदा बारावी नंतर सीईटी देऊन मुले इञ्जिनिअरिङ्ग ला जातात. त्यात तुमच्या समोरची स्पर्धा वाढते. त्यापेक्षा डिप्लोमा हा योग्य पर्याय असतो.

आर्ट्स: कला शाखा हि नाविन्याची शाखा आहे. माणसांच्या मनाशी, माणुसकीशी, त्यांची जडणघडण त्यांचे विचार यांच्याशी जवळीक साधणारी हि शाखा आहे. तुम्ही आर्ट्स कोलेज मध्ये प्रवेश घेऊन बारावी आणि त्यानंतर विशिष्ठ विषयात पदवी, पदव्युत्तर आणि पी एच डी असा साधारण प्रवास करता.

♥आर्ट्स मधील विविध शाखांचा आपण विचार करू:

इतिहास: माणसाल आपल्या इतिहासाची उत्सुकता असते. माणसाचा इतिहास हा अतिशय रंजक्तापूर्ण आणि अनेक न उलगडलेल्या घटनांनी भरलेला आहे. त्यामुळे इतिहास या क्षेत्रात एक अतिशय रंजक आणि आव्हानात्मक करिअर लपले आहे. विविध पुराव्यांच्या आधारे इतिहास शोधणार्यांसाठी पुरातत्व हे अजून एक करिअर आहे. तसेच म्युझीअम मध्ये वस्तूंचे संगोपन कसे करावे हे शिकवणारे म्युझीओलोजी हे अजून एक चांगले करिअर आहे.

♥यासाठी पदवी इतिहासात करून पदव्युत्तर पदवी करता येईल. त्यानंतर नेट-सेट करून किंवा पी एच डि करून प्राध्यापक-संशोधक होता येते किंवा शासकीय संस्थांमध्ये काम करता येते.

♥अर्थशास्त्र: अर्थशास्त्र हे माणसे, व्यापार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी संधान असलेले एक अतिशय आव्हानात्मक क्षेत्र आहे. अर्थशास्त्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध असतात. पदव्युत्तर पदवी नंतर प्राध्यापक संशोधक होण्याबरोबरच भारतीय अर्थ व सांख्य सेवेत जाऊन देशाच्या सेवेत जाता येते.

♥मानस शास्त्र: माणसाच्या मनाशी संबंध असणारे हे क्षेत्र. यात अनेक उपशाखा आहेत आणि यात करिअरची मोठी संधी उपलब्ध आहे.जर तुम्हाला दुसर्याला समजून घेणे, त्याच्या भावनांना जपणे आवडत असेल तर हे क्षेत्र तुमचे आहे.

♥राज्यशास्त्र: देशाच्या राज्य्कार्नाशी संबंध असलेले हे फार मोठे क्षेत्र आहे. यात सुद्धा करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक कॉलेजेस मध्ये प्राध्यापक म्हणून करिअर करता येते, याशिवाय अनेक राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय संस्थांमध्ये संशोधन करता येते.

♥कॉमर्स: व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित हि शाखा आहे.

♥अकाउनट: कॉमर्स मधील मोठे क्षेत्र म्हणजे अकौंट. विविध व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक संस्थांना आपल्या उत्पन्न- खर्चाचा ताळेबंद ठेवावा लागतो. यासाठी अकौंटन्ट ची गरज असते.

♥कॉमर्स मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी करून हे क्षेत्र करिअर म्हणून निवडता येते. यात अधिक पुढे जायचे असेल चार्टर्ड अकौंटन्ट हा कोर्स करता येतो.

♥व्यावसायिक परीक्षा: बारावी नंतर सीए प्रमाणे कंपनी कायद्यातील आणि इतर व्यावसायिक कायद्यातील अभ्यासासाठी सीएस  हा कोर्स उपलब्ध होतो. तीन वर्षे अभ्यास आणि दीड वर्षे  ट्रेनिंग असे कोर्स चे स्वरूप असते. दोन्ही कोर्सेससाठी इंस्तीत्युत असून त्या चर्चगेट ला आहेत.

♥व्यवस्थापन

व्यवसाय व्यवस्थापन हे फार मोठे क्षेत्र पदवी नंतर करता येते. बारावी नंतर बीएमएस हा कोर्स करून नंतर एमबीए करता येते. यात सुद्धा सर्वसाधारण व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन अश अनेक शाखा उपलब्ध आहेत.

♥विज्ञान

विज्ञान हे क्षेत्र फार विस्तीर्ण आहेच पण प्रत्येक उपशाखांमध्ये सुद्धा अनेक क्षेत्रे आहेत.

फिसिक्स, केमिस्ट्री आणि बायोलोजी हि तीन महत्वाची क्षेत्रे आहेत. बारावीमध्ये तुम्हाला जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रात पुढे करिअर करता येईल.

♥विशेष क्षेत्रे:

१. नानो तंत्रज्ञान: एका अनुचे अनेक भागात विभाजन करून त्याचे परिणाम शोधण्याचे क्षेत्र म्हणजे नेनो तंत्रज्ञान. हे क्षेत्र येणाऱ्या काळात विस्तारणार आहे.

२. अंतराळशास्त्र:  आपल्या देशाने अंतराळ शास्त्रात फार मोठी प्रगती केली आहे.नुकतेच चांद्रयान आणि मंगलयान पाठवून आपण विकसित देशांपेक्षा कमी नाही हे आपण दाखवून दिले आहे . त्यामुळे या क्षेत्रात फार मोठी संधी आहे. विक्रम साराभाई अंतराळ संशोधन, आयुका या भारतीय आणि नासा सारख्या आंतर राष्ट्रीय संस्थांमध्ये काम करता येईल.

३. बायोटेकनोलोजी: बायोलोजी आणि तंत्रज्ञान याचा समेळ होऊन बायो तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे क्षेत्र सुद्धा येणाऱ्या काळात फार मोठे होईल.

♥इञ्जिनिअरिङ्ग:

इञ्जिनिअरिङ्ग जरी बारावी नंतर करता येणार असले तरी, जर तुमचे नक्की असेल तर बारावी विज्ञान न करता वर नमूद केल्याप्रमाणे डिप्लोमा करणे अधिक योग्य आहे.

♥प्रवेश परीक्षा:

मेडिकल, इञ्जिनिअरिङ्ग, हॉटेल मेनेज्मेंत या क्षेत्रात प्रावेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्य शासनाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. या परीक्षेची तयारी बारावी बरोबरच करावि लागते. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात जाण्याचा विचार करीत असाल तर प्रवेश परीक्षेची सुद्धा माहिती काढून घ्या.

तर मग तुमच्या समोर आता आयुष्याचा महासागर उभा राहणार आहे. त्याची तयारी सुरु होऊ दे आणि मग या अथांग सागरात मनसोक्त डुम्ब्ण्यासाठी  सज्ज व्हा!

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!