गड्या जरा व्यायाम कर..!
गड्या जरा व्यायाम कर..!
केवळ आर्थिक परिस्थिती
चांगली असून उपयोग नाही,
मनस्थिति चांगली पाहिजे
शरीर फिट तर मन फिट
नाही तर काय,
सगळं चांगलं असूनही
घरात नेहमीच किट किट..
पर्यटनाला जायचं म्हणजे
प्रकृति चांगली असली पाहिजे,
कपाळावर आठ्या नाही
चेह-यावर रौनक असली पाहिजे..
आंबट चेहरा करुन अजिबात बसू नका,
अन तरुणपणी विनाकारण
म्हाता-या सारखं दिसू नका..
आनंदी, खेळकर, टवटवीत रहावं
गुढघ्याच्या वाट्या सटकलेल्या
डोक्याच्या पट्या सरकलेल्या,
थोडं काही वेगळं खाल्लं की
ऍसिडिटी, मळमळ, उलटया,
अरे काय भल्या माणसा,
कसं व्हावं तुझं?
हे डोंगर, झाडं, समुद्र
कोणासाठी आहेत?
तुझं आपलं एकच
"मी फार बिझी आहे.."
वेड्या, तब्येतीची काळजी घे
कुटुंबासाठी वेळ दे,
घरासाठी झटणा-यांना साथ दे..
अडचण चालु आहे
असं तुण-तुणं वाजवू नकोस,
"मानसिक" आजारानं खंगून जाऊ नकोस..
निसर्गाच्या जवळ जा
थोडी तरी मजा कर
शंख आणि शिंपल्याना
कधी तरी जवळून बघ. .
आणि आरोग्य बिघडलं म्हणून सारखं सारखं रडू नको..
"मातीने" एकी केली तर विट बनते..,
"विटेनी" एकी केली तर भिंत बनते..,
आणि
जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत...नाही का...❔🍂
"विचार" असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी
"विचार"
केलाच पाहिजे।
Comments
Post a Comment