पाऊसानुसार आपातकालीन पीक नियोजन
पाऊसानुसार आपातकालीन पीक नियोजन♥प्रगतशील शेतकरी♥
♥महाराष्ट्रातील बहुतांशी शेती जिरायती असल्याने ती पावसावर अवलंबून आहे(80+%). पावसाच्या लहरीपणामुळे भारतातील मुख्य पिकांचे जगाच्या तुलनेत उत्पादन फारच कमी आहे.
राज्यात निरनिराळया ठिकाणी जमिनी, हवामान आणि पर्जन्यमान विविध असल्याने विविध प्रकारची पिके घेतली जातात. निसर्गाच्या प्रामुख्याने पावसाच्या लहरीपणामुळे ब-याचवेळा पिकांच्या दृष्टिने बिकट परिस्थिती निर्माण होते. महाराष्ट्रात पाऊस जून ते ऑक्टोबर दरम्यान पडत असल्याने या काळात प्रामुख्याने खरीप आणि रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या जातात.
जिरायती शेती करणा-या शेतक-यांना पावसाच्या अनियमितपणास ब-याच वेळा तोंड द्यावे लागते. पाऊस वेळेवर सुरु होऊन मध्येच मोठा खंड पडणे, पाऊस उशिरा सुरु होणे. लवकर संपणे, उशिरापर्यंत पडणे, अतिवृष्टी होणे अशा आपत्कालीन परिस्थितीत पीक पेरणीच्या तारखांमध्ये बदल करावे लागतात. अशा परिस्थितीत करावे लागणारे बदल आधीपासूनच वरील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता तयार करणे, यालाच आपत्कालीन पर्यायी पीक योजना असे म्हणतात.
♥अशा प्रकारे अनियमित पावसामुळे निर्माण होणा-या आपत्कालीन परिस्थितीशी तोंड देण्यासाठी शेतक-याने पुढीलप्रमाणे पर्यायी पीक योजना राबवावी.
♥१. पावसाची वेळेवर सुरुवात व पेरणीनंतर खंड पडणे :-
अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये पावसात खंड पडणे हे वरचेवर आपणास अनुभवास येते. पावसात खंड हा सर्व साधारणपणे जुलै-ऑगस्ट महिन्यात पडतो.पाऊस वेळेवर सुरु झाला तर १५ जुलै पर्यंत खरीप हंगामातील सर्व पिके चांगली येतात. परंतु नंतर पावसामध्ये दोन ते चार आठवडे खंड पडला तर पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते. म्हणून कोणतेही सलग पीक घेण्यापक्षा खरीप हंगामात आंतरपिकाची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बाजरी + तूर (२:१) किंवा सूर्यफूल + तूर (२:१ २:२) ही आंतरपीक पद्धती चांगली दिसून आलेली आहे. हलकी जमीन असेल तर बाजरी + मटकी (२:१) ही आंतरपीक पद्धती योग्य आहे. तसेच मटकी, हुलगा, उडीद यासरखी धूप प्रतिबंधक पिक पट्टापेर पद्धतीने घ्यावीत.पावसाने फारच ओढ दिली तर बाजरी कापून वैरणीसाठी वापरावी म्हणजे पुन्हा पावसास सुरुवात झाल्यावर कोंब फुटून त्यापासून धान्य तसेच वैरण मिळते. अशा पिकावर २ ते ३ टक्के युरियाची फवारणी करावी. भुईमूग पिकांवर २ ते ३ टक्के डायअमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी. सूर्यफूलाच्या बाबतीत विरळणी करुन झाडांची कमीत कमी संख्या (हेक्टरी ३०,००० पर्यंतच) ठेवावी. म्हणजे जमिनीतील ओल पिकास जास्त दिवस पुरेल आणि त्यामुळे उत्पादनात स्थैर्य येण्यास मदत होईल. तसेच खरीप पिकामध्ये निंदणी करुन पीक तणमुक्त ठेवून कोळपण्याची संख्या वाढवावी.
2.पावसास उशिरा सुरुवात काय पेरावे♥प्रगतशील शेतकरी♥
♥सोयाबीनची पेरणीची शिफारस १ जुन ते १५ जुन दरम्यान आहे.
♥अवर्षन प्रवण विभागामध्ये पावसास बर्याच वेळा जुलै ऑगस्टमध्ये सुरुवात होते.
अशावेळी खरीप पिके घ्यावीत किंवा नाहीत अशा संभ्रमात शेतकरी असतात.
♥अशा परिस्थितीत शेतकरी खरीपातील क्षेत्र रबी पिकाखाली घेण्याचा प्रयत्न करतात.
परंतु खरीप जमिनी या हलक्या आणि कमी ओल साठविणाया असल्यामुळे रबी पिके समाधानकारक येत नाहीत.
♥म्हणून खरीप हंगामातच उशिरा पेरणीसाठी पिकांचे योग्य नियोजन करणे हे आपत्कालीन पीक योजनेचे महत्वाचे तंत्र आहे.
♥म्हणजेच जुलैच्या दुसया पंधरवडयापयात बाजरी, सूर्यफूल तसेच हुलगा यासारखी पिके चांगली उत्पादन देतात.
♥परंतु मटकीसारखे पीक उशिरा पेरणीस योग्य ठरत नाही.
♥खरीप हंगामामध्ये कडधान्य,गळीतधान्य तसेच तृणधान्य इतयादी पिकांचे उत्पादन स्थिर करण्यासाठी उशिरा पेरणीसाठी अनुक्रमे तूर, हुलगा, सूर्यफूल, एरंडी, राळा अशी पिके घ्यावीत.
पर्यायी पिकाचे उत्पादन नेहमीच्या सरासरीइतके येणार नाही.
परंतु कठीण परिस्थितीत काही प्रमाणात उत्पादन येऊन परिस्थिती सुसह्य होईल हे मात्र निश्चित.
या सर्व पर्यायी पिकांच्या बियाण्यांची पूर्तता मात्र वेळेवर करणे गरजेचे असते.
(वरील शिफारस वापरकर्त्याने स्वजबाबदीवर निर्णय घ्यावे )
संकलित!
♥३. पाऊस लवकर संपणे (सप्टेंबर अखेर) :-
ज्यावेळी रबी हंगामात पाऊस वेळेवर सुरु होतो परंतु ऑक्टोबर मध्यापर्यंत पडण्याऐवजी सप्टेंबर अखेरच थांबतो त्यावेळी पिकावर अनिष्ट परिणाम होतो. अशा वेळी रबी पिकांच्या बाबतीत योग्य ते नियोजन करण्यासाठी खालील बाबींचा विचार व्हावा.
अ) रबी ज्वारीची पेरणी खोल करावी. तसेच खताची मात्रा पेरणी बरोबर द्यावी.
ब) उपलब्ध ओलीचा कार्यक्षम वापर होण्यासाठी रबी पिकांची विरळणी करुन ताटांची संख्या हेक्टरी निम्मी करावी. ज्वारीचे उदाहरण घेतले तर हेक्टरी एक लाख ताटाऐवजी ५०,००० ताटे ठेवावीत. विरळणी करताना एकाआड एक ताट काढावे किंवा एकाआड एक ओळ काढावी.
क) रबी पिकामध्ये कोळपणीची संख्या वाढवून जमिनीत ओल जास्त टिकावावी.
ड) ज्वारीच्या पिकामध्ये काडीकचरा किंवा तुरकाटयाचा आच्छादन म्हणून वापर करावा, हे आच्छादन हेक्टरी ५ टन वापरावे. आच्छादन पीक उगवणी नंतर लगेल १५ दिवसांच्या आत टाकावे म्हणजे पिकास उपलब्ध ओलावा भरपूर मिळून उत्पादनात घट येणार नाही.
उ) पीक वाचविण्यासाठी शक्य झाल्यास परेणीनंतर ३० ते ३५ व्या दिवशी संरक्षित पाणी द्यावे. दोन पाण्याची सोय असल्यास पहिले पाणी ३० ते ३५ दिवसांनी आणि दुसरे पाणी ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.
♥४. पाऊस उशिरापर्यंत पडणे, अतिवृष्टी होणे :-
रबी हंगामात पाऊस नोव्हेंबर पर्यंत पडत राहिला तर ज्वारीच्या पेरण्या वेळेवर होत नाहीत. अशावेळी उशिरा पेरणीसाठी ज्वारीचे पीक धान्यसाठी न घेता वैरणीसाठी घ्यावे आणि त्याची पेरणी दाट करावी. पाऊसकाळ वाढल्यामुळे थंडीचा कालावधी वाढतो. अशावेळी जर ज्वारी ऐवजी हरभरा घेतला तर उत्पादन चांगले मिळते. कधी कधी पीक पेरणीनंतर उगवणीच्या वेळेस अगर दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत, काढणीच्या वेळेस अतिवृष्टी मुळे पिकाचे नुकसान होते. पीक उगवून आल्यानंतर १ महिन्याच्या कालावधीमध्ये मोठया प्रमाणात नुकसान झाल्यास परत त्या क्षेत्रात पेरणी करताना पिकांची फेरबदल करुन कमी कालावधीमण्ये येणाया जातीचे बियाणे वापरावे. पक्व होण्याच्या अवस्थेत अगर काढणीपूर्वी सतत पडणाया पासामुळे मोठया प्रमाणात नुकसान होते. उदा. ज्वारीचे दाणे काळे पडून त्यास बाजारभाव कमी मिळतो. त्याकरिता हवामान खात्याच्या संदेशाप्रमाणे पावसाची शक्यत वर्तविली असल्यास पक्य झालेल्या (Physiological Maturity) पिकांची काढणी त्वरीत करुन योग्य प्रकारे साठवणूक करावी.
♥५. बियाणेनिवड :-
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जर बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्यास पुढीप्रमाणे उपाययोजना करावी.
१) पिकांचा फेरबदल करावा.
२) उशिरा पेरणीस योग्य जात व पिकाची निवड करावी.
३) कमी कालावधीमध्ये येणाया जातीची निवड करावी.
४) फक्त चा-यासाठी पिकाची नविड करावी.
५) बियाण्याची उपलब्धता विचारात घेता फक्त अडचणीच्या परिस्थितीतच निर्धारित उगवणशक्तीपेक्षा थोडी कमी उगवणशक्ती असलेले बियाणे जर शेतक-याकडे उपलब्ध असेल तर त्यांनी ते बियाणे कृषि खात्याच्या शिफारशीप्रमाणे प्रति हेक्टरी पेरणीसाठी वापरावे.
♥६. पाणी व्यवस्थापन :-
पाण्याची कमतरता असल्यास शक्य तेथे एक सरी आड पाणी द्यावे.
आच्छादनाचा वापर करावा.
ठिबक/तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
पिकाच्या महत्वाच्या वाढीच्या अवस्थेमध्येच पाणी द्यावे.
संकलित!
Comments
Post a Comment