पाने पिवळी पडतात त्यावर उपाय

पाने पिवळी पडतात त्यावर उपाय♥प्रगतशील शेतकरी♥

♥पाने पिवळी पडण्याचे नेमके कारण काय ते पाहून
खालील प्रमाणे योग्य ती उपाय योजना करावी!

♥ शेतातील साठलेले सर्व पाणी काढून टाकावे.

♥ करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड ३० ग्रॅम किंवा क्‍लोरोथॅलोनील २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी अधिक स्टिकर दहा मि.लि. या प्रमाणात १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

♥सुक्ष्म अन्नद्रव्य ३ लिटर प्रती २०० लीटर पाणी प्रती एकर किंवा विपूल किंवा मल्टीप्लेक्स १० मिली प्रती १० लीटर पाणी किंवा झिंक फेरस ०.५ टक्के + बोरँक्स ०.२ टक्के ची १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्या.

♥ फुलकिडे आणि इतर किडींच्या नियंत्रणासाठी मेथील डीमेटॉन १०मिली किंवा मँलेथिऑन १०मीली कींवा रोगर २०मिली किंवा नुवान १२ मिली यापैकी एक कीटकनाशक निवडून प्रती १० लीटर पाणी याप्रमाणे आलटून पालटून १ ते २ फवारण्या कराव्यात.

♥ पिकावर किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीमध्ये  निंबोळी अर्क ५ टक्के किंवा करंज बियांच्या अर्क ५ टक्के प्रमाणे प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

♥ जर झाडे मुळकुज खोडकूज, सालकूज इ. रोगामुळे पिवळी पडत असतील तर अशा झाडांना बोर्डोमिश्रण ०.५ टक्के जमिनीतून रींग पध्दतीने प्रती झाड अर्धा ते १ लिटर द्रावण ओतावे.

♥ मॅग्नेशियम कमतरतेसाठी मॅग्नेशियम सल्फेट 10 ते 15 किलो प्रती एकर व बेनसल्फ 10 किलो प्रती एकर द्यावे.

(प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत: च्या जबाबदारीवर करावा.)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!