आंबा किड नियंत्रण असे कराल Mango pest control ..

आंबा किड नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥आंबा हे मधुर फळ… आंबा आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे कठीण आहे.
कदाचित म्हणूनच आंबा परदेशातही सगळ्यांच्या आवडीचे फळ बनला आहे.
परदेशात आंब्याला मुख्यत्वे कोकणातील हापूस आंब्याला खूप मागणी आहे.
हि मागणी लक्षात घेता आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.
मात्र, आंबा बागेत किंवा आमराईत आंब्याचे उत्पादन घेताना उत्पादकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
आंब्यावर हल्ला करणाऱ्या किडी या यापैकी एक आहेत.
आंब्याच्या पिकावर हल्ला करणाऱ्या किडी कोणत्या आणि त्या किडींवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवावे यावर प्रकाशझोत टाकूया.

♥मिजमाशी :

या किडीमुळे मोहोराचे नुकसान होते या किडीच्या नियंत्रणासाठी
११ मि. ली. मोनोक्रोटोफॉस हे कीटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

♥शेंडे पोखरणारी अळी :

या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास किडग्रस्त काड्या काढून त्यांचा अळीसह नाश करावा.
तसेच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच

२५ टक्के प्रवाही क्विनॉलफॉस ( २० मि. ली. १० लिटर पाण्यात)

किंवा

३६ टक्के प्रवाही मोनोक्रोटोफॉस (११ मि. ली. १० लिटर पाण्यात)

किंवा

पाण्यात मिसळणारी २० ग्रॅम कार्बावरील पावडर १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी.

♥मोहोरावरील तुडतुडे :

तुडतुडे मोहोरातील कोवळ्या फळातील रस शोषून घेतात.
त्यामुळे मोहोर गळून पडतो.
याशिवाय तुडतुडे माधासारक्षा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात.
तो पानांवर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते, त्यामुळे झाडे/ फळे काळी पडतात.

तुडतुडे व भुरी यांच्या नियंत्रणासाठी वेळापत्रकामध्ये दाखविल्याप्रमाणे औषधे फवारावीत.

किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच
अॅझाडीरॅक्टीन १ % (१०,००० पीपीएम) या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची ३० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

किंवा

व्हर्टिसिलियम लीकानी या बुरशीचे बीजकरण ( २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी) या प्रमाणात फवारावे.
काळे डाग असलेली फळे ५ ग्रॅम ब्लिचिंग पावडर १० लिटर पाण्यात टाकून तयार केलेय द्रावणात स्वच्छ धुवून सावलीत कोरडी करून विक्रीसाठी पाठवावीत.
कोणत्याही तीव्र डीटरर्जण्ट पावडरचा वापर करून नये.
त्यामुळे फळे पिकल्यावर त्यात सका वाढण्याची शक्यता असते.

♥भिरुड :

हि कीड खोड आणि फांद्या पोखरते.
त्यामुळे पोखरलेल्या फांद्या वाळू लागतात.
तारेच्या हुकाने अळ्या काढून टाकून छिद्रात
ईडीसिटि मिश्रण

किंवा

बोअरर सोल्यूशन ओतावे

अथवा

अॅल्युमिनिअम फा़स्फाईडची एक गोळी टाकावी व छिद्र बंद करून घ्यावे.

♥फळमाशी :

फळमाशी फळाच्या सालीखाली अंडी घालते.
दोन- तीन दिवसात अंडी उबून आल्या फळातील गार खातात.
किडलेली फळे गळून पडतात.

किडलेली फळे गोळा करून त्यांचा अळ्यासह नाश करावा.

फळमाशीचा प्रादुर्भाव दिसू लागताच रक्षक सापळे फळझाडावर लावावेत.

प्रती हेक्टरी ४ रक्षक सापळे वेगवेगळ्या ठिकाणी बागेत लावावेत.

♥वाळवी :

लहान कलामांना वाळवी लागू नये म्हणून कलम लावताना कुजालेलेल शेणखत वापरावे.

त्यातील न कुजलेला काडीकचरा अक्धून टाकावा व
कलम लावतेवेळेस खड्ड्यांमध्ये
१०० ग्रॅम २ टक्के मिथिल पॅराथिआॅन

किंवा

५ टक्के कार्बारील भुकटी मातीत मिसळावी.

आंब्याच्या झाडावरील वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी झाडाचे बुंधे झाडून घ्यावेत व
५० टक्के प्रवाही मिथिल पॅरॉथिआॅन २ मि. लि.

किंवा

२० टक्के प्रवाही क्लोरोपायारीफॉस ५ मि. लि.

किंवा

५० टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारील पावडर ४ ग्रॅम
प्रती लिटर पाण्यात मिसळून द्रावण बुंध्यावर फवारावे.

तसेच, बुन्ध्यालगत जमिनीमध्ये ओतावे.

वाळवीपासून होणारा उपद्रव समूळ नष्ट कार्यासाठी शेतातील वारूळ शोधून काढून त्यातील वाळवीच्या राणीचा व वारुळाचा नाश करावा.

वारूळ भुईसपाट केल्यावर वरीलप्रमाणे किटकनाशाकांचे द्रावण मातीत मिसळून वारुळाचे जागेवर मुरु द्यावे.
हे कीटकनाशक जमिनीत मुरल्याने वारुळात दडून राहिलेली वाळवी मारून जाते.

♥आंब्यावरील फुलकिड :

गेल्या पाच वर्षापासून थ्रीप्स प्लक्स व थ्रीप्स हवाईन्सीस या थ्रीप्सच्या प्रजातींचा प्रादुर्भाव आंबा बागेमध्ये पालवी, मोहोर व फळांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
या किडीचे नियंत्रण वेळीच करणे गरजेचे आहे.
फुलकिड हि आकाराने सुक्ष असून डोळ्यांनी सहजासहजी दिसत नाही.
यातील प्रौढ किडी पिवळ्या किंवा गडद चॉकलेटी रंगाच्या असतात तर लहान किडी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या असतात.
या किडी पाने, मोहोर, कोवळे दांडे आणि फालांवरील साल खरवडून त्यातून पाझरणारा रस शोषून त्यावर आपली उपजीविका करतात.
यामुळे मोहोर काळा पडून गळून जातो.
तर फळांची साल खरवडल्यासारखी दिसते आणि फळांवर खाकी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसून येतात.
मोठ्या प्रमाणावर गळ होते.
फळे खराब झाल्यामुळे फळांना दर कमी मिळतो.

प्रादुर्भाव आढळून आल्यास
२.५ मि. ली. स्पिनोसॅड ४५ टक्के प्रवाही प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

प्रादुर्भाव अधिक असल्यास दुसरी फवारणी थायोमिथाक्झॉम २५ टक्के (WG) २ ग्रॅम प्रति १० लि. पाणी या प्रमाणात करावी.

फवारणी करताना मोहोर नुकताच फुलत असल्यास आणि फलधारणा झालेली नसल्यास शक्यतो फवारणी फलधारणा होईपर्यंत टाळावी.
शिफारसीनुसार शक्यतो सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत फवारणी करावी.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!