बीट लागवडीचा अनुभव Experience of Beetroot cultivation in Maharashtra, India

बीट लागवडीचा अनुभव♥प्रगतशील शेतकरी♥
(20 गुंठा क्षेत्र, भाव सरासरी रु.15 X  6000 किलो = 90000 - 7000 खर्च = 83000 उत्पन्न)

♥बीट हे कंद वर्गीय भाजीपाला पीक आहे. ८० ते ९० दिवसांत कमी खर्चात येणाऱ्या या पिकांची लागवड पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते.
जुन्नर तालुक्यातल्या निमगाव सावा गावचे संतोष थोरात बीट पीकाचे उत्पादन वर्षभर आलटून पालटून घेतात.
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर बीट खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
आहारात दररोज बीट खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
त्यामुळे शहरी ग्राहकांमध्ये बीटाची मागणी जास्त असते.
ही बाब लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या निमगाव सावाचे संतोष थोरात गेल्या ६ वर्षांपासून बीटाची लागवड करत आहेत.

♥पुण्या- मुंबईची बाजारपेठ जवळ असल्याने त्यांना याचा चांगला फायदा होत आहे.
सध्या त्यांच्याकडे २० गुंठ्यांवर बीटाचे पीक आहे.

♥बीटाचे पीक कमीत कमी ६.५ ते ७ आणि जास्तीत जास्त १० ते ११.५ सामू असलेल्या जमिनीत चांगल्या प्रकारे येते.
त्यामुळे आपल्याकडील क्षारपड जमिनीत याची शेती करण्यास मोठा वाव आहे.

♥बीट लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी.
भुसभुशीत जमिनीत बीटाची वाढ चांगली होते.
बीटाची चांगली वाढ होण्यासाठी कमीत कमी १० ते ३६ अंश सेल्सियस तापमानाची गरज असते.
त्यामुळे पावसाळा किंवा हिवाळ्यात उष्णता कमी असल्याने याचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
बीट लागवडीसाठी डेट्राईट डार्क रेड, क्रीमसन ग्लोब यासारख्या वाणांची शिफारस करण्यात येते.

♥संतोष थोरात यांनी डेट्राईट डार्क रेड या वाणाची लागवड केली आहे.

♥लागवडीपूर्वी त्यांनी जमिनीची चांगली मशागत करुन त्यात ६ गाड्या शेणखत वापरले आहे.

♥याची लागवड ते सरीवरंबा आणि वाफापद्धतीने करतात.

♥बीटाचे शेत तणमुक्त ठेवले तर हवा खेळती राहते आणि त्याचा कंदांच्या वाढीस फायदा होतो.

♥बीटाच्या शेतीत कीड आणि रोगांचे नियंत्रण महत्त्वाचे आहे.

♥पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी
होस्टाथिऑन १० मिली १० लिटर पाण्यातून फवारा.

♥उंटअळीच्या नियंत्रणासाठी
सायपरमेथ्रीन २५ मिली  १० लिटर पाण्यातून फवारा.

♥पानावरील ठिपके आणि केवडा येऊ नये म्हणून
कॅप्टन हे बुरशीनाशक प्रतिकिलो बियाण्यास २ ते ३ ग्रॅम चोळावे.

♥लागवडीवेळी बीजप्रक्रिया करुनदेखील त्यावर ठिपके आणि केवड्याचा प्रादुर्भाव झाल्यास त्यावर
डायथेन एम ४५ बुरशीनाशकाची २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

♥संतोष थोरातांना या हंगामात २० गुंठ्यात  ६ टन बीटाचे उत्पादन मिळाले आहे. याची विक्री त्यांनी मुंबईच्या मार्केटला केली आहे. त्यांना  प्रतिकिलो सरासरी १५ रुपयांचा भाव मिळाला. यापासून त्यांना ९० हजार रुपये मिळाले. यासाठी ७ हजार रुपयांचा खर्च आला. तो वजा करता त्यांना ८३ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.

♥बीटाचे पीक काढल्यानंतर त्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या पुढील पिकाला चांगला फायदा होतो.
बीटाचा वापर सलाड, लोणचे आणि साखर तयार करण्यासाठी होतो.
लाल रंगाचे बीट शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
तर शेतकऱ्यांना कमी कालावधीत चांगला नफा मिळवून देण्यासीठी ते फायद्याचे ठरत आहे. त्यामुळे खाणाऱ्यांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून देणाऱ्या बीटाची लागवड वाढवणे गरजेचे आहे.

संकलित! 

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!