बी. टी. कपाशीमध्ये आंतरपिके मूग, उडीद, सोयाबीन व तूर
बी. टी. कपाशीमध्ये आंतरपिके मूग, उडीद, सोयाबीन व तूर♥प्रगतशील शेतकरी♥
♥आंतरपिके :
बी. टी. कपाशीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन व तूर या पिकांचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव केल्यास फायदेशीर उत्पन्न मिळते.
♥सोयाबीन हे आंतरपीक घेताना लवकर पक्क होणारा वाण निवडावा.
♥कपाशीच्या ६ ओळीनंतर तुरीची १ ओळ किंवा
♥कपाशीच्या ८ ओळीनंतर तुरीच्या २ ओळी घेणे ही आंतरपीक पद्धती महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर घेतली जाते.
♥त्याचबरोबर मुग, उडीद व सोयाबीन यापैकी कोणतेही एक पीक बी.टी. कपाशीमध्ये १:१ या समप्रमाणात घेण्यात यावे.
♥कपाशीचे पीक निखळ घेण्याऐवजी त्यामध्ये आंतरपिके घेतल्यास त्या क्षेत्रापासून मिळणारे सकल व निव्वळ आर्थिक उत्पन्न निखळ कपाशीपेक्षा अधिक मिळते.
♥शिवाय आंतरपिकांमुळे जमिनीची धूप कमी होते.
♥आंतरपिकांच्या ओळी जमिनीच्या उतारास आडव्या घेण्यात येतात.
त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीवरून वाहताना त्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीमध्ये मुरण्याचे प्रमाण वाढते.
♥कडधान्ये आंतरपीक म्हणून घेतल्यास त्यांच्या मुळांवर असणार्या गाठींमधील जीवाणु सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात.
अशा पद्धतीने कडधान्ये अल्प प्रमाणात नत्राचा पुरवठा करतात, कडधान्यवर्गीय पिकांची पाने काढणीच्या वेळी गळतात.
त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
♥आंतरपिके जमिनीवरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी करतात.
आंतरपिकांचा उपयोग आच्छादनासारखा करता येतो.
♥कपाशीच्या लागवडीमध्ये ओळीतील अंतर शिफारशीपेक्षा जास्त ठेवल्यास दोन ओळींमध्ये आंतरपिकाची आणखी एक ओळ वाढवून आंतरपिकाच्या रोपांची संख्या वाढविलयास त्या क्षेत्रापासून अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
संकलित!
Comments
Post a Comment