कारली नियोजन

कारली नियोजन ♥प्रगतशील शेतकरी♥

♥सुधारित वाणः-फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी

♥पेरणीची वेळः-खरीपः जून- जुलैचा पहिला आठवडा
उन्हाळीः जीनेवारी- फेब्रुवारी

♥बियाण्याचे प्रमाणः- 2-2.5 किलो प्रति हेक्टर

♥लागवडीचे अंतरः- 1.5 * 1.0 मी.

♥खताची मात्राः-20 टन शेणखत,
100.50.50 किलो या प्रमाणात नत्रः
स्फुरदः पालाश प्रति हेक्टर.

♥आंतरमशागतः-

अ) 15 ते 20 दिवसाच्या अंतराने नियमीत खुरपणी करणे.

ब) लागवडीनंतर एक महिन्यांनी वरखतांची मात्रा दयावी
आणि वेलींना वळण देण्यासाठी ताटी उभारणीसाठी तयारी करीवी.

♥पाणी व्यवस्थापनः- 8-10 दिवसाच्या अंतराने हंगाम व गरजेनुसार पाण्याच्या
पाळया द्याव्यात.

♥पीक संरक्षणः- सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा प्लस 20 ग्रॅम प्रति किलो बियाणेस बीजप्रक्रिया करावी.

♥रस शोषणारी कीडः- मिथाईल डिमेटाँन 10 मिली. किंवा इमिडॅक्लोप्रीड 4 मिली. प्रति या प्रमाणात फवारावे.

♥फळमाशीः- मॅलॅथिआँन 20 मिली अधिक 100 ग्रॅम गुळ व 10 लि. पाणी यांची फवारणी करावी.

♥केवडी व फुरी रोगः- काँपर आँक्झिक्लोराईड 0.30 टक्के अधिक पाण्यात
विरघळणारे गंधक 0.30 टक्के अधिक चिकट द्रव्य 0.10
टक्के , 10 दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर एक
महिन्यांनी फवारणी करावी.

♥उत्पादनः- 15-20 टन प्रति हेक्टर

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!