माती परिक्षण आधारे कापुस पिक नियोजन असे कराल

माती परिक्षण आधारे कापुस पिक नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

श्री कनके यांच्या शेतातील मातीचे निकाल पत्रकानुसार जमिनीचे आरोग्य पिकांसाठी किती पोषक वा घातक आहे हे कळु शकते! त्यानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापण करणे कापुस उत्पन्नाच्या दृष्टिने फायदेशीर ठरु शकते!

♥सामु म्हणजे PH हा 6.5 ते 7.5 पर्यंत आदर्श सामु असतो.

श्री कनके यांच्या शेतातील सा.मु. 7.70 म्हणजे सौम्य अल्कली आहे.

शिफारस :- श्री कनके यांच्या जमिनीचा सामु 0.20 ने जास्त असल्याकारणाने जमिन अल्कली गुणधर्मीय असल्याने उपाय योजना म्हणुन धैंचा, हिरवळीचे खते, ऊडिद, मुग आदींची शिफारस करण्यात आली आहे.

♥मातीची क्षारता ही 0 ते 1 पर्यंत आदर्श असतो.

श्री कनके यांच्या शेतातील मातीची क्षारता 0.19 म्हणजे साधारण आहे.

शिफारस :-  श्री कनके यांच्या शेतातील मातीची क्षारता 0.19 म्हणजे साधारण असल्याकारणाने  कोणतीही शिफारस नाही.

♥सेद्रिय कर्ब म्हणजे Organic Carbon (OC) हा 0.40  ते 0.60 पर्यंत आदर्श सेद्रिय कर्ब असतो.

श्री कनके यांच्या शेतातील सेद्रिय कर्ब 1.73 म्हणजे अतिशय जास्त आहे .

शिफारस :- 
श्री कनके यांच्या शेतातील सेद्रिय कर्ब 1.73 म्हणजे अतिशय जास्त असल्याकारणाने शिफारस देण्याचे टाळले आहे. सेंद्रिय कर्ब घटक देण्याचे टाळा!

(सेंद्रिय खतांचा वापर कापुस
सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो, जलधारणाशक्ती वाढते, जमिनीत हवा खेळती राहते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते. वखरपाळीपूर्वी कोरडवाहू लागवडीसाठी पाच टन (१०-१२ गाड्या) शेणखत व बागायती लागवडीसाठी दहा टन (२०-२५ गाड्या) चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्टखत शेतात सम प्रमाणात पसरून टाकावे.)

♥स्फुरद म्हणजे फास्फोरस हा 14 ते 21 किलो प्रती हेक्टरी पर्यंत आदर्श स्फुरद असतो.

श्री कनके यांच्या शेतातील स्फुरद 12.54  किलो प्रती हेक्टरी म्हणजे कमी प्रमाण आहे.

शिफारस :- श्री कनके यांच्या शेतातील स्फुरद 12.54  किलो प्रती हेक्टरी म्हणजे कमी प्रमाण असल्याकारणाने  शिफारस करण्यात आली नाही.

जिरायती बीटी कपाशीसाठी 60 किलोप्रति हेक्‍टर स्फुरद दिल्याने फायदेशीर ठरते. परंतु वरील जमिनीत स्फुरद 1.06 किलो कमी असल्याने 61.06 प्रती हेक्टरी स्फुरद द्यावा लागु शकतो!

♥पालाश म्हणजे पोटॅश हा 150 ते 200 किलो प्रती हेक्टरी पर्यंत आदर्श पालाश असतो.

श्री कनके यांच्या शेतातील पोटॅश 869.22  किलो प्रती हेक्टरी म्हणजे जास्त प्रमाण आहे.

शिफारस :- जिरायती बीटी कपाशीसाठी 60 किलोप्रति हेक्‍टर पालाश  दिल्याने फायदेशीर ठरते. परंतु वरील जमिनीत स्फुरद 669.22 किलो जास्त असल्याने 609.22 प्रती हेक्टरी अतिरिक्त होईल. म्हणुन पोटॅश देण्याचे कटाक्षाने टाळावे.श्री कनके यांच्या शेतातील पोटॅश 869.22  किलो प्रती हेक्टरी म्हणजे जास्त प्रमाण असल्याकारणाने  शिफारस करण्यात आली नाही.

वरिल संदर्भ लिखाण संकलित व माहिती अभावे अपुर्ण आहे, वापरकर्त्याने स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!